जगातील सगळ्यात महागडे बिस्किट
बाजारामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची बिस्कीट उपलब्ध आहेत. यामध्ये 5 रुपयांपासून ते अगदी 100 रुपये किंमतीची बिस्कीट सगळीकडे मिळतात. पण जगात असा एक बिस्किटाचा तुकडा आहे, ज्याची किंमत ऐकून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल. या बिस्किटाच्या किमतींमध्ये तुम्ही अनेक वेगवेगळ्या ब्रँडच्या कर खरेदी करू शकता. जगातील सगळ्यात महागडे बिस्कीट म्हणून याची ओळख आहे.आज आम्ही तुम्हाला जगातील सगळ्यात महागड्या बिस्किटाची नेमकी किंमत किती? आणि हे बिस्कीट एवढे महाग का आहे?याबद्दल काहीतरी खास माहिती सांगणार आहोत. नक्की वाचा.(फोटो सौजन्य – r/raddit)
बीबीसीने 2015 मध्ये दिलेल्या रिपोर्टनुसार, 2015 साली जगातील एका बिस्किटाचा लिलाव करण्यात आला होता. ज्याची किंमत आजच्या तुलनेत 15 हजार पौंड म्हणजेच 15 लाख रुपये होते. त्यावेळी हे जगातील सगळ्यात महागडे बिस्कीट ठरले होते. हे बिस्कीट एवढे महाग मिळण्यामागे काही करणे देखील आहेत. त्यातील एक म्हणजे या बिस्किटावर टायटॅनिक जहाज आहे जे सुरक्षित सापडले होते. टायटॅनिक मधील एका लाइफ बोटमध्ये ठेवलेल्या सर्व्हायव्हल किटमध्ये स्पिलर्स अँड बेकर्स पायलट क्रॅकर बिस्किट सापडले होते. त्यामुळे हे बिस्कीट जगातील सगळ्यात मौल्यवान बिस्कीट म्हणून मानले जात आहे.
लिलावामध्ये जगातील सगळ्यात महागडे बिस्कीट ग्रीसच्या कलेक्टरने विकत घेतले होते. तसेच विकत घेण्यात आलेले बिस्कीट RMS Carpathia मध्ये उपस्थित असलेल्या जेम्स आणि मेबेल फेनविक या जोडप्याने स्मरणिका म्हणून अजूनही जतन केले आहे. टायटॅनिकमधून वाचलेल्या आरएमएस कार्पाथिया जहाजाला प्रचाराण करण्यात आले होते. त्यानंतर त्या जोडप्याने बिस्कीट उचलून कोडॅक फिल्मच्या पाकिटमध्ये ठेवले. तसेच त्याच्यासोबत त्यांनी काही फोटो देखील ठेवले.
ज्या व्यक्तीने बिस्किटांचा लिलाव केला होता त्यांनी सांगितल्यानुसार टायटॅनिकच्या एवढ्या भयानक अपघातामधून फक्त हे बिस्कीट व्यवस्थित राहिले होते. तसेच टायटॅनिक मधील अजून कोणतेही बिस्कीट सध्या कुठेच उपलब्ध नाहीत. काही वर्षांआधी प्रसिद्ध संशोधक आणि संशोधक सर अर्नेस्ट शॅकलटन यांच्या पप्रवासा दरम्यान सापडलेल्या 100 वर्षे जुन्या बिस्किटाचा लिलाव करण्यात आला होता. जे बिस्कीट ३ लाख रुपयांना विकत आले होते.