National Girl Child Day 2025 Give wings to girls their future will be bright
नवी दिल्ली : राष्ट्रीय बालिका दिन भारतात दरवर्षी 24 जानेवारीला मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मुलींच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि समाजात सकारात्मक दृष्टिकोन रुजवणे, हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. आजच्या घडीला मुली कोणत्याही क्षेत्रात मुलांपेक्षा कमी नाहीत. शिक्षण, क्रीडा, कला आणि विज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रांत त्यांनी आपले यशस्वी कर्तृत्व सिद्ध केले आहे.
मुलींची स्वप्न आणि प्रगती
समाजात अनेकदा मुलींना दुय्यम दर्जाचे वागणूक दिली जाते, परंतु आता परिस्थिती बदलत आहे. विविध शाळांतील विद्यार्थिनी उच्च उद्दिष्टे ठरवून त्या पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत घेत आहेत. अभ्यासासोबतच कराटे, कबड्डी, चित्रकला आणि नृत्य यांसारख्या क्रियाकलापांमध्येही मुलींची उल्लेखनीय कामगिरी दिसून येते.
आरोग्यसेवेत योगदान देण्याचे ध्येय
डॉक्टर बनून लोकांची सेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलींचा दृष्टिकोन प्रेरणादायी आहे. दुर्गम भागांमध्ये वैद्यकीय सेवा मिळवणे कठीण असल्याने मुलींना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यसाठी अनेक अडथळे पार करावे लागत आहेत. ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मुली कठोर परिश्रम घेत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पुरानंतर, मुस्लिमांचे सर्वात पवित्र शहर मक्का येथे येऊ शकते पुन्हा संकट, जारी करण्यात आला ‘हा’ अलर्ट
तंत्रज्ञान आणि गणितामधील गती
अनेक मुलींना संगणक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात करीयर घडवायचे आहे. त्यांचा या आवडीमुळे त्या संगणक ज्ञानामध्ये पारंगत होण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. गणिताच्या क्षेत्रात प्रगती करणारी विद्यार्थिनी या गणितातील गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं सोडवण्यात निष्णात आहेत. शिक्षकांचे प्रोत्साहन मिळाल्याने त्यांची गणिताविषयीची आवड अधिक वाढली आहे.
शिक्षण आणि पालकांचा पाठिंबा
आज मुलींच्या शिक्षणासाठी पालक अधिक जागरूक झाले आहेत. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेत, मुलींनी शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी मजल मारली आहे. शिक्षणामुळे मुली आत्मनिर्भर बनत आहेत आणि देशाच्या प्रगतीसाठी योगदान देत आहेत. शाळेतील अन्य विद्यार्थिनींनीही शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक आणि क्रीडाक्षेत्रात प्रगती केली आहे.
क्रीडाक्षेत्रातील यश
माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनी, फुटबॉल सामन्यांमध्ये जिल्हास्तरावर विजय मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल करत आहेत. त्यांचे नेतृत्व कौशल्य आणि क्रीडाक्षेत्रातील कामगिरी त्यांच्या भवितव्याच्या उज्ज्वल शक्यतांचा परिचय देतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारतासोबतचा गोंधळ मोहम्मद युनूसला पडला महागात, राजीनामा देण्याची आली आहे वेळ; वाचा संपूर्ण प्रकरण
समाजासाठी प्रेरणा
राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून, मुलींच्या आकांक्षा आणि मेहनतीने समाजाला प्रेरणा मिळत आहे. मुलींनी शिक्षण आणि विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रगतीमुळे समाजात सकारात्मक बदल होत आहे. आजच्या मुली ही फक्त घरासाठी नव्हे, तर देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठीही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मुलींच्या स्वप्नांना पाठबळ देऊन त्यांना यशस्वी करण्यासाठी पालक, शिक्षक आणि समाजाने सातत्याने प्रयत्नशील राहायला हवे.