पुरानंतर, मुस्लिमांचे सर्वात पवित्र शहर मक्का येथे येऊ शकते पुन्हा संकट, जारी करण्यात आला 'हा' अलर्ट ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
मक्का मदिना : अलीकडेच सौदी अरेबियामध्ये मक्का ते जेद्दाह आणि अल बहा भागात जोरदार पूर आला होता. यानंतर देशात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडू शकतो. पवित्र शहर मक्का ते मदिना आणि रियाधपर्यंत मुसळधार पाऊस, गारा आणि जोरदार वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुस्लीम देश सौदी अरेबिया हा वाळवंटी प्रदेश असून, तेथे कडक उष्मा आहे, परंतु यावर्षी देशातील हवामानाने विचित्र वळण घेतले आहे. सौदी अरेबियामध्ये जिथे पहिल्यांदा बर्फवृष्टी झाली होती, त्यानंतर लोकांना पुराचा सामना करावा लागला होता. मात्र, पुन्हा एकदा देशात अतिवृष्टीबाबत ॲडव्हायझरी जारी करण्यात आली आहे.
सौदी अरेबियाला वर्षभर मोठ्या संख्येने यात्रेकरू भेट देतात. दरम्यान, मक्का या पवित्र शहरात पुन्हा एकदा पुराची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नुकतेच 8 जानेवारीला मक्का ते जेद्दाह, अल-बाहा आणि असीर प्रांतात जोरदार पूर आला होता, सर्वत्र रस्ते जलमय झाले होते, वाहने पाण्याखाली गेली होती, त्यानंतर पुन्हा एकदा अतिवृष्टीबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पावसाबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे
सौदीतील हवामान विभागाने सोमवारपर्यंत देशातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पवित्र मक्का शहरापासून अल लैथ आणि अल कुन्फुदा आणि रियाधपर्यंत मुसळधार पाऊस, गारपीट आणि जोरदार वारा येण्याची शक्यता आहे. सौदी नॅशनल सेंटर ऑफ मेटिऑलॉजी (एनसीएम) ने देखील गुरुवारी दक्षिण-पश्चिम सौदी अरेबियातील जाझान, असीर आणि अल बहा या भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. यासोबतच पूर्व प्रांतातील काही भागात धुकेही पडण्याची शक्यता आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : मध्यपूर्वेत होणार का मोठा विध्वंस? चीन ‘इराणला’ पाठवत आहे 1000 टन सोडियम परक्लोरेट, इस्रायल चिंतेत
यासोबतच देशाच्या उत्तर भागातही पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. अल जॉफ, मदिना आणि अल कासिमच्या काही भागात मध्यम आणि मुसळधार पावसाचीही अपेक्षा आहे. मक्का, मदिना आणि रियाधसह अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता असताना, सौदीतील नागरी संरक्षण अधिकाऱ्यांनी लोकांच्या सुरक्षेचा विचार करून अलर्ट जारी केला आहे. नागरी संरक्षण अधिकाऱ्यांनी लोकांना सतर्क आणि सावध राहण्यास सांगितले आहे. सौदीच्या नागरी संरक्षण महासंचालनालयाने जनतेला सावधगिरी बाळगण्यास, सुरक्षित ठिकाणी राहण्यास आणि खोऱ्यांसह पुराचा धोका असलेल्या ठिकाणांपासून दूर राहण्यास सांगितले आहे.
कुठे, कोणते तापमान?
24 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत सर्व ठिकाणचे तापमान
ठिकाण तापमान
मक्का 24 अंश
रियाध 15 अंश
मदिना 18 अंश
असिर 24 अंश
al joof 10 अंश
मक्केत जोरदार पाऊस झाला
याआधी 8 जानेवारीला सौदी अरेबियात मक्का ते जेद्दाह, अल-बाहा आणि असीर प्रांतात मुसळधार पाऊस पडला होता. त्यामुळे या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते जलमय झाले, वाहने पाण्याखाली गेली. पुराचे फोटो सोशल मीडियावर वेगाने शेअर झाले. सौदी अरेबिया हा कोरडा प्रदेश आहे जिथे प्रचंड उष्णता जाणवते, परंतु देशात पूर आणि मुसळधार पाऊस यासारख्या परिस्थिती सतत घडत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ना थायलंड ना मलेशिया… 2024 मध्ये सर्वाधिक पर्यटकांनी ‘या’ देशाला दिली भेट
सौदीमध्ये जानेवारीच्या पुराच्या 4 महिने आधी सहारा वाळवंटात पूर आला होता. सौदीमध्ये एकीकडे पूर आणि मुसळधार पावसासारखी परिस्थिती असताना दुसरीकडे जून महिन्यात देशात कडाक्याच्या उन्हामुळे अनेकांचा मृत्यू झाला. उष्णतेच्या लाटेमुळे हज दरम्यान 1,300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी अनेकांचा उष्णतेमध्ये चालण्यामुळे मृत्यू झाला. एकीकडे देशात पाऊस आणि पुराची परिस्थिती निर्माण होत असताना, दुसरीकडे 8 नोव्हेंबर 2024 रोजी अल-जौफ परिसरात पहिल्यांदा हिमवृष्टीची नोंद झाली. यानंतर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस आणि पुराबाबत देशात अलर्ट जारी करण्यात आला आहे.