
National Pensioners day 2025
या दिवशी देशभरात विविध राज्यांनध्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. देशाच्या सेवेसाठी आपले जीवन देणाऱ्या पेंशनधारकांसाठी सन्मान समारंभ आयोजित केली जातात. तसेच जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरांचे, योग सत्रांचे, मनोरंजनाचे उपक्रमही राबवले जातात.
या दिनाची सुरुवात होण्यापूर्वी भारतात ब्रिटीश सरकारने पेंशन प्रणाली लागू केली होती. १८५७ मध्ये ब्रिटनच्या पेंशन प्राणालीवर लागू करण्यात आली होती. पेंशन ही एक प्रकारची सेवानिवृत्ती आहे. यामध्ये जेष्ठ नागरिक, कर्मचारी, नोकरदार यांच्या नोकरीवेळी काही रक्कम जमा केली जाते आणि सेवानिवृत्तीनंतर त्यांना नियमित पगाराच्या स्वरुपात पैसे म्हणून दिली जाते. म्हणजेच पेंशन दिली जाते. तर भारतात ही प्रणाली १९८२ च्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर लागू करण्यात आली. याचा उद्दिष्ट देशाच्या सेवेत मोलाचे योगदान देणाऱ्या जेष्ठ नागरिकांना, निवृत्त कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना समानता आणि न्यायाची हमी देणे होता.
हा दिवस पेंशन धोरणे, सेवानिवृत्ती संबंधित धोरणे आणि हक्क, जेष्ठ नागरिक योजनांचे महत्त्व अधोरेखित करतो. जेष्ठ नागरिक, निवृत्त कर्मचारी, यांना त्यांच्या योगदानाच्या बदल्यात योग्य वेळेवर पेंशन, आरोग्य सेवा, सामाजिक सुरक्षा आणि सन्मानीय जीवनाचा, भेदभावपूर्ण जगण्याचा अधिकार आहे. याची जाणीव करुन देण्यासाठीच हा दिवस साजराल केला जातो. हा दिवस केवळ सन्मानाचा दिवस नव्हे, तर समाजासाठी एक प्रेरणादायी संदेश देणारा देखील आहे. पुढच्या पिढीला आपल्या वडीलधाऱ्यांच्या आदर राखम्याची, त्यांच्या योगदानाची जाणीव करुन देण्याचा दिवस आहे.
आपल्या भारतात यासाठी योजना देखील आखण्यात आली आहे. यामध्ये भारतीय पेन्शन योजना व्यवस्थेच कर्मचारी भविष्य निधी योजना (EPF), र्मचारी पेंशन योजना (EPS) आणि राष्ट्रीय पेंशन योजना (NPS) चा समावेश आहे. EPS च्या लाभासाठी किमान 10 वर्षांचे योगदान आणि 58 वर्षे वय आवश्यक असते.