Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

National Productivity Day 2025 : ‘कल्पनांपासून परिणामापर्यंत’ या थीमनुसार उत्पादकतेचा जागरूकतेचा संकल्प

National Productivity Day 2025 : देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उत्पादकतेचा वारंवार उल्लेख केला जातो. याच उद्देशाने दरवर्षी १२ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय उत्पादकता दिन साजरा केला जातो.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 20, 2025 | 09:37 AM
National Productivity Day 2025 From Ideas to Results

National Productivity Day 2025 From Ideas to Results

Follow Us
Close
Follow Us:

National Productivity Day 2025 : देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उत्पादकतेचा वारंवार उल्लेख केला जातो. याच उद्देशाने दरवर्षी  फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय उत्पादकता दिन साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रीय उत्पादकता परिषदेच्या (National Productivity Council – NPC) स्थापनेचे स्मरण केले जाते आणि देशातील विविध क्षेत्रांतील उत्पादकता, नवोपक्रम, कार्यक्षमता आणि गुणवत्ता यावर लक्ष केंद्रित केले जाते. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय उत्पादकता परिषदेची स्थापना १९५८ मध्ये करण्यात आली होती. ही परिषद एक स्वायत्त संस्था असून ती उद्योग, शेती, सेवा क्षेत्र आणि शासन यामधील कार्यक्षमता सुधारण्यासाठी काम करते.

राष्ट्रीय उत्पादकता सप्ताहाचाही प्रारंभ

केवळ एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता, १२ ते १८ फेब्रुवारी दरम्यान ‘राष्ट्रीय उत्पादकता सप्ताह’ साजरा केला जातो. या आठवड्यात विविध परिसंवाद, कार्यशाळा, सादरीकरणे, चर्चासत्रे आणि उपक्रमांचे आयोजन करून उत्पादकतेविषयी जनजागृती केली जाते. यामध्ये खासकरून स्टार्टअप्स, लघु व मध्यम उद्योग, महिला उद्योजक आणि नवसंशोधकांना सामावून घेण्यावर भर दिला जातो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘हे’ आहेत जगातील टॉप 5 सर्वात घातक ड्रोन; 50 हजार फूट उंचीवरून शत्रूला करतात नेस्तनाबूत

राष्ट्रीय उत्पादकता दिन २०२५ ची थीम

या वर्षी राष्ट्रीय उत्पादकता दिनाची थीम अत्यंत विचारप्रवृत्त करणारी आहे. 
“कल्पनांपासून परिणामापर्यंत: स्पर्धात्मक स्टार्टअप्ससाठी बौद्धिक संपदा संरक्षण”
(“From Mind to Market: IP for Competitive Startups”).

या थीमचा उद्देश उद्योजक आणि स्टार्टअप्सना त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे बौद्धिक संपदा (Intellectual Property) रूपात संरक्षण करण्याचे महत्त्व समजावणे हा आहे. भारतात स्टार्टअप संस्कृती झपाट्याने वाढत असताना, कल्पनांना व्यापारक्षम उत्पादनामध्ये रूपांतर करण्यासाठी योग्य बौद्धिक संरक्षणाची गरज अनिवार्य आहे.

उत्पादकतेचे महत्त्व आणि उद्दिष्ट

भारताला जागतिक स्तरावर आघाडीवर आणण्यासाठी उत्पादकता, गुणवत्ता आणि नवोन्मेष या त्रिसूत्रीवर भर देणे अत्यावश्यक आहे. राष्ट्रीय उत्पादकता परिषद ही यासाठी धोरणात्मक मार्गदर्शन, प्रशिक्षण, सल्लागार सेवा आणि संशोधनाद्वारे उद्योग, शासन आणि विविध संस्थांना सहाय्य करते. राष्ट्रीय उत्पादकता दिनाचा उद्देश देशातील उत्पादकतेची संस्कृती दृढ करणे, संसाधनांचा प्रभावी वापर, तांत्रिक ज्ञानाचा प्रसार, आणि उद्योग-शासन यामधील समन्वय वाढवणे असा आहे.

नवोपक्रमास प्रोत्साहन देणारा मंच

राष्ट्रीय उत्पादकता दिन आणि सप्ताह हा नवोपक्रमशील व्यक्तींना प्रेरणा देणारा एक व्यापक मंच आहे. स्टार्टअप्ससाठी ही एक संधी आहे की, ते स्वतःच्या कल्पना सुरक्षित करून, त्यांचा आर्थिक लाभ कसा घेतला जाऊ शकतो याची दिशा शोधू शकतात. बौद्धिक संपदा नोंदणी, पेटंट प्रक्रिया, नावनोंदणी, आणि संरक्षणाचे मार्ग यांची माहिती या उपक्रमांद्वारे दिली जाते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bermuda Triangle Mystery : आत्तापर्यंत किती विमाने झाली बेपत्ता अन् किती जणांना गमावला जीव, जाणून घ्या यामागील रंजक तथ्य

राष्ट्रीय उत्पादकता दिन 2025

राष्ट्रीय उत्पादकता दिन 2025 केवळ एक प्रतीकात्मक दिवस नसून, तो देशाच्या प्रगतीच्या दिशेने एक विचारशील पाऊल आहे. नवसंशोधन, कल्पकता, आणि प्रतिस्पर्धात्मकतेस प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यातून शाश्वत आर्थिक वाढ सुनिश्चित करण्यासाठी याचे महत्त्व अधिकच वाढते. ‘कल्पनांपासून परिणामापर्यंत’ ही थीम देशातील तरुण, उद्योजक आणि संशोधकांना त्यांच्या संकल्पनांचे मूर्त रूप देण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.

Web Title: National productivity day 2025 from ideas to results

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2025 | 09:31 AM

Topics:  

  • Business News
  • day history
  • navarashtra special story
  • special news

संबंधित बातम्या

Indian Ecocnomy: २०२५ चा ऐतिहासिक शेवट! जपानला मागे सारत भारत बनली जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था
1

Indian Ecocnomy: २०२५ चा ऐतिहासिक शेवट! जपानला मागे सारत भारत बनली जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था

India Green Development: हरित बंदरांकडे भारताची वाटचाल; ७,५०० किमी किनारपट्टीवर होणार बदल
2

India Green Development: हरित बंदरांकडे भारताची वाटचाल; ७,५०० किमी किनारपट्टीवर होणार बदल

Mumbai Redevelopment 2026: आता मुंबई वाढणार नाही, तर सुधारणार! २०२६ मध्ये पुनर्विकास ठरणार शहराच्या प्रगतीचे इंजिन
3

Mumbai Redevelopment 2026: आता मुंबई वाढणार नाही, तर सुधारणार! २०२६ मध्ये पुनर्विकास ठरणार शहराच्या प्रगतीचे इंजिन

थंडावणार ‘न्यू इयर’चा जल्लोष! Swiggy-Zomato वरून ऑर्डर होणार नाही? काय आहे नेमकं कारण?
4

थंडावणार ‘न्यू इयर’चा जल्लोष! Swiggy-Zomato वरून ऑर्डर होणार नाही? काय आहे नेमकं कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.