Reaper drone maximum altitude 50000 ft :आधुनिक युद्धाच्या संकल्पनेत मोठा बदल झाला असून, पारंपरिक शस्त्रास्त्रांच्या जोडीने आता ड्रोन हे युद्धातील निर्णायक हत्यार बनले आहे. कमी माणसे, कमी खर्च आणि अधिक परिणामकारकतेमुळे जगभरातील संरक्षण दल ड्रोनवर अधिकाधिक अवलंबून राहू लागले आहेत. काही ड्रोन इतके शक्तिशाली आहेत की ते ५० हजार फूटांवरूनही लक्ष्य भेदू शकतात. आज आपण अशाच जगातील टॉप ५ सर्वात घातक ड्रोनबद्दल माहिती घेणार आहोत.
१. MQ-9 Reaper (अमेरिका)
ही यादी सुरू होते जगातील सर्वात प्रगत आणि धोकादायक ड्रोन MQ-9 Reaper पासून. अमेरिका निर्मित या ड्रोनचा वापर अचूक हल्ले आणि गुप्तचर मिशनसाठी केला जातो. हे ड्रोन लेसर मार्गदर्शित बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांनी सज्ज आहे. अफगाणिस्तानमध्ये अल-कायदाच्या अनेक कमांडर्सवर केलेले हल्ले याच ड्रोनच्या मदतीने झाले होते. MQ-9 Reaper ला शत्रूच्या हालचालींवर रिअल टाइम ट्रॅकिंग करण्याची क्षमता आहे आणि ते दीर्घकाळ हवेत राहून लक्ष्य हेरून भेदू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेचे डूम्सडे प्लेन रशियाच्या डूम्सडे रेडिओपेक्षा किती वेगळे? जाणून घ्या त्यांना का म्हणतात ‘विनाशाचे चिन्ह’
२. Bayraktar TB2 (तुर्की)
तुर्कीने विकसित केलेला Bayraktar TB2 सध्या युद्धभूमीवर खूपच चर्चेत आहे. युक्रेन-रशिया युद्धामध्ये याच्या अचूकतेने जगाचे लक्ष वेधून घेतले. हे ड्रोन कमी किमतीत उच्च प्रभावी क्षमता पुरवते. कमी निरीक्षणक्षमता (low observability) आणि स्वायत्त उड्डाण यामुळे हे शत्रूला गृहीत धरायला कठीण ठरते. त्यामुळेच अनेक देश हे ड्रोन मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत.
३. CH-5 Rainbow (चीन)
चीनने तयार केलेला CH-5 Rainbow ड्रोन, अमेरिकन Reaper ला टक्कर देण्यासाठी बनवला गेला आहे. त्याची दीर्घ पल्ल्याची स्ट्राइक रेंज आणि पाळत ठेवण्याची क्षमता चीनच्या संरक्षण धोरणात महत्त्वपूर्ण ठरते. या ड्रोनमध्ये अनेक प्रकारची शस्त्रास्त्रे बसवता येतात. चीनने याची निर्यातही सुरू केली असून, मध्य-आशियाई आणि आफ्रिकन देशांच्या लष्करात या ड्रोनचा वापर सुरू झाला आहे.
४. Heron TP (इस्रायल)
इस्रायलने तयार केलेला Heron TP ड्रोन एक स्ट्रॅटेजिक क्लास UAV (Unmanned Aerial Vehicle) आहे. भारतानेही याचे अनेक युनिट्स खरेदी केले आहेत. या ड्रोनमध्ये क्षेपणास्त्र मार्गदर्शन प्रणाली आणि लाँग-एंड्युरन्स फ्लाइट क्षमतासह गुप्तचर व पाळत ठेवण्याची क्षमता आहे. याचा वापर सीमाभागांतील शत्रू हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी केला जातो.
५. RQ-4 Global Hawk (अमेरिका)
ही यादी पूर्ण होते अमेरिकेच्या अत्याधुनिक RQ-4 Global Hawk ड्रोनने. यामध्ये कोणतेही शस्त्र नसले तरी, याची गुप्तचर, पाळत ठेवणे आणि शोध (ISR) क्षमता जगातील सर्वोत्तम मानली जाते. या ड्रोनला रिअल टाइम डेटा ट्रान्सफर, ३००० किमीहून अधिक अंतराची माहिती गोळा करण्याची क्षमता आहे. याचा वापर प्रामुख्याने अमेरिकन लष्कर आणि नाटो युनिट्स करतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इराणवर राज्य करू शकतात राजघराण्यातील ‘या’ 3 कन्या; रझा पहलवी यांच्या सुंदर मुली राजकीय केंद्रस्थानी
टार्गेट एलिमिनेशनसाठी
ड्रोन हे फक्त हेरगिरीसाठीच नव्हे तर थेट युद्धात टार्गेट एलिमिनेशनसाठीही वापरण्यात येऊ लागले आहेत. आधुनिक टेक्नॉलॉजी, स्वायत्त नियंत्रण आणि अचूक लक्ष्य भेदण्याची क्षमता यामुळे ड्रोन हे २१व्या शतकातील युद्धातील निर्णायक घटक ठरत आहेत. येत्या काळात आणखी प्रगत ड्रोन युद्धभूमीवर दाखल होतील आणि ते मानवी सैन्याची गरज कमी करत दूरवरून लढणारे यंत्रमानव ठरतील, हे निश्चित.