Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navarashtra Navdurga : लैंगिक शोषण, सत्ताधाऱ्यांचा विरोध ते आंतराष्ट्रीय पुरस्काराची मानकरी, प्रियांका कांबळेच्या संघर्षाची कहाणी

जे हात बांगड्या भरुन घर सावरतात तेच हात धिटाईने सामाजात अशी काही कामगिरी बजावतात की जग त्यांना दुर्गेची उपमा देतो. नवराष्ट्र नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ती प्रियांका कांबळे यांच्याशी संवाद साधला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 23, 2025 | 07:33 AM
Navarashtra Navdurga : लैंगिक शोषण, सत्ताधाऱ्यांचा विरोध ते आंतराष्ट्रीय पुरस्काराची मानकरी, प्रियांका कांबळेच्या संघर्षाची कहाणी
Follow Us
Close
Follow Us:

“स्त्री जन्म ही तुझी कहाणी हृदयी अमृत नयनी पाणी” अशी काहीशी ओळख स्त्री जातीची या समाजात आहे. घर सांभाळणारी कुटुंबाला जोडणारी हे गुण तिच्यात उपजत आहेतच पण घराबरोबर ती तिच्या करियरसाठी देखील पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते. खरंतर ही जिजाऊ आणि सावित्रीमाईं आणि अशा अनेक रणरागिणींनी भविष्यातील अनेक स्त्रियांना जगण्याचे धडे दिले आहेत. याच रणरागिणींचा वारसा काही धाडसी स्त्रियांनी पुढे नेत आहे. जे हात बांगड्या भरुन घर सावरतात तेच हात धिटाईने सामाजात अशी काही कामगिरी बजावतात की जग त्यांना दुर्गेची उपमा देतो.

नवराष्ट्र नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ती प्रियांका कांबळे यांच्याशी संवाद साधला आहे. असं म्हणतात की, एखाद्या कठीण परिस्थितीतून आपण जात नाही तोवर समोरच्या व्यक्तीचे होणारे हाल किंवा यातनांची झळ आपल्याला पोहोचत नाही. प्रियांका कांबळे या हेल्पिंग हँड या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी आणि वयात येणाऱ्या मुलींसाठी काम करतात. आजवर देश परदेशात त्यांना सामाजिक क्षेत्रातील विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांच्या कामाची फेमिना या आंतरराष्ट्रीय मासिकाने देखील दखल घेतली. आदिवासी पाड्यात मासिकपाळीबाबत जनजागृती करणं, लैंगिकशोषणाबाबत माहिती देणं यासगळ्यावर संवेदनशील विषयांवर त्या मोलाचं काम करतात.

प्रियांका म्हणतात की, आपल्या देशातील लोकांनी द्विधा मानसिकता आहे. जे एकीकडे दुर्गेची पूजा करतात आणि दुसरीकडे घरातल्याच स्त्रीला हिन दर्जाची वागणूक देतात तिचा छळ करतात एवढं कमी की काय तर घरचाच कर्ता पुरुष कुटुंबातील किंवा परस्त्रीवर बलात्कार करतो. याचं कारण म्हणजे पुर्वापार चालत आलेली मानसिकता. ती अशी की, स्त्री ही अबला आहे, तिन नाजूक, शोषिक, चूल आणि मूल एवढंच सांभाळाव अशी अशा रुढी परंपरा पुर्वापार समाजाकडून लादण्यात आलेल्या आहेत, याचाच गैरफायदा घेत स्त्री म्हणजे उपभोगण्याचं साधन असा गैरसमज रुढ होत गेलेला आहे.

एकीकडे दुर्गेची पूजा आणि दुसरीकडे स्त्रियांवर अत्याचार

जी पाळी स्त्रीच्या असण्याची खूण आहे तिलाच विटाळ समजलं जातं. अगदी आता सुद्धा नवरात्र सुरु झालीये या दिवसात देवीच्या मुर्तीची पूजा करतील पण तेच कोणत्या मुलीला किंवा महिलेला पाळी आली तर तिला या सगळ्यापासून लांब ठेवतीस हे फक्त गावाखेड्यात चालतं का ? तर नाही हे सगळे समजगैरसमज शहरात देखील आहेत.पाळीला विटाळ म्हणणाऱ्यांमध्ये शहरातील नागरिकांचं देखील प्रमाण तितकंच आहे.

…तर मतं कमी मिळतील आणि सत्ता हातून जाईल

शहरातील परिस्थितच एवढी भयाण आहे तर गावच्या ठिकाणी कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, याबाबत सांगताना प्रियांका म्हणाल्या की, मासिकपाळीविषयी गावाखेड्यात एक टॅबू लागलेला आहे. खरंतर पाळीबाबात आदिवासी पाड्यातील महिलांशी संवाद सााधताना त्यांना विश्वास द्यावा लागतो. खरंतर या सगळ्यात अनेकदा अडथळे आलेत ते सत्ताधाऱ्यांकडून. गावातील महिला आणि मुलींना पाळीबाबत आणि लैंगिक शिक्षण मिळालं तर याचा आपल्या मतांवर परिणाम होईल, या कारणासाठी अनेकदा गावातील सत्ताधाऱ्यांकडून विरोध केला जातो. अशा आव्हानांना अनेकदा सामोरं जावं लागतं.

गुन्हे फक्त आता सिद्ध होत आहे बलात्कार आधीपासून होत आहेत

सध्या अनेकदा बातम्यांमध्ये ऐकायला वाचायला येतं की, अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिला किंवा शाळकरी मुलीवर बलात्कार झाल्याने ती गर्भवती राहिली, शाळकरी मुली या आधीही लैंगिक अत्याचाराला बळी पडल्या आहेत आणि आजही पडत आहेत. फरक फक्त इतकाच आहे की याबाबातचे रिपोर्ट आता होत आहेत. सोशल मीडियामुळे खूप कमी वेेळात घटना वाऱ्याच्या वेगाने पुढे येताना दिसत आहेत. बलात्काराचं प्रमाण आज जास्त वाढलंय असं नाही तर या घटना आता समोर यायला लागले आहेत गुन्ह्यांची नोंद आता व्हायला लागली आहे, म्हणून ते दिसून येतं. याच्या आधी असे गुन्हे होत नव्हते का ? तर होते फक्त न्याय मिळत नव्हता आणि गुन्हा सिद्ध होत नव्हता, गुन्ह्याची नोंद होत नव्हती.

पालकांची मानसिकता

या सगळ्यात पालकांची भूमिका काय ? तर प्रत्येक वेळी मुलींना सांगितलं जातं की, नीट वाग, सरळ बस, ओढणी घे, अंगभर कपडे घाल, संध्याकाळ व्हायच्या आत परत ये, मुलांशी फार बोलू नकोस हे सगळं मुलींना सांगितलं जातं. मात्र खरी गरज आहे ते मुलांना पालकांनी लहानपणापासून शिकवण देण्याची. ती म्हणजे मुलींना त्रास देऊ नये, मुलींच्या मनाविरुद्ध तिला हात लावून नये, तिच्याकडे पाहताना तुझी नजर आदराची असावी हे मुलांना पालकांनी सांगायला हवं आहे. मुली सक्षम आहे स्वत:चं संरक्षण करायला पण मुलांना शिकवायला हवं की, तिच्या शरीराकडे वाईट नरजेने पाहू नये. आज शााळेतूनच आणि घरातूनच हे संस्कार मुलांना देणं गरजेचं आहे. मुलांना मासिकपाळी किंवा मुलींच्या शरीरात होणारे बदल याबाबत योग्यरित्या विश्वासात घेत कधीच सांगितलं जातं नाही. हे कुतूहल वाढत जातं आणि त्याचा वाईट परिणाम दिसून येतो. त्यामुळे पालकांनी विश्वासात घेत वयात येणाऱ्या मुलांशी योग्यरित्या संवाद साधणं गरजेचं आहे.

लैंगिक शौषणाला बळी पडणारी अल्पवयीन मुलं-मुली

लैंगिक शोषण हे फक्त मुलींचच होतं का तर नाही? अनेक अल्पवयीन मुलींप्रमाणे मुलांवर देखील लैंगिक अत्याचार होत आहेत. याचमुळे शाळेत जाणाऱ्या मुलामुलींना गुड टच बॅड टच काय असतो हे शाळेतील शिक्षक आणि पालकांनी समजावून सांगणं गरजेचं आहे. आपल्या गुप्तअंगाला आपल्या परवानगीशिवाय कोणीही स्पर्श करु शकत नाही, हे त्यांना समजून सांगण गरजेचं आहे. असं काही घडलंच तर आई वडिलांना याबाबत घाबरुन न जाता लगेच सांगायला हवं हे मुलांना विश्वासात घेऊन सांगणं पालकांच कर्तव्य आहे. त्यासाठी पालकांचं मुलांशी नातं विश्वासाच असणं महत्वाचं आहे, असं सामाजिक कार्यकर्त्या प्रियांका यांनी बलात्कार लैंगिक शोषणाबाबत पालकांनी काय भूमिका घ्यावी याबाबत सांगितलं आहे.

Web Title: Navarashtra navdurga the story of social worker priyanka kamble s and helping hand ngo struggle for sexual abuseperiod awareness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 07:33 AM

Topics:  

  • Navrashtra
  • Navratri 2025
  • special stories

संबंधित बातम्या

Shardiya Navratri 2025: नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रम्हचारिणी देवीची करा पूजा, जाणून घ्या पूजा पद्धत आणि मंत्र
1

Shardiya Navratri 2025: नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रम्हचारिणी देवीची करा पूजा, जाणून घ्या पूजा पद्धत आणि मंत्र

Navratri: 524 वर्ष जुन्या शक्तीपिठाचे PM Modi यांनी केले दर्शन, मंदिराच्या आहेत रहस्यमयी कहाण्या; पौराणिक कथांचे भांडार
2

Navratri: 524 वर्ष जुन्या शक्तीपिठाचे PM Modi यांनी केले दर्शन, मंदिराच्या आहेत रहस्यमयी कहाण्या; पौराणिक कथांचे भांडार

Navratri: नवरात्रीत घटवू शकता 5 किलो वजन, तळलेल्या पदार्थांपेक्षा फॉलो करा ‘हा’ Meal Plan, चरबी वितळेल क्षणात
3

Navratri: नवरात्रीत घटवू शकता 5 किलो वजन, तळलेल्या पदार्थांपेक्षा फॉलो करा ‘हा’ Meal Plan, चरबी वितळेल क्षणात

”आज पहिल्यांदा देवीची स्थापना माझ्या डोळ्यादेखत झाली नाही”, अभिनेत्री पूजा सावंतने केली खंत व्यक्त
4

”आज पहिल्यांदा देवीची स्थापना माझ्या डोळ्यादेखत झाली नाही”, अभिनेत्री पूजा सावंतने केली खंत व्यक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.