Republic Day 2025 Why is a 21-gun salute given on Republic Day On which day is this honour given
आपल्या स्वतंत्र्य भारत संविधानाच्या अंमलबजावणीला ७५ वर्षे पूर्ण होत असून आपण ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. या निमित्त देशभरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. प्रजासत्ताक दिवस हा आपल्या भारत देशाच्या इतिहासातील एक विशेष दिवस आहे.या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राष्ट्रमपती द्रौपदी मुर्मू कर्तव्यपथावर राष्ट्रध्वज फडकवतात आणि २१ तोफांची सलामी देण्यात येते. परंतु तुम्हाला माहित आहे का ही २१ तोफांची सलामी देण्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली आणि कधी कधी हा मान दिला जातो, आज आपण रंजक गोष्टीविषयी जाणून घेणार आहोत.
२१ तोफांची सलामीची परंपरा
२१ तोफांची सलामी ही भारताच्या प्रजासत्ताक दिनासोबतच स्वातंत्र्यदिन आणि परदेशी राष्ट्रप्रमुखांच्या स्वागतासाठी देण्यात येते जाते. या परंपरेचा उगम ब्रिटिश काळात झालेल्या शाही परेडमधून झाला. स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या राष्ट्रपतीपदाच्या शपथविधीनंतर याला अधिकृत मान्यता मिळाली होती. रामचंद्र गुहा यांच्या इंडिया आफ्टर गांधी या पुस्तकानुसार, २६ जानेवारी १९५० रोजी झालेल्या पहिल्या परेडमध्ये राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर आर्मीने तीन राउंडमध्ये बंदूकीतून २१ गोळ्या झाडत सलामी दिली.
Republic Day 2025 Date: 26 जानेवारीलाच का साजरा होतो प्रजासत्ताक दिन? संविधानाचा इतिहास आणि महत्त्व
का देण्यात येते २१ तोफांची सलामी दिली जाते?
प्रजासत्ताक दिनादिवशी २१ तोफांची सलामी ही देशातील सर्वोच्च सन्मान मानली जाते. राष्ट्रपती किंवा परदेशी राष्ट्रप्रमुखांच्या सन्मानार्थ ही सलामी देण्यात येते. २१ तोफांच्या सलामीला राष्ट्रगानाशी समन्वय साधून पूर्ण ५२ सेकंदांचा कालावधी लागतो. राष्ट्रध्वज फडकवताना सुरू झालेले राष्ट्रगान आणि तोफांची सलामी यांचा समर्पक संगम होतो.
तोफांचा वापर
या २१ तोफांची सलामी देण्यासाठी सात तोफा वापरल्या जातात. प्रत्येक तोफेमधून तीन गोळ्यांची फायरिंग करण्यात येते. एकूण २१ गोळ्या फायर केल्या जातात आणि आठव्या तोफेचा समावेश बॅकअप म्हणून ठेवण्यात येतो. या तोफांमधून फक्त आवाज व धूर निर्माण करणारे खास सणोत्सवी गोळे डागले जातात, यामुळे कोणत्याही प्रकारचा अपघात होण्याचा धोका नसतो.
अन्य प्रसंगी दिली जाणारी सलामी
प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, नव्या राष्ट्रपतींच्या शपथविधीसमारंभासह महत्त्वाच्या प्रसंगी २१ तोफांची सलामी दिली जाते. मेरठमध्ये असलेल्या खास आर्टिलरी पथकाचे प्रशिक्षित जवान ही प्रक्रिया अचूकतेने पार पाडतात. यासाठी १२२ जवानांची विशेष तुकडी काम करते. २१ तोफांची सलामी ही भारतातील एक अत्यंत सन्माननीय आणि महत्त्वाची परंपरा आहे. ही सलामी राष्ट्रीय गौरव व एकतेचे प्रतीक मानली जाते. ही सलामी देशाच्या समृद्ध इतिहासाची आणि आधुनिक प्रजासत्ताकाच्या मूल्यांची आठवण करून देते.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सफेद रंगच का? पारंपरिकता जपत करा यावर्षी कमालीचा स्टायलिश लुक, नजर हटणार नाही