२६ जानेवारीला दरवर्षी प्रजासत्ताक दिवस साजरा केला जातो. शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालय इत्यादी अनेक अनेक ठिकाणी धवजरोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. अनेकजण या दिवशी पांढऱ्या किंवा ऑफ व्हाईट, मोती रंगाची साडी परिधान करतात. तर काही महिला तिरंग्यातील कोणत्याही एका दोन रंगाचे कॉम्बिनेशन असलेली साडी परिधान करतात. मात्र दरवर्षी तोच तोच टिपिकल लुक करून पांढऱ्या रंगाची साडी नेसण्यापेक्षा पांढऱ्या रंगाच्या साडीवर या पद्धतीची स्टायलिश लुक नक्की करून पहा. (फोटो सौजन्य – pinterest)
प्रजासत्ताक दिनी पांढऱ्या साडीवर टिपीकल लुक न करता 'या' पद्धतीने करा स्टायलिश लुक
पांढऱ्या रंगाच्या सुंदर साडीवर तुम्ही नेहमीच टिपिकल पांढराच ब्लॉऊज न घालता गुलाब, लाल किंवा हिरव्या रंगाचा सुंदर डिझायनर ब्लॉऊज परिधान करू शकता.
सॉफ्ट कॉटनमध्ये बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या उपलब्ध आहेत. त्यात तुम्ही या पद्धतीची सुंदर नक्षीकाम केलेली साडी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नेसू शकता. यामध्ये तुमचा लुक मॉर्डन आणि क्लासी दिसेल.
नारंगी, सफेद आणि हिरव्या रंगाचे कॉम्बिनेशन असलेली साडी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नेसण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. ही साडी कॉटन किंवा शिफॉन फॅब्रिकमध्ये तुम्ही घेऊ शकता.
काठापदराच्या साड्यांमध्ये सुद्धा अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामध्ये तुम्ही या पद्धतीच्या सुंदर साड्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नेसू शकता. या तुमचा लुक खूप सुंदर आणि उठावदार दिसेल.
कॉटन फॅब्रिकमध्ये बाजारात अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामध्ये तुम्ही काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे कॉम्बिनेशन असलेली सुंदर साडी परिधान करू शकता.