फोटो सौजन्य- सोशल मीडिया
पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी यांचा आजच्या दिवशी 24 डिसेंबर 1899 ला जन्म दिवस झाला. त्यांचा जन्म कोकणातील पालगड या गावी झाला असून, ते मानवतावादी, समाजसेवक, स्वातंत्र्य सैनिक याशिवाय मराठी साहित्यिक आणि थोर विचारवंत तसेच, आंतर- भारती चळवळीचे प्रवर्तक होते. त्यांच्या दमदार लेखणीतून पुढील पिढीला साहित्याचा भरघोस साठा उपलब्ध करुन दिला. त्यांच्या जयंतीनिमित्ती त्यांचा ‘जीवनप्रवास’ जाणून घेऊया.
आज 24 डिसेंबर रोजी साने गुरुजींची 125 वी जयंती आहे. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या आठवड्यात आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, महाराष्ट्रातील कोकण भागातील तीन ते चार हजार लोकसंख्येच्या पालगड नावाच्या एका छोट्याशा गावात साने गुरुजींचा जन्म झाला म्हणजेच येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या एक दिवस आधी आणि दोन हजार एकशे वर्षे एकवीस दिवस आधी करुणा, प्रेम, दया आणि शांतीचा संदेश देणाऱ्या प्रभु येशूच्या जन्मदिवसाच्या अगदी एक दिवस आधी. संपूर्ण महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वरांच्या नंतर (माऊली) म्हणून ओळखले जाणारे मातृहृदयी सानेगुरुजी यांचा जन्म.
ज्योतिषशास्त्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
साने गुरुजींचे प्राथमिक शिक्षण पालगडला माध्यमिक शिक्षण दापोली, औंध, पुणे येथे. बी. ए. ची पदवी घेऊन (१९२२) मुंबई विद्यापीठाची एम. ए. ची पदवी (१९२४) त्यांनी संपादन केली. अमळनेर ( जि.जळगाव ) येथील तत्त्वज्ञान मंदिरात अधिछात्र (फेलो) पुढे तिथल्याच ‘प्रताप हायस्कूल’मध्ये शिक्षक व वसतिगृहप्रमुख म्हणून काम केले. 1930-32 च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीतील सहभागामुळे धुळे, नाशिक आणि तिरुचिरापल्ली येथे तुरुंगवास भोगला.
यादरम्यानच्या काळात साक्षरतेचे वर्ग चालविणे, खादी विकणे, काँग्रेससाठी निधी जमविणे, देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतलेल्यांच्या तसेच देशासाठी बलिदान केलेल्यांच्या कुटुंबियांना साहाय्य करणे इ. कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले. जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांचे निर्मूलन झाले पाहिजे, अशी त्यांची धारणा होती.
स्वप्नशास्त्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
1946 मध्ये पंढरपूरचे विठ्ठलमंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे, म्हणून त्यांनी प्राणांतिक उपोषण केले आणि त्यांच्या मंदिरप्रवेशाचा मार्ग मोकळा करून दिला. तिरुचिरा-पल्लीच्या तुरुंगात असताना त्यांनी विश्वभारतीच्या धर्तीवर ‘आंतर-भारती’ ही संस्था स्थापन करण्याचा संकल्प केला.
कुरल हा तमिळ भाषेचा वेद मानला जातो. ‘कुरल’ म्हणजे दोन टप्पे. आणि ‘कुरुवल्लुवर’ मध्ये 1330 पायऱ्या आहेत. अशा महत्त्वाच्या साहित्यकृतींचा अनुवाद करण्याबरोबरच त्यांनी ‘पत्री’हा काव्यसंग्रहही लिहिला आहे. याशिवाय गुरुजींनी त्रिचनपल्लीच्या तुरुंगातील जीवनावर आधारित चार नाटके लिहिली आहेत, तसेच काही इंग्रजी आणि फ्रेंच भाषेतील लेखकांच्या साहित्याचा अनुवादही केला आहे. 23 मार्च 1931 रोजी सानेगुरुजींची त्रिचनापल्ली तुरुंगातून सुटका झाली. आणि त्याच दिवशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना लाहोर जेलमध्ये रात्री फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, त्या शिक्षेच्या विरोधात अमळनेरमध्ये सभा घेऊन गुरुजींनी इंग्रज सरकारच्या या कुप्रथेचा निषेध केला.