Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सत्ताधा-यांसाठी ‘एसटी दुभती गाय’! जनतेच्या भल्याच्या नावाने महामंडळाचे खाजगीकरण करत राजकीय पोळी भाजण्याचा डाव; सत्ताधारी आणि विरोधी राजकीय नेत्यांचे साटेलोटे

गेल्या वीस दिवसांपेक्षा जास्त काळ राज्यातील ग्रामिण भागाची जीवनवाहिनी असलेल्या ‘एश्टी’चा संप सुरू आहे. स्व यशवंतराव चव्हाण यांनी एसटी महामंडळाची स्वायत्त महामंडळ म्हणून स्थापन झाल्यानंतर पहिला प्रवास कराड ते मुंबई असा लालपरीने केल्याचे मोठ्या अभिमानाने सांगण्यात येते. शेतकरी आणि कामकरी यांची ‘ग्रामीण भागात नाळ’ असल्यासारखी ही एस टी बस गेल्या काही वर्षापासून सातत्याने म्हाता-या गाईसारखी रोडावत का गेली? आज तीची जर्जर अवस्था का झाली? आणि सध्याच्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी सांगण्यात येणारा विलीनीकरणाचा पर्याय खरेच रामबाण उपाय आहे का? या प्रश्नांची उत्तरे एसटी महामंडळात चाळीस वर्षापेक्षा जास्त काळ काम केलेल्या जाणाकरांशी चर्चा केल्यानंतर सहजपणे समोर येतात(The intrigue of privatizing the corporation in the name of the welfare of the people; Satelote of ruling and opposition political leaders)

  • By किशोर आपटे
Updated On: Nov 28, 2021 | 06:29 PM
सत्ताधा-यांसाठी ‘एसटी दुभती गाय’! जनतेच्या भल्याच्या नावाने महामंडळाचे खाजगीकरण करत राजकीय पोळी भाजण्याचा डाव; सत्ताधारी आणि विरोधी राजकीय नेत्यांचे साटेलोटे
Follow Us
Close
Follow Us:

सत्ताधा-यांना ‘एसटीची दुभती गाय दिसते

सध्याच्या सत्ताधा-यांना ‘एसटीची दुभती गाय दिसते’ आहे, मात्र गेल्या वीस वर्षात झालेले शोषण ‘पण लक्षात कोण घेतो’ अशी अवस्था झाली आहे, असे या जाणकारांचे मत आहे. या जाणकारांनी मोलाची माहिती पोटतिडीकेतून देताना आमचे नांव मात्र छापू नका अशी विनंती करावी याचा अर्थ त्यांचे या महामंडळावर किती मातृवत प्रेम असेल त्याची कल्पना न केलेली बरी! या सूत्रांनी सांगितले की, सन २००० पर्यंत हा एसटीचा डोलारा चांगला चालला होता मात्र गेल्या वीस वर्षात दर चारवर्षानी होणारी मूळ वेतनातील वाढ न झाल्याने एसटी कर्मचा-यांची स्थिती केविलवाणी झाली आहे. तर गेल्या सहा वर्षापासून अर्ध खाजगीकरणाचा प्रयोग करत सत्ताधारी नेत्यानी एसटीचा नफा दुभत्या गायीच्या दूधावरच्या सायीसारखा खावून टाकल्याने महामंडळाला हे असे वाईट दिवस पहावे लागत असल्याचे या सूत्रांनी सांगितले.

मूळ पगारामध्ये आठवर्ष साडेतीनशे रुपये वाढ

या जाणकारांनी सांगितले की, सन २००० ते २००४  त्यानंतर २००४  ते २०००८ या दोन्ही करारामध्ये मूळ पगारामध्ये वाढ झाली नाही फक्त साडेतीनशे रुपये वाढ आठ वर्षे देण्यात आली, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन कमी राहिले. त्या अनुषंगाने मिळणारे भत्ते, महागाई भत्ता घरभाडे भत्ता यामध्ये वाढ न झाल्याने कर्मचाऱ्यांचे पगार महागाईच्या प्रमाणात वाढले नाहीत. या नंतरच्या काळातही कामगारांना केवळ आश्वासनेच मिळत राहिली आणि २०१४ नंतर तर छुप्या खाजगीकरणाच्या दावणीला बांधत महामंडळातील नफा पळविण्याचे काम झाल्याचा आरोप या जाणकारांनी केला आहे.

सत्ताधारी आणि विरोधी राजकीय नेत्यांचे साटेलोटे

सध्याच्या स्थितीत संप करण्याची वेळ कामगारांवर का आली याची माहिती घेताना विदारक सत्य समोर येते. मात्र विलीनीकणाची मागणी देखील अतिशयोक्ती असून त्यात सत्ताधारी आणि विरोधीपक्षांतल्या राजकीय नेत्यांचे साटेलोटे असल्याचा आरोप या सूत्रांनी केला.  त्यांनी सागंगिले की, विलीनीकरणाला आमचा विरोध आहे. एसटी महामंडळ हे स्वायत्त महामंडळ आहे. त्याच्या कारभाराचा निर्णय महामंडळ घेते. त्यामुळे निर्णय लवकर होतात. महाराष्ट्र एसटी महामंडळ संचालक हे महामंडळाचे कारभाराचे नियंत्रण करतात.  एसटी कामगारांसाठी दर चार वर्षांनी युनियन व संचालक मंडळ यांच्यामध्ये संमतीने पगार वाढीचे करार केले जातात. कामगारांना महागाई, घरभाडे भत्ता, शहरी भत्ता हा शासनाच्या नियमाप्रमाणे मिळतो. फक्त मूळ व श्रेणी युनियन व महामंडळ ठरवते. कामगारांना वैद्यकीय मदत ही सरकारी परिपत्रकानुसार मिळते. एसटी अपघातात प्रवासी जखमी झाला अथवा मृत्यू पावला तर नियमाप्रमाणे त्याला आर्थिक मदत महामंडळातर्फे केली जाते. तसेच एसटी कामगारांचे निधन झाले तर त्याला एसटीमध्ये एक मृत्यू फंड निर्माण केला आहे. त्यातून त्याला आर्थिक मदत होते.

महामंडळाची स्वायत्त यंत्रणा सक्षम

कामगारांचा भविष्य निर्वाह निधीचा एसटी महामंडळाने एक ट्रस्ट केला आहे. त्यामुळे निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला निवृत्तीच्या दिवशीच भविष्य निर्वाह निधी व उपदान देयकाचे पैसे दिले जातात. भविष्य निर्वाह निधी मधून कामगाराला प्रसंगी कर्ज दिले जाते व ते सुलभ २४  हप्त्यात वसूल केले जाते. घर बांधणी कर्ज त्याला भविष्य निर्वाह निधी मधून दिले जाते. कामगारांना विशेषतः चालकांना ४० दिवसाचे ट्रेनिंग देऊन  कामावर घेतले जाते. त्यांची वेळोवेळी मेडिकल तपासणी होते. विनाअपघात सेवा बद्दल चालकांना ५, १०, १५, २०, २५, ३० असे दर पाचव्या वर्षी बक्षीस दिले जाते. पुरस्कार दिला जातो. कामगारांच्या मुलांना मुलींना शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाते. कामगारांसाठी विविध प्रकारच्या खेळाची महोत्सव स्पर्धा आयोजित करून कामगारांना प्रोत्साहित करतात. विभागांच्या नाट्यस्पर्धा घेऊन यांना प्रोत्साहित केले जाते. एसटीच्या आर्थिक कारभारावर सरकारचे  नियंत्रण आहे.

महानियंत्रक लेखापरिक्षक (एजी) कडून आर्थिक व्यवहाराचे ऑडिट केले जाते.  एसटी महामंडळाकडून सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट व स्थानिक स्वराज्य संस्था यांना २७% कर भरणा होतो. प्रवासी जनतेला म्हणजेच शालेय विद्यार्थ्यांना एक तृतीयांश भाडे घेऊन पास दिले जातात. अंध, अपंग, पत्रकार ,दुर्धर आजाराने पीडित असलेले प्रवासी यांना तिकीट दरात सवलत दिली जाते त्या अंतर्गत  राज्य सरकार अनुदान देते. दरवर्षी ताळेबंद तयार करून तो शासनाला सादर केला जातो. दरवर्षी कामगारांना सानुग्रह अनुदान तसेच फेस्टिवल ऍडव्हान्स दिला जातो. शासनाच्या नियमाप्रमाणे एसटी महामंडळ प्रवासाचे तिकीट किती असावे याचे स्वातंत्र्य महामंडळाला आहे.

चालक-वाहकांना व इतर ट्राफिक कर्मचाऱ्यांना ड्रेसचे कापड मिळते. तसेच त्यांना धुलाई भत्ता मिळतो. यांत्रिकी कामगारांना कपडा व जर्सी बूट मिळतात. तसेच महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना काही विषयाचे ट्रेनिंग घ्यायचे असल्यास भोसरी पुणे येथे महामंडळाचे सुसज्ज ट्रेनिंग सेंटर आहे.एसटी महामंडळ हे स्वतंत्र असल्यामुळे नोकर भरती बाबत, बांधकाम विषयक कामे व एसटी साठी लागणारे स्पेअर पार्ट हे टेंडर प्रक्रिया पूर्ण करून विकत घेऊ शकते. एसटी महामंडळाला लागणारे ऑटो स्पेअर पार्ट ए.एस.आर.टी. यु.या संस्थेकडे नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांकडून खरेदी करते.टायर खरेदी संदर्भात कंपन्यांशी करार करून ४५ हजार किलोमीटर नवीन टायर धाव अपेक्षित असून जर किलोमीटर कमी झाल्यास महामंडळ कंपन्यांवर नुकसानभरपाईचा क्लेम करते.  स्पेअर पार्ट चेक करून निकृष्ट आढळल्यास ते परत करून त्या कंपन्यांकडून पैसे वसूल करतात.

एसटी महामंडळात  आधुनिकीकरणाची कास
पूर्वी एसटीच्या प्रिंटिंग प्रेस मधून प्रवासी तिकिटे छापली जायची व ती तिकिटे २४८ आगारांमध्ये पाठवण्यात यायची. परंतु एसटी महामंडळाने  आधुनिकीकरणाची कास धरल्याने नवीन टिकीट मशीन खरेदी केल्यामुळे वाहकांना सुलभतेने प्रवाशांना तिकीट  देता येते व एसटीच्या उत्पन्नाची गळती थांबून उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे. तसेच आधुनिक टेक्नॉलॉजी चा वापर करून वायफाय सेवा प्रवासी जनतेला उपलब्ध करून दिली आहे. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले ही शासनाच्या परीपत्रकाप्रमाणे  मंजूर केली जातात. कर्मचाऱ्याला दुर्धर आजारासाठी मेडिकल ऍडव्हान्स दिला जातो व ॲडव्हान्स बिले मंजूर करून ऍडजेस्ट केला जातो. क्षयग्रस्तासाठी शासनाच्या परिपत्रकानुसार तीन वेळा ११ महिने विशेष रजा मंजूर करण्यात येते.त्या कर्मचाऱ्यांची मेडिकल बिले कपात न करता मंजूर केली जातात. कर्मचाऱ्यांना प्रवास भत्ता हा शासनाच्या परिपत्रक प्रमाणे मंजूर करण्यात येतो.

वेळोवेळी वाढ हाच सध्याच्या स्थितीत महत्वाचा विषय

कामगारांच्या फक्त मूळ पगारात मागील काळात प्रलंबित वाढ या व्यतिरिक्त शासनाप्रमाणे त्यात वेळोवेळी वाढ हाच सध्याच्या स्थितीत महत्वाचा विषय आहे. म्हणून एसटी कर्मचाऱ्यांचे विलिनीकरण शासनामध्ये करण्यास आमचा विरोध आहे. सन२००० ते२००४ व २००४ ते २००८ या दोन्ही करारामधील मूळ पगाराची वाढ त्या अनुषंगाने मिळणारे भत्ते यामध्ये वाढ करताना २० ०८ ते २०२१ दरम्यानच्या फरकाची रक्कम अशी तरतूद जर केली तर कर्मचाऱ्यांना येत्या वर्षभरात भरपूर न्याय दिल्यासारखे होणार आहे. त्यामुळे  एसटी कामगारांचे विलिनीकरण हा पर्याय नाहीच मात्र स्वार्थी राजकारण करत गिरणी कामगारांप्रमाणे या कामगारांना रातोरात बाहेर काढून जनतेच्या भल्याच्या नावाने महामंडळाचे अर्ध्या रात्री खाजगीकरण करत राजकीय नेत्यांची पोळी भाजण्याचा डाव आहे असे या सूत्रांनी ठामपणे सांगितले.

[read_also content=”Nostradamus Predictions 2022: समुद्रात महाभयंकर स्फोट, तीन दिवस जग अंधारत आणि… नास्त्रेदमसच्या भविष्यवाणी सांगते 2022 आहे खूपच डेंजर; भविष्यवाणी वर्षानुवर्षे खरी ठरतेय https://www.navarashtra.com/world/nostradamus-predictions-2022-massive-eruption-at-sea-flood-three-days-darkening-the-world-and-nostradamus-predicts-2022-is-very-dangerous-nrvk-206110.html”]

[read_also content=”तुझ्या मैत्रिणीला माझ्याशी सेक्स करायला सांग नाही तर मी तुझ्या सोबत सेक्स करणार; पोलिसाने कॉलेज तरुणावर अनैसर्गिक बलात्कार केला आणि… https://www.navarashtra.com/latest-news/paschim-maharashtra/sangli/unnatural-rape-on-college-student-by-the-police-in-sangli-nrvk-205069.html”]

[read_also content=”बायकोच्या तोंडावर लघवी करुन नवऱ्याने दिला ट्रिपल तलाक; कारण ऐकून पोलिसांनीही बसला धक्का https://www.navarashtra.com/latest-news/triple-talaq-husband-gives-triple-divorce-by-urinating-on-wifes-mouth-because-the-police-were-shocked-to-hear-that-nrvk-204330.html”]

[read_also content=”घरात असेल चांदीचा मोर तर लक्ष्मी थुई थुई नाचेल; इतका पैसा येईल की कधीच पैशांची कमतरता भासणार नाही https://www.navarashtra.com/religion/religion/silver-peacock-idol-in-your-home-can-bring-lots-of-money-nrvk-204795.html”]

[read_also content=”‘या’ स्पामध्ये माणस नाही तर साप करतात शरीराचा मसाज! डझनभर साप व्यक्तीच्या अंगावर सोडले जातात आणि मग… https://www.navarashtra.com/lifestyle/snake-massage-in-egypt-spa-nrvk-204802.html”]

[read_also content=”लग्नानंतर पहिल्यांदाच नव्या नवरीला घरी एकटं सोडून रात्रपाळीला गेला होता नवरा; एका रात्रीत होत्याचं नव्हत झाल https://www.navarashtra.com/thane/excitement-in-virar-on-ain-diwali-the-body-of-the-newlyweds-was-found-naked-nrvk-199463.html”]

[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]

[read_also content=”प्रेम विवाह केल्याची भयानक शिक्षा! नातवाचे प्रेत बाजूला पडले असताना पोटच्या मुलीवर बापाने बलात्कार केला आणि त्यानंतर… https://www.navarashtra.com/latest-news/bhopal-terrible-punishment-for-love-marriage-the-father-raped-the-girl-while-her-grandsons-body-was-lying-on-the-side-and-nrvk-204413.html”]

[read_also content=”हा तर म्हणजे निष्काळजीपणाचा कहरचं! पोषण आहारासोबत शिजवले सापाचे पिल्लू; विषबाधेमुळे 50 विद्यार्थी रुग्णालयात दाखल https://www.navarashtra.com/india/snake-puppies-cooked-with-nutritious-food-in-karnataka-50-students-hospitalized-due-to-poisoning-nrvk-204379.html”]

[read_also content=”जन्मदात्या आईनेच आपल्या दोन मुलांना जमिनीवरुन आपटून आपटून मारले; मुलं मेल्याची खात्री करण्यासाठी असं काही केलं की पोलिसही हादरले- पाहा व्हिडिओ https://www.navarashtra.com/latest-news/in-delhi-a-mother-killed-her-children-nrvk-198840.html”]

[read_also content=”काय म्हणायचं या बाईला? ना लाज, ना लज्जा… पटवला स्वत:पेक्षा 15 वर्षाने लहान बॉयफ्रेंड! महिन्याला तब्बल 11 लाख पगार देऊन त्याच्याकडून करुन घ्यायची नको ती कामं https://www.navarashtra.com/latest-news/rich-woman-pays-rs-11-lakh-a-month-to-boyfriend-15-years-younger-than-her-to-do-housework-nrvk-192294.html”]

[read_also content=”टेंन्शन कमी होत डोकंही राहतं शांत; शिव्या देण्याचे आहेत जबरदस्त फायदे https://www.navarashtra.com/latest-news/tension-decreases-head-stays-calm-swearing-has-tremendous-benefits-185488.html”]

[read_also content=”तालिबान किती श्रीमंत? अफू लागवडीसह आणखी काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत https://www.navarashtra.com/latest-news/how-rich-is-the-taliban-what-else-is-the-source-of-income-along-with-poppy-cultivation-170106.html”]

[read_also content=”‘या’ मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू; संशोधक व वैज्ञानिक मृत्युच्या भितीने इथे जात नाही https://www.navarashtra.com/latest-news/pluto-is-the-ancient-temple-of-god-in-turkey-if-anyone-enters-this-temple-he-is-killed-nrvk-164606.html”]

[read_also content=”काय म्हणायचं या बाईला? कुत्र्याशी SEX केला? न्यायालयात खटला सुरु https://www.navarashtra.com/latest-news/woman-accused-of-sexually-abusing-dog-nrvk-177537.html”]

[read_also content=”सायन्स फॅक्ट; कच्चे सॅलड खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण https://www.navarashtra.com/latest-news/science-fact-eating-raw-salads-invites-many-ailments-nrvk-164609.html”]

[read_also content=”किराणा दुकानातही मिळणार वाईन; पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण https://www.navarashtra.com/latest-news/wine-will-also-be-available-at-grocery-stores-uddhav-thackeray-will-fulfill-pawars-wish-nrvk-164211.html

[read_also content=”विकृताने अचानक अनोखळी महिलेला घट्ट मिठी मारली अन्… गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार https://www.navarashtra.com/latest-news/the-pervert-suddenly-hugged-a-strange-woman-and-shocking-type-at-the-crowded-dadar-railway-station-nrvk-163725.html”]

Web Title: The intrigue of privatizing the corporation in the name of the welfare of the people satelote of ruling and opposition political leaders nrvk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2021 | 06:25 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.