Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Digital Census: दोन टप्पे, देशातील पहिली डिजिटल जनगणना; ३४ लाख कर्मचारी स्मार्टफोनवरून करणार माहिती संकलन

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया (RGI) कार्यालय आगामी २०२७ ची जनगणना संपूर्ण वेळेत नियंत्रित करण्यासाठी आणि व्यवस्थापनासाठी एक विशेष वेबसाइट विकसित करत आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 08, 2025 | 12:18 PM
Digital Census: दोन टप्पे, देशातील पहिली डिजिटल जनगणना; ३४ लाख कर्मचारी स्मार्टफोनवरून करणार माहिती संकलन
Follow Us
Close
Follow Us:
  • देशातील पहिली डिजिटल जनगणना
  • ३४ लाख जनगणना कर्मचारी
  • मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर
पुढील वर्षी सुरू होणारी जनगणना ही देशातील पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना ठरणार आहे. यासाठी तब्बल ३४ लाख जनगणना कर्मचारी पहिल्यांदाच त्यांच्या स्वतःच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून माहिती संकलनाचे काम करतील.मिळालेल्या माहितीनुसार, भारताचे रजिस्ट्रार जनरल यांनी नियुक्त केलेले पर्यवेक्षक आणि कर्मचारी हे जनगणनेचे सर्व काम अँड्रॉइड किंवा आयओएस ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या फोनवरून करतील. विशेष अॅपच्या मदतीने संकलित माहिती थेट केंद्रीय सर्व्हरवर हस्तांतरित केली जाणार आहे. ही प्रक्रिया पारंपरिक कागदी पद्धतीऐवजी पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार असल्यामुळे, जनगणना अधिक वेगवान, अचूक आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

NIA Raids: दहशतवादी कट रचल्याप्रकरणी एनआयएची मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये २२ ठिकाणी छापे

एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, जनगणना करणारे सर्व कर्मचारी या प्रक्रियेत मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर करणार आहेत. हे अॅप्लिकेशन २०२१ च्या जनगणनेच्या कामासाठी विकसित करण्यात आले होते. हे अॅप्लिकेशन अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या फोन्सला सपोर्ट करतील. विशेष बाब म्हणजे हे अॅप्स इंग्रजी तसेच इतर प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. चार वर्षे जुन्या या अॅप्लिकेशनमध्ये आता अनेक तांत्रिक सुधारणाही करण्यात आल्या आहेत. या सुधारणांमुळे कोणताही जनगणना कर्मचारी ते सहज आणि सोप्या पद्धतीने ऑपरेट करू शकेल आणि त्यात जनगणनेसाठी डेटा अपलोड करू शकेल.

सर्व इमारतींचे प्रथमच जिओ-टॅगिंग

२०११ मध्ये झालेल्या सामाजिक-आर्थिक जातींच्या जनगणनेदरम्यान, जनगणना कर्मचाऱ्यांनी कोणत्याही कागद न हाताळता काम केले होते. पण त्यावेळी जनगणना कर्मचाऱ्यांना टॅब्लेट देण्यात आले होते. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) या कंपनीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना हे टॅब्लेट देण्यात आले होते. पण यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार असून २०२७ च्या जनगणनेत प्रथमच, सर्व निवासी आणि अनिवासी इमारती जिओ-टॅग केल्या जातील.

सर्व डेटा कर्मचारी पातळीवरच डिजिटल

याशिवाय अहवालानुसर, जर काही कारणास्तव जनगणना कर्मचारी कागदावर कोणताही डेटा गोळा करत असेल, तर त्याला तो एका समर्पित वेब पोर्टलवर अपलोड करावा लागेल जेणेकरून नंतर तो स्कॅन करण्याची किंवा तो डेटा प्रविष्ट करण्याची आवश्यकता राहणार नाही.  म्हणजेच,  जनगणनेच्या कामात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांच्या पातळीवर सर्व प्रकारच्या जनगणनेचा डेटा डिजिटल करण्याची ही पहिलीच वेळ असेल. यामुळे, जनगणनेचे निकाल लवकरच येण्याची शक्यता आहे.

1 वर्षात भारतात कॅन्समुळे ‘इतक्या’ लाख लोकांचा मृत्यू, WHO चा इशारा; वेगाने पसरत आहे आजार

२०२७ ची जनगणना : १४,६१८ कोटींच्या बजेटसह दोन टप्प्यात पार पडणार

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया (RGI) कार्यालय आगामी २०२७ ची जनगणना संपूर्ण वेळेत नियंत्रित करण्यासाठी आणि व्यवस्थापनासाठी एक विशेष वेबसाइट विकसित करत आहे. RGI ने या प्रक्रियेसाठी १४,६१८.९५ कोटी रुपयांचे बजेट मागितले आहे.

जनगणना दोन टप्प्यांमध्ये केली

पहिला टप्पा: एप्रिल ते सप्टेंबर २०२६ पर्यंत चालेल, ज्यामध्ये देशभरातील घरांची यादी तयार केली जाईल.

दुसरा टप्पा: फेब्रुवारी २०२७ मध्ये सुरू होईल, ज्यामध्ये संपूर्ण लोकसंख्या जनगणनेचे काम पूर्ण केले जाईल.

विशेष बाब म्हणजे, लडाख, जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये हे काम सप्टेंबर २०२६ मध्येच पूर्ण केले जाईल.

यंदाच्या जनगणनेत घरातील सदस्यांच्या जातींची माहिती गोळा केली जाणार आहे, तसेच नागरिकांना स्वतःची गणना करण्याचा पर्याय देखील दिला जाईल, जे डिजिटल जनगणनेची प्रमुख वैशिष्ट्ये ठरणार आहेत.

 

Web Title: Three phases countrys first digital census 34 lakh employees will collect information from smartphones

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 12:14 PM

Topics:  

  • Caste Census
  • Census

संबंधित बातम्या

Census 2027: भारतात 2027 मध्ये कशी होणार जनगणना, यावर्षी ही प्रक्रिया कशी आहे वेगळी; पूर्ण Process घ्या जाणून
1

Census 2027: भारतात 2027 मध्ये कशी होणार जनगणना, यावर्षी ही प्रक्रिया कशी आहे वेगळी; पूर्ण Process घ्या जाणून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.