पाणी न प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतात
पाणी प्यायल्याशिवाय आपण जीवन जगू शकत नाही. शरीरासाठी पाणी आवश्यक आहे. रोजच्या आहारात ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. पण अनेक लोक काही कारणांमुळे उपोषण करण्यासाठी बसतात. हे उपोषण करताना पाण्याचा एकही थेंब प्यायला जात नाही. अधिक काळ पाणी न प्यायल्याने शरीर डिहायड्रेट होण्यास सुरुवात होते. शरीर डिहायड्रेट झाल्यानंतर अनेकदा रुग्णाला रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याची वेळ येते. निरोगी शरीरासाठी पाणी आवश्यक आहे.पण एखाद्या व्यक्तीला पाणी दिलेच नाहीतर तो जगू शकतो? पाणी न पिता ती व्यक्ती किती दिवस जगू शकते? असे अनेक प्रश्न तुम्हाला देखील पडले असतील ना. चला तर जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य-istock)
जेवण न केल्याने शरीरामधील कार्बोहायड्रेड नष्ट होण्यास सुरुवात होते. तसेच शरीरातील चरबी नष्ट होते. ज्या व्यक्तींचे शरीर जास्त हेल्दी आणि शरीरामधील फॅटचे प्रमाण जास्त असल्यास तो व्यक्ती जास्त दिवस जगू शकतो. अधिक काळ पाणी किंवा जेवण न जेवल्याने शरीरातील प्रोटीन पूर्णपणे संपून जातात. यामुळे आरोग्य बिघडून रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येते.
पाणी न प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतात
निरोगी जीवनशैली जगण्यासाठी आहारात शरीराला आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन केले जाते. पण पण जेवण न जेवल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. अनेक लोक मागण्या पूर्ण करण्यासाठी उपोषणाला बसतात.उपोषण केल्याने मागण्या मान्य होतील असे अनेकांना वाटते, पण यामुळे तब्येत बिघडण्याची शक्यता असते. महात्मा गांधी, अण्णा हजारे, त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी उपोषण केली आहेत. डॉक्टरांच्या मते, अन्नपाण्याशिवाय माणूस आठ दिवस जगू शकतो. तसेच त्या व्यक्तीजवळ पाणी असणे आवश्यक आहे. निरोगी जीवनशैली जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे.