
What is the exact difference between Children’s Day on 14th and 20th November
Children’s Day 2025 : बालपण (Childhood) हा प्रत्येक समाजाचा पाया, आणि मुलांचे हसरे चेहरे हे कोणत्याही देशाचे उज्ज्वल भविष्य मानले जाते. पण २०२5 मध्ये एक गोष्ट अनेकांना आश्चर्यचकित करते बालदिन २० नोव्हेंबरला का साजरा केला जात आहे? कारण भारताने पारंपारिकरित्या १४ नोव्हेंबरचा बालदिन स्वीकारलेला आ हे.तथापि, १४ नोव्हेंबर हा भारताचा राष्ट्रीय बालदिन (National Children’s Day) , तर २० नोव्हेंबर हा संयुक्त राष्ट्रांचा जागतिक बाल हक्क दिन (World Children’s Day) आहे. दोन्ही दिवसांच्या मागील कथा, संदेश आणि उद्दिष्टे वेगवेगळी आहेत. चला तर जाणून घेऊया या दोन्ही दिवसांचा इतिहास आणि त्यांच्या साजरेपणातील फरक.
याला १९५४ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी अधिकृत मान्यता दिली. ही तारीख निवडण्याची दोन मोठी ऐतिहासिक कारणे आहेत:
या दिवशी संयुक्त राष्ट्रांनी जगभरातील मुलांचे मूलभूत हक्क आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्याचा जाहीरनामा स्वीकारला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh Crisis : शेख हसीना नाही तर तुरुंगात असलेली ‘ही’ महिला उलथवून टाकू शकते बांगलादेशातील सत्ताकारण; वाचा कसे?
हे जगभरातील मुलांच्या संरक्षणासाठी, शिक्षणासाठी आणि समान संधींसाठीचे सर्वात महत्वाचे आंतरराष्ट्रीय करारांपैकी एक आहे.
म्हणूनच UNICEF, WHO, UNESCO सारख्या मोठ्या संस्था २० नोव्हेंबरला जागतिक स्तरावर मुलांचे हक्क, सुरक्षितता आणि भविष्य याबाबत जनजागृती करतात.
भारतामध्ये १४ नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन साजरा केला जातो.
ते मुलांवर अपार प्रेम करीत आणि त्यांनाच भारताचे भविष्य मानत. त्यामुळे भारताने फक्त सांस्कृतिक आणि भावनिक आधारावर हा दिवस स्वीकारला.
हा दिवस भारतीय परंपरा आणि भावनिक मूल्यांवर आधारित आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : White House : व्हाईट हाऊसमध्ये रोनाल्डोचा जलवा! सौदी क्राउन प्रिन्सच्या स्वागतासाठी ट्रम्पचा विनोद; एलोन मस्क-टिम कुकचीही उपस्थिती
Ans: भारत १४ नोव्हेंबर रोजी पंडित नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन साजरा करतो.
Ans: जागतिक बालदिन २० नोव्हेंबर रोजी UNICEF व संयुक्त राष्ट्रांच्या बाल हक्कांच्या उपक्रमांमुळे साजरा केला जातो.
Ans: १४ नोव्हेंबर हा भावनिक-सांस्कृतिक दिवस आहे, तर २० नोव्हेंबर हा बाल हक्कांवरील आंतरराष्ट्रीय उपक्रमांसाठी समर्पित दिवस आहे.