Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

National Milk Day 2025: ‘या’ खास दिनानिमित्त वाचा भारताला जगातील सर्वोच्च दूध उत्पादक बनवणाऱ्या ‘व्यक्तिमत्त्वाची’ अनोखी गाथा

डॉ. वर्गीस कुरियन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी 'National Milk Day' साजरा केला जातो. त्यांनी ऑपरेशन फ्लड आणि श्वेत क्रांतीद्वारे भारताला जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनवले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 26, 2025 | 11:58 AM
What is the story behind celebrating National Milk Day in india on November 26

What is the story behind celebrating National Milk Day in india on November 26

Follow Us
Close
Follow Us:
  • २६ नोव्हेंबर हा दिवस “भारतातील श्वेत क्रांतीचे जनक” डॉ. वर्गीस कुरियन यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो.
  • ऑपरेशन फ्लड आणि अमूलच्या यशामुळे भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला.
  • राष्ट्रीय दूध दिनाचा उद्देश दूधाचे पोषणमूल्य, ग्रामीण अर्थव्यवस्थेतील त्याचे योगदान आणि शेतकरी-सक्षमीकरणाचा गौरव.

National Milk Day 2025 : 26 नोव्हेंबर हा दिवस भारताच्या दुग्धक्रांतीचा पाया घालणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वाची आठवण करून देतो, डॉ. वर्गीस कुरियन.(Dr Verghese Kurien) दरवर्षी या दिवशी राष्ट्रीय दूध दिन (National Milk Day) साजरा करण्यामागे केवळ त्यांचा गौरव नाही, तर भारताचे दुग्धस्वावलंबन साध्य करणाऱ्या ऐतिहासिक प्रवासाची कहाणीही आहे. दूध हा भारतीयांच्या दैनंदिन आहाराचा अविभाज्य भाग असला तरी त्यामागील शेतकऱ्यांचे श्रम, सहकारी चळवळींचा विकास आणि देशव्यापी दुग्धउद्योग निर्माण करणाऱ्या धोरणांचीही एक वेगळी कथा आहे. आणि त्या कथेचा केंद्रबिंदू म्हणजे, डॉ. कुरियन.

राष्ट्रीय दूध दिन प्रथमच २०१४ मध्ये अधिकृतरीत्या साजरा करण्यात आला. भारतीय दुग्ध संघटना आणि विविध राज्यांतील दूध संघांनी मिळून कुरियन यांच्या जन्मदिनाचा स्मृतिदिन म्हणून हा दिवस निवडला. उद्देश होता, दुधाचे पोषणमूल्य, आर्थिक महत्व आणि भारतातील दुग्धव्यवस्थेला सक्षम बनवणाऱ्या उपक्रमांविषयी जागरूकता वाढवणे. पशुसंवर्धन मंत्रालयाच्या मते, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे केवळ पोषणाचे साधन नाहीत, तर कोट्यवधी शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा कणा आहेत.

हे देखील वाचा : Constitution Day 2025 : भारतीय संविधानातील सर्वात शक्तिशाली कलम कोणते? जाणून घ्या त्याची खरी ताकद

१९२१ मध्ये जन्मलेले डॉ. वर्गीस कुरियन यांनी आपल्या दूरदृष्टी, नेतृत्वशैली आणि विज्ञानाधारित व्यवस्थापनामुळे देशात अभूतपूर्व दुग्धक्रांती घडवली. त्यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान म्हणजे ऑपरेशन फ्लड जगातील सर्वात मोठा दुग्ध विकास कार्यक्रम. १३ जानेवारी १९७० रोजी सुरू झालेल्या या उपक्रमाने भारतातील दुग्धव्यवस्था पूर्णतः बदलून टाकली. या कार्यक्रमातून प्रथमच शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनावर थेट नियंत्रण मिळाले, दूध संकलन व वितरणाची वैज्ञानिक पद्धत रुजली आणि स्थिर किमतींमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेस नवा बळ मिळाला. पुढील तीन दशकांत भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश ठरला, आणि त्यामागे कुरियन यांचीच ‘श्वेत क्रांती’ होती.

Today is #NationalMilkDay🥛 This day is observed on 26th November every year to mark the birth anniversary of Dr Verghese Kurien, regarded as the “Father of the #WhiteRevolution” in India. Minister for Fisheries, Animal Husbandry, and Dairying @LalanSingh_1 to confer the… pic.twitter.com/TJClgYIL3S — All India Radio News (@airnewsalerts) November 26, 2025

credit : social media

अमूलची यशोगाथा ही डॉ. कुरियन यांच्या दृष्टीची आणखी एक भव्य नोंद आहे. ३० हून अधिक शेतकरी नेतृत्वाखालील दुग्धसंघांची स्थापना, सहकारी व्यवस्थेतील पारदर्शकता, आणि दूध उत्पादकांना न्याय्य दर, या सर्वामुळे अमूल प्रत्येक भारतीय घराचे विश्वसनीय ब्रँड बनले. १९९८ मध्ये भारताने अमेरिकेलाही मागे टाकत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देशाचा मान मिळवला. दिल्ली दूध योजना, खाद्यतेलांच्या स्वावलंबनासाठी केलेले प्रयत्न, तसेच ग्रामीण विकासाच्या अनेक प्रकल्पांमधील त्यांचे योगदान अपूर्व आहे.

हे देखील वाचा : Ayodhya Ram Mandir: अयोध्या राममंदिरात फडकला भगवा; पाहून पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या, पुन्हा भारतावर केले बिनबुडाचे आरोप

त्यांच्या कार्याचा गौरव करताना भारताने त्यांना पद्मश्री (१९६५), पद्मभूषण (१९६६) आणि पद्मविभूषण (१९९९) या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केले. तसेच रॅमन मॅगसेसे पुरस्कार (१९६३), कृषी रत्न (१९८६) आणि जागतिक अन्न पुरस्कार (१९८९) यांनीही त्यांची जागतिक पातळीवर प्रशंसा केली. भारतातील दुग्ध अर्थव्यवस्था आज जिथे उभी आहे, ती मुख्यतः डॉ. कुरियन यांच्या अथक कार्यामुळे. राष्ट्रीय दूध दिन हा केवळ दूध उद्योजकतेचा उत्सव नाही; तर ग्रामीण भारतातील परिवर्तनाची, शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाची आणि ‘श्वेत क्रांती’ची प्रेरणादायी आठवण आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: राष्ट्रीय दूध दिन २६ नोव्हेंबरलाच का साजरा केला जातो?

    Ans: डॉ. वर्गीस कुरियन यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो.

  • Que: ऑपरेशन फ्लड म्हणजे काय?

    Ans: भारताला जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक बनवणारा विशाल दुग्ध विकास कार्यक्रम.

  • Que: श्वेत क्रांतीचे श्रेय कोणाला जाते?

    Ans: श्वेत क्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन यांनाच हे श्रेय जाते.

Web Title: What is the story behind celebrating national milk day in india on november 26

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 11:58 AM

Topics:  

  • day history
  • milk
  • navarashtra special story

संबंधित बातम्या

Constitution Day 2025 : भारतीय संविधानातील सर्वात शक्तिशाली कलम कोणते? जाणून घ्या त्याची खरी ताकद
1

Constitution Day 2025 : भारतीय संविधानातील सर्वात शक्तिशाली कलम कोणते? जाणून घ्या त्याची खरी ताकद

World Twins Day 2025 : जागतिक जुळे दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या त्याचा अनोखा इतिहास व महत्व
2

World Twins Day 2025 : जागतिक जुळे दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या त्याचा अनोखा इतिहास व महत्व

Swarnagiri Venkateswara Temple : देव भेटतो तिथे!’असा’ अलौकिक चमत्कारातून झाला जन्म पृथ्वीवरील स्वर्ग असलेल्या स्वर्णगिरी मंदिराचा
3

Swarnagiri Venkateswara Temple : देव भेटतो तिथे!’असा’ अलौकिक चमत्कारातून झाला जन्म पृथ्वीवरील स्वर्ग असलेल्या स्वर्णगिरी मंदिराचा

हिवाळ्यात हळदीचं दूध का प्यायला हवं? शरीराला मिळतात अनेक आश्चर्यचकित फायदे
4

हिवाळ्यात हळदीचं दूध का प्यायला हवं? शरीराला मिळतात अनेक आश्चर्यचकित फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.