Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

National Farmers Day 2025 : कोण होते चौधरी चरण सिंग? जे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी पंतप्रधान नेहरुंशीही भिडले

National Farmers Day : आज राष्ट्रीय शेतकरी दिवस आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या चौधरी चरण सिंग यांच्या जन्मदिनानिमित्त आजचा दिवस साजरा केला जातो. या निमित्त आपण चौधरी चरण सिंग कोण होते हे जाणून घेऊयात.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 23, 2025 | 09:38 AM
Who was Chaudhary Charan Singh

Who was Chaudhary Charan Singh

Follow Us
Close
Follow Us:

National Farmer Day 2025 : आज राष्ट्रीय शेतकरी दिवस आहे. या निमित्त आपण ‘शेतकऱ्यांचा मसिहा’ म्हणून ओखळले जाणारे देशाचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या बद्दल जाणून घेणार आहोत. त्यांनी शेती, जमीन आणि ग्रामीण भारताच्या विकासावर निर्भीड भूमिका घेतली होती. अगदी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंना देखील विरोध केला होता. त्यांच्या या कामाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी भारतात २३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जातो.

हे देखील वाचा : World Basketball Day 2025 : स्वप्न आशियाई स्पर्धेचे! आग्रा बास्केटबॉल असोसिएशनने घडवले भारतीय संघाचे शिलेदार

कोण होते चौधरी चरण सिंग?

२३ डिसेंबर १९०२ साली त्यांचा उत्तर प्रदेशच्या मरेठ येथील नूरपूर गावाता त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या जन्मदिनानित्तच आज राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो. त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९२९ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी स्वातंत्रलढ्यात इतर क्रातीकारांकासोबत सक्रिय सहभाग घेतला होता. यामुळे त्याना अनेक वेळा तुरुंगवासाची शिक्षा देखील भोगावी लागली होती. त्यांनी सुरुवातीपासूनच सावकार व्यवस्था संपवण्यावर, चकबंदी कायदा आणि शेतकऱ्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी लढा दिला होता.

1937 मध्ये छपरौली मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले होते. चौधरी चरण सिंह यांची खरी ओळख ही शेतकऱ्यांचा मसिहा, त्यांच्या हक्कासाठी लढा देणारा मसिहा म्हणून निर्माण झाली होती. त्यांनी जमिनीदारी व्यवस्थेला तीव्र विरोध केला होता. उत्तर प्रदेशात त्यांनी जमिनदारी उन्मूलन कायदा आणि जमीन एकत्रीकरण कायदा तयार करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांनी नागपूर येथे काँग्रेस अधिवेशनात १९५९ मध्ये सहकारी शेतीच्या संकल्पनेला तीव्र निषेध नोंदवला होता.

पंडित नेहरु आणि इंदिरा गांधींना विरोध

भारतीय शेतकऱ्यासाठी त्याची जमिनी, भूई ही आईसारखी असते. यामुळे तो सामूहिक मालकी स्वीकारणार नाही असा त्यांची ठाम भूमिका होती. त्यांच्या या भूमिकेमुळे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाला नेहरु यांच्यासोबतही मतभेद निर्माण झाले होते. पण पुढे सोव्हिएत रशिया आणि चीनमधील सहकारी शेती अपयशी ठरल्यानंतर नेहरुंना चौधरी चरण सिंग यांची भूमिका समजली.

१९६७ मध्ये चरण सिंग यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद मिळवले होते. त्यांनी अतिशय कडक आणि प्रामाणिक प्रशासन म्हणून आपले कार्य केले. त्यांनी लोकदलाची स्थापना करत त्यांनी राष्ट्रीय राजकारणात आपली स्वातंत्र्य ओळख निर्माण केली. त्यांनी आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांच्या सरकारला देखील उघडपणे विरोध केला होता.

१९७७ मध्ये जनता पार्टीच्या विजयात त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. त्यांनी उपपंतप्रधा आणि गृहमंत्री म्हणून कार्य केले. यावेळी त्यांनी इंदिरा गांधींच्या अटकेचा निर्णय घेतला. यामुळे पक्षात फूट पडू लागली. यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पंतप्रधान बनले. परंतु बहुमत सिद्ध करण्यापूर्वी काँग्रेसने त्यांचा पाठिंबा काढूव घेतला. ते एकमेव असे पंतप्रधान होते ज्यांना संसदेत बहुमत चाचणी सिद्ध करता आली नाही. यानंतरही चौधरी चर सिंग शेतकऱ्यांसाठी लढा देत राहिले. यामुळे त्यांच्या स्मरणार्थ अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय शेतकरी दिनाची घोषणा केली. तसेच मोदी सरकारने त्यांच्या मरणानंतर भारतरत्न पुरस्कार प्रदान केला.

World Meditation Day : फक्त 15 मिनिटात मनाला करा ‘रिचार्ज’; जागतिक ध्यान दिनानिमित्त जाणून घ्या ‘ध्यान’ कारण्यामागेचे विज्ञान

Web Title: Who was chaudhary charan singh national farmers day 2025 know history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 09:38 AM

Topics:  

  • dinvishesh

संबंधित बातम्या

शीख धर्माचे दहावे आणि शेवटचे गुरु…गुरु गोविंद सिंह यांची जयंती; जाणून घ्या 22 डिसेंबरचा इतिहास
1

शीख धर्माचे दहावे आणि शेवटचे गुरु…गुरु गोविंद सिंह यांची जयंती; जाणून घ्या 22 डिसेंबरचा इतिहास

Actor Govinda Birthday : हिरो नंबर 1 अभिनेता गोविंदाचा वाढदिवस; जाणून घ्या 21 डिसेंबरचा इतिहास
2

Actor Govinda Birthday : हिरो नंबर 1 अभिनेता गोविंदाचा वाढदिवस; जाणून घ्या 21 डिसेंबरचा इतिहास

मानवतेचे खरे हितचिंतक म्हणून ओळखले जाणारे संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २० डिसेंबरचा इतिहास
3

मानवतेचे खरे हितचिंतक म्हणून ओळखले जाणारे संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २० डिसेंबरचा इतिहास

पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा वाढदिवस; जाणून घ्या19 डिसेंबरचा इतिहास
4

पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा वाढदिवस; जाणून घ्या19 डिसेंबरचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.