
World Day For Prevention Awareness of Child Carnal Abuse know the importance and theme
जागतिक स्तरावर असंख्य मुलांना लैंगिक शोषण, गैरवापर, हिंसाचार याचा जबरदस्तीने सामाना करावा लागतो. गेल्या काही काळात तर मुलांवरील अशा अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. समाजाच्या सर्व स्तरांमध्ये अशा घटना आढळून आल्या आहेत. विशेष करुन लहान मुली लैंगिक शोषण, ऑलाइन व ऑफलाइन शोषण अशा प्रकारच्या हिंसाचाराला अधिक बळी पडत आहे. यामुळे आजचा दिवस हा या हिंसाचाराविरोधात जनजागृती करण्याचा दिवस आहे. आज १८ नोव्हेंबर बाल लैंगिक शोषण, गैरवापर आणि हिंचासार प्रतिबंध उपचारासाठी जागतिक दिन साजरा केला जातो.
खरतर मुलांचे लैंगिक शोषण करणे किंवा कोणत्या ही प्रकारे त्यांच्यावर हिंसाचार करणे हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. हा जागतिक आरोग्य आणि विकासासाठी मोठा धोका आहे. अनेकदा काही गुन्ह्यांमध्ये समाजाच्या भीतीने तक्रार केली जात नाही. यामुळेच ७ नोव्हेंबर २०२२ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने यावर जगजागृती करण्यासाठी आणि मुलांचे लैंगिक शोषण, त्यांच्यावर हिंसाचार प्रतिबंध आणि उपचारासाठी ठराव मजूर केला होता. यानंतर १८ नोव्हेंबर ही तारीख हा दिवस साजर करण्यासाठी निश्चित करण्यात आली.
नवराष्ट्र विशेष लेक वाचण्यासाठी येथे क्लिक करा
गेल्या काही काळात आर्थिक विषणता, दारिद्र्य, हवामानबदल, संघर्ष आणि व्यवस्थेमधील भेदभाव देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यावर अद्यापही कोणताही ठोस असा तोडगा काढण्यात आलेला नाही. यामुळे देखील मुलांच्या सुरक्षेवर गंभीर परिणाम होत आहे. अनेक मुले लैंगिक शोषण आणि हिंसाचाराच्या परिस्थितीमध्ये खेचली जात आहे.
या लैंगिक अत्याचाराचा परिणाम हा दीर्घकाळ राहतो. विशेष करुन मुलांच्या मनावर, शारीरावर, आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होतात. अनेक वेळा यामुळे मुलांचा बळी देखील गेला आहे. तसेच अनेक वेळा लैंगिक अत्याचाराला बाळी पडलेली मुले त्याच्यासोबत घडलेल्या घटना सांगण्यास घाबरतात. त्यांच्या मनातील समाजाची भीती, कोणी ऐकून घेणार नाही याची भीती, योग्य उपचार न मिळणे ही देखील कारणे आहेत.
भारत सरकारने २०३० पर्यंत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक जागरूकता दिनानिमित्त मुलांचा सन्मान, त्यांची सुरक्षितता, तसेच त्यांना हिंसाराचापासून मुक्त करणे असा अजेंडा ठेवला आहे. तर २०२३ च्या अजेंडामध्ये मुलांची तस्करी थांबवणे, त्यांना लैंगिक हिंसा, बालविवाह, जबरदस्तीने विवाह यांसारख्या प्रथा संपवण्यावर भर दिला जात आहे.
काय असते या दिवशी खास?
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा