Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहिला फोटो कधी, कोणी आणि कसा काढला? जागतिक छायाचित्रण दिनाचा मनोरंजक इतिहास आणि थीम जाणून घ्या

World Photography Day 2024: आज जगभरात जागतिक छायाचित्रांकण दिवस साजरा केला जात आहे. आजचा दिवस खास पद्धतीने साजरा करण्यासाठी एक संपूर्ण दिवस अशी या दिवसाची थीम ठेवण्यात आली आहे. आज आपण या निमित्त जागतिक छायचित्रांकण दिनाचा इतिहास जाणून घेऊयात.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 19, 2024 | 11:21 AM
19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रांकण दिवस

19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रांकण दिवस

Follow Us
Close
Follow Us:

World Photography Day 2024: जागतिक छायाचित्रण दिवस, दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. केवळ आपल्या देशातच नाही तर संपूर्ण जगभर हा दिवस साजरा करण्यात येतो. फोटोग्राफीची आवड असणाऱ्या, छंद जपणाऱ्या लोकांना हा दिवस समर्पित केला जातो. असे म्हणतात की, एक फोटो हजार शब्द बोलून जातो, त्यामुळे अनेक फोटोग्राफ्रर्स आपल्या कॅमेरात आठवणी कैद करून ठेवतात.

पूर्वी एक फोटो काढण्यासाठी लोकांना दूर जावे लागायचे पण बदलत्या तंत्रज्ञानामुळे माहिती, कला आणि दळवळणाच्या क्षेत्रात बदल घडवून आणला आहे. सगळ्यांकडे स्मार्ट फोन, कॅमेरा आहे. त्यामुळे कोणीही कधीही हवे तसे आठवणी कॅमेरामध्ये कॅप्चर करू शकतात. फोटो आणि फोटोग्राफी कलेचे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिन साजरा केला जातो. आज आपण जागतिक छायाचित्रण दिनाचा इतिहास, आणि काही रंजक गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.

जागतिक छायाचित्रण दिन इतिहास

जागतिक छायाचित्रण दिनाची सुरुवात 19 ऑगस्ट, 1839 रोजी झाली. या दिवशी फ्रान्सचे लुई डग्युरे आणि जॉर्ज ईस्टमन यांनी डॅग्युरिओटाइपचा शोध लावला होता.  नंतर, फ्रेंच सरकारने 19 ऑगस्ट 1839 रोजी डॅग्युरिओटाइप तंत्रज्ञानाचा शोध लावल्याची घोषणा केली.  फ्रेंच सरकारने हे तंत्रज्ञान सार्वजनिक केले आणि ते विनामूल्य वापरण्याची परवानगी दिली होती. त्या दिवसापासून हा दिवस जागतिक छायाचित्रण दिन म्हणून ओळखला जातो. हा दिवस फोटोग्राफी प्रेमींना चांगल्या फोटोग्राफीसाठी प्रेरित करण्याची आणि याद्वारे समाज, कला आणि विज्ञानावर त्याचा प्रभाव अधोरेखित करण्याची संधी आहे.

पहिला फोटो कधी, कोणी आणि कसा काढला?

जगातील पहिले छायाचित्र 1827 मध्ये फ्रेंच शोधक जोसेफ निसेफोर निपसे यांनी काढले होते. या ऐतिहासिक छायाचित्राला ‘हेलियोग्राफी’ किंवा ‘हेलिओटाइपी’ म्हणतात. याला ‘ल ग्रास येथील खिडकीतून दृश्य’ असे म्हणतात. हा फोटो खिडकीच्या बाहेरचे दृश्य दाखवतो आणि एका विशेष प्रकाशसंवेदनशील प्लॅटिनमवर कॅप्चर केले गेले होते, जे सुमारे आठ तासांनंतर स्थिर होते. नंतर अमेरिकेतील रॉबर्ट कॉर्नेलियसने यांनी  1839 मध्ये जगातील पहिला ‘सेल्फी’ क्लिक केला होता. तेव्हा सेल्फी म्हणजे काय हे कोणालाच माहीत नव्हते.

नंतर,या फोटोग्राफीच्या तंत्रज्ञान आणि उपकरणांमध्ये सतत विकास होत गेला. नंतर 19 ऑगस्ट 2010 हा फोटोग्राफी उत्साही किंवा व्यावसायिक छायाचित्रकारांसाठी एक ऐतिहासिक दिवस होता. या दिवशी पहिली जागतिक ऑनलाइन गॅलरी आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये 250 हून अधिक छायाचित्रकारांनी त्यांच्या छायाचित्रांद्वारे त्यांचे विचार शेअर केले होते. ही ऑनलाइन गॅलरी जगभर प्रसिद्ध झाली.

जागतिक छायाचित्रण दिन 2024 थीम: “एक संपूर्ण दिवस”

आजचा दिवस खास पद्धतीने साजरा करण्यासाठी एक संपूर्ण दिवस अशी या दिवसाची थीम ठेवण्यात आली आहे. यासाठी अनेक ऑनलाईन फ्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारच्या फोटोग्राफीच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. जगभरात एकाच दिवसात काय घडते ते कॅप्चर करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. सहभागींना 19 ऑगस्ट 2024 रोजी फोटो किंवा व्हिडिओ घेण्यासाठी आणि ते शेअर करण्यास प्रोत्साहित केले जाते. जगभरातील विविध ठिकाणे, संस्कृती आणि क्षणांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतिमांचा संग्रह तयार करणे हे ध्येय आहे.

Web Title: World photography day 2024 know the history of the first photo of the world nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2024 | 11:13 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.