जागतिक लोकसंख्या दिवस २०२४
भारतासह इतर अनेक देशांमध्ये झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे. वाढत चालली लोकसंख्या कमी करण्यासाठी सरकारद्वारे अनेक योजना राबवल्या जात आहेत. भारत हा जगातील सगळ्यात दाट लोकसंख्या असलेला देश आहे. कोट्यवधींच्या घरात लोकसंख्या असलेला भारत चीनला कधीही लोकसंख्येमध्ये मागे टाकू शकतो. वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे. याच दिवसाची खास आठवण करून देण्यासाठी जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला जातो.
भारताची लोकसंख्या अब्जावधींच्या घरात आहे. 1.4 अब्ज लोकसंख्या असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतामध्ये जर अशीच लोकसंख्या वाढत राहिली तर २०३० पर्यंत भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनण्याची शक्यता आहे. भारतामध्ये सगळ्यात दाट लोकवस्ती आहे. दहा बाय दहाच्या छोट्या रूमध्ये सुद्धा अनेक लोक राहतात. लोकसंख्येचा विषय गांभीर्याने घेण्यासाठी जगभरात सगळीकडे लोकसंख्या दिवस साजरा केला जात आहे. चला तर जाणून घेऊया लोकसंख्या दिनाचा इतिहास आणि महत्व.(फोटो सौजन्य-istock)
११ जुलै रोजी जगभरात सगळीकडे जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला जातो. तसेच हा दिवस गर्भनिरोधक आणि कुटुंब नियोजनाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. लोकसंख्या विस्फोट, कुटुंब नियोजन, लैंगिक समानता, गरिबी, माता आरोग्य आणि मानवी हक्क इत्यादी महत्वाच्या विषयांकडे लक्ष केंद्रित केले जाते.
1989 मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) द्वारे जागतिक लोकसंख्या दिनाची सुरुवात करण्यात आली होती. १९८७ मध्ये लोकसंख्या जवळपास पाच अब्जांच्या घरात होती, तेव्हा अनेक देशांमध्ये चिंता व्यक्त केली जाऊ लागली. झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी अनेक उपायोजना राबवल्या जात होत्या. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.