Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुर्दैवी! पुन्हा ‘फिल ह्युजेस’सारखा अपघात! मान व डोक्याला लागला चेंडू; 17 वर्षीय ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा मृत्यू

ऑस्ट्रेलियामध्ये सराव सत्रादरम्यान मानेला चेंडू लागल्याने १७ वर्षीय ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा मृत्यू झाला आहे. बेन ऑस्टिन असे  मृत्यू झालेल्या क्रिकेटपटूचे नाव असून त्याच्या मृत्यूने फिल ह्यूजेसच्या मृत्यू आठवण करून दिली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 31, 2025 | 06:37 PM
दुर्दैवी! पुन्हा ‘फिल ह्युजेस’सारखा अपघात! मान व डोक्याला लागला चेंडू; 17 वर्षीय ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा मृत्यू
Follow Us
Close
Follow Us:
  • चेंडू लागल्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा मृत्यू
  • फिल ह्युजेसच्या अपघाताची पुनरावृत्ती 
  • बेन ऑस्टिन असे  मृत्यू झालेल्या क्रिकेटपटूचे नाव

Australian cricketer dies after being hit by ball : क्रिकेट जगतासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सराव सत्रादरम्यान मानेला चेंडू लागल्याने १७ वर्षीय ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा मृत्यू झाला आहे.  बेन ऑस्टिन असे  मृत्यू झालेल्या क्रिकेटपटूचे नाव आहे. बेनच्या मृत्यूने २०१४ मध्ये फिल ह्यूजेसच्या मृत्यूच्या दुःखद आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. मंगळवारी मेलबर्नच्या आऊटर ईस्टमधील फर्न्ट्री गली येथे सराव सत्रादरम्यान बेनजखमी झाला होता. तो टी२० सामन्याची तयारी करत असताना त्याच्या मानेवर साइडआर्मचा चेंडू लागला. त्यावेळी ऑस्टिनने हेल्मेट घातले होते, परंतु त्यात स्टीम गार्ड नव्हते. या दुखपतीत त्याचा बुधवारी मृत्यू झाला आहे.

हेही वाचा : IND vs AUS 2nd T20 : मेलबर्नमध्ये कांगारूंचा टीम इंडियाला धोबीपछाड! 4 विकेट्सने सामना जिंकत ऑस्ट्रेलियाची मालिकेत आघाडी

ऑस्टिनला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. फर्नी गली येथे सराव दरम्यान त्याच्या मानेला आणि डोक्याला चेंडू लागला. तो टी२० सामन्यापूर्वी नेटमध्ये सराव करत होता. अपघातानंतर त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते परंतु त्याला वाचवता आले नाही. फर्नी गली क्रिकेट क्लबने गुरुवारी त्याच्या मृत्यूची पुष्टी केली. बेनच्या मृत्यूमुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे. त्याच्या कुटुंबाला, मित्रांना आणि ओळखीच्या व्यक्तींना आमची संवेदना, क्लबने म्हटले आहे.

सराव दरम्यान त्याने हेल्मेट घातले होते पण नेकगार्ड नव्हता. या अपघातामुळे पुन्हा एकदा सर्व स्तरांवर खेळांमध्ये सुरक्षा उपकरणांचा वापर करण्याची मागणी झाली आहे. यापूर्वी, क्रिकेट व्हिक्टोरियाने बेनचे वडील जेस ऑस्टिन यांच्या हवाल्याने कुटुंबाच्या वतीने एक निवेदन जारी केले. निवेदनात म्हटले आहे की, आमच्या लाडक्या बेनच्या निधनाने आम्हाला खूप दुःख झाले आहे.

हेही वाचा : IND W vs AUS W : ‘खेळ संपेपर्यंत संपलेला…’ गौतम गंभीरकडून महिला संघाचे अभिनंदन; आठवली १४ वर्ष जुनी…

बेन हा ट्रेसी आणि माझा लाडका मुलगा होता आणि कूपर आणि जॅशचा खूप लाडका भाऊ होता. तो आमच्या कुटुंबाच्या आणि मित्रांच्या जीवनाचा प्रकाश होता. या दुर्घटनेने तो आमच्यापासून दूर नेला. त्याला क्रिकेटची आवड होती आणि खेळ हा त्याच्या आयुष्यातील आनंद होता. असेही म्हटले आहे की, त्या वेळी नेटमध्ये गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. या अपघातामुळे दोन तरुणांवर परिणाम झाला आहे. त्याच्या आणि त्याच्या कुटुंबासोबत आमच्या संवेदना आहेत. बेन नेहमीच लक्षात राहील. नोव्हेंबर २०१४ मध्ये, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिल ह्यूजेसचा सिडनी येथे प्रथम श्रेणी सामन्यादरम्यान फलंदाजी करताना कानाजवळ बाउन्सर आदळल्याने मृत्यू झाला.

Web Title: 17 year old australian cricketer dies after being hit in the neck and head by a ball

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 06:37 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.