 
        
        भारतीय महिला संघाचे गौतम गंभीरकडून अभिनंदन (फोटो-सोशल मीडिया)
Gautam Gambhir congratulates Indian women’s cricket team : काल ३० ऑक्टोबर रोजी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया आणि भारत आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून अंतिम सामन्यात धडक मारली आहे. या विजयानंतर भारतीय संघाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. सध्या ऑस्ट्रेलियात असलेले भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी देखील नवी मुंबईत भारतीय महिला संघाच्या ऐतिहासिक विजयावर प्रतिक्रिया दिली आणि त्यांचे अभिनंदन केले आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट्सने पराभव केला. भारताच्या या विजयाची नायक जेमिमा रॉड्रिग्ज ठरली. जिने नाबाद शतकी खेळी साकारली. त्यामुळे मुंबईत गौतम गंभीरशी संबंधित असणारी एक १४ वर्ष जुनी कहाणी आठवली आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उपांत्य फेरीतील ऐतिहासिक विजयानंतर गौतम गंभीरने त्यांचे अभिनंदन केले आहे. गंभीरने त्याच्या एक्स हँडलद्वारे भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विक्रमी विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. गंभीरने लिहिले की, “खेळ संपेपर्यंत संपलेला नाही.” त्यानंतर त्याने पुढे लिहिले की, “मुलींनी एक शानदार खेळ केला.”
महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला ५ विकेट्सने धुळ चारली. या विजयासह भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला. भारतीय महिलांसाठी हा विजय खूप खास ठरला आहे कारण त्यांनी एकूण ३३९ धावांचा पाठलाग करून हा विजय मिळवला. यापूर्वी महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग कधी देखील करण्यात आला नव्हता. या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर आलेली जेमिमा रॉड्रिग्ज शेवटपर्यंत नाबाद राहिली आणि तिने १३४ चेंडूचा सामना करत १२७ धावांची खेळी केली.
It ain’t over till it’s over! What a performance girls 🇮🇳 pic.twitter.com/Ox0Mg0hbEt — Gautam Gambhir (@GautamGambhir) October 30, 2025
हेही वाचा : ‘हा’ बांगलादेशी क्रिकेटर गंभीर आजाराने त्रस्त! रुग्णालयात दाखल केल्यावर पत्नीकडून प्रार्थनेचे आवाहन
जेमिमाच्या खेळीने २०११ च्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात गाऊंटम गंभीरने खेळले खेळीची आतहवं करून देणारी होती. २०२५ च्या महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील जेमिमाचा डाव २०११ च्या पुरुष एकदिवसीय विश्वचषकातील गौतम गंभीरच्या खेळीसारखाच दिसून आला. त्यावेळी गंभीरने श्रीलंकेविरुद्ध ९७ धावांची खेळी केली होती. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे जेमिमा आणि गंभीर दोघांनी तिसऱ्या क्रमांकावर येऊन मॅरेथॉन खेळी साकारली. दोघांनीही मुंबईच्या मैदानावर आपला डावाला आकार दिला. फरक एवढाच होता की डीवाय पाटील येथे जेमिमाचा सामना महिला विश्वचषकाचा उपांत्य सामना होता, तर वानखेडे येथे गंभीरचा सामना पुरुषांच्या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना होता. तसेच दुसरे साम्य असे की, जेमिमा आणि गंभीरच्या दोघांच्याही जर्सीवर भारत लिहिलेला होते आणि दोघांच्याही जर्सीवर मातीचे डाग दिसून आले होते.






