 
        
        भारताविरुद्ध दुसऱ्या टी २० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय(फोटो-सोशल मीडिया)
IND vs AUS 2nd T20 :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या टी २० मालिकेतील दूसरा टी २० सामना मेलबर्न येथे मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. या सामन्यात टॉस गमावणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियासमोर १२५ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रतिउत्तरात ऑस्ट्रेलिया संघाने १३.२ ओव्हरमध्ये ६ गडी गमावत हे लक्ष्य सहज गाठले आणि भारतावर ४ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मिचेल मार्शने सर्वाधिक ४६ धावा केल्या. तर भारताकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊन भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले. ऑस्ट्रेलियाच्या टिच्चून गोलंदाजीसमोर अभिषेक शर्मा(६८ धावा) आणि हर्षित राणा(३२ धावा) वगळता इतर फलंदाजांना टिकाव धरता आला नाही. जोश हेझलवूडने ४ ओव्हरमध्ये १३ धावा देत सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर झेवियर बार्टलेट आणि नॅथन एलिसने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर मार्कस स्टोइनिसने १ विकेट घेतली.
टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने भारताला १२५ धावांवर गुंडाळले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात शानदार झाली. ट्रॅव्हिस हेड आणि कर्णधार मिशेल मार्श या सलामी जोडीने संघाला ४.३ ओव्हरमध्ये ५१ धावांची भागीदारी रचून दिली. हेड २४ धावांवर वरुण चक्रवर्तीचा बळी ठरला. त्यानंतर मिशेल मार्शने एक बाजू सांभाळत शानदार खेळ दाखवत होता. परंतु, त्याला ४६ धावांवर कुलदीप यादवने माघारी पाठवले. त्यानंतर जोश इंग्लिश २० धावा, टीम डेव्हिड १ धावा, मिचेल ओवेन १४ धावा , मॅथ्यू शॉर्ट ० धावा करून बाद झाले तर मार्कस स्टोइनिस ६ धावा तर झेवियर बार्टलेट ० धावा करून संघाला विजय मिळवून देत नाबाद राहिले. भारताकडून कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकिपर), शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.
हेही वाचा : ‘हा’ बांगलादेशी क्रिकेटर गंभीर आजाराने त्रस्त! रुग्णालयात दाखल केल्यावर पत्नीकडून प्रार्थनेचे आवाहन
ट्रॅव्हिस हेड, मिशेल मार्श (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकिपर), मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, टिम डेव्हिड, मिशेल ओवेन, जोश फिलिप, नॅथन एलिस, झेवियर बार्टलेट, मॅथ्यू कुहनेमन आणि जोश हेझलवुड.
बातमी अपडेट होत आहे…






