फोटो सौजन्य - BCCI Women सोशल मीडिया
भारत विरुद्ध आयर्लंड महिला एकदिवसीय मालिकेचा दुसरा सामना : भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेच्या आज दुसरा सामना रंगणार आहे. या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या मालिकेत भारताच्या संघाने पहिला सामना जिंकून मालिकेमध्ये एक शून्य अशी आघाडी घेतली आहे. भारताची कर्णधार हनुमानप्रीत कौर हिला या मालिकेत मध्ये विश्रांती देण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय महिला संघाचे कर्णधार पदाची कमान स्मृती मंधनाकडे देण्यात आली आहे. भारत विरुद्ध आयर्लंड या मालिकेचा दुसरा सामना रंगणार आहे. या तीन सामन्यांच्या मालिकेत आज भारताचा संघ विजयाचा उद्देशाने मैदानात उतरेल.
Rajkot 📍
🏟️ Niranjan Shah Stadium
⏰ 11:00 AM IST
📱💻 https://t.co/oYTlePtFaz#TeamIndia | #INDvIRE | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/hy5RVxzZzt— BCCI Women (@BCCIWomen) January 12, 2025
भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यामध्ये सुरु आलेल्या मालिकेमध्ये भारताच्या संघाने पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे, या सामन्यांमध्ये दोन्ही संघानी केलेल्या कामगिरीवर एकदा नजर टाका. भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यामध्ये झालेल्या पहिल्या सामन्यांमध्ये आयर्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर यामध्ये भारताच्या महिला गोलंदाजांनी ७ विकेट्स घेत आयर्लंडने २३८ धावा केल्या. यामध्ये आयर्लंडची कर्णधार गॅबी लुईस हिने ९२ धावांची कमालीची खेळी खेळली. तर लेआ पॉल हिने संघासाठी ५९ धावा केल्या या दोघींच्या व्यतिरिक्त कोणत्याही महिला फलंदाजाने ३० चा आकडा पार केला नाही.
भारतीय संघाच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर प्रिया मिश्रा हिने संघासाठी २ विकेट्स घेतले. सायली सातघरे, तैसा साधु आणि दीप्ती शर्मा या गोलंदाजांनी प्रत्येकी १ विकेट घेतले. भारतीय महिला फलंदाजांच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, भारताची युवा फलंदाज प्रतिका रावल ८२ धावांची खेळी खेळली तर स्मृती मंधाना हिने संघासाठी ४१ धावा केल्या. तेजल हसबनीसने ५३ धावांची महत्वाची खेळी संघासाठी केली आहे. हरलीन देओल संघासाठी २० धावांची खेळी खेळून बाद झाली. जेमिमा रॉड्रिक्स संघासाठी फार मोठी कामगिरी करू शकली नाही. तिने फक्त ९ धावा करून विकेट गमावली.
भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यामध्ये सुरु अस्लेल्या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 चॅनलवर चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. भारत आणि आयर्लंड महिला संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात. त्याचबरोबर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा ॲपवर होणार आहे. या एकदिवसीय मालिकेतील तीनही सामने भारतीय वेळेनुसार सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. त्याचबरोबर सामना सुरु होण्याच्या अर्ध्या तासाआधी नाणेफेक होईल.