Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

38th National Sports Championship : तिरंदाजीत महाराष्ट्राच्या महिला संघाला रौप्य, तर सायकलिंगमध्ये दुहेरी धमाका

डेहराडून येथील मुख्य क्रिकेट स्टेडियममध्ये महाराष्ट्र विरुद्ध पंजाब हा अंतिम सामना अतिशय रंगतदार झाला. हवेच्या वेगात सुवर्णपदकासाठी दोन्ही संघातील तुल्यबळ धनुर्धारी भिडले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 06, 2025 | 10:01 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

देहराडून : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी क्रीडा प्रकारातील कंपाउंड राउंड महिलामध्ये अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखायला लावणाऱ्या अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या अदिती स्वामी, मधुरा धामणगावकर, प्रितिका प्रदीप आणि पुर्वशा शेंडे यांच्या संघास रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. प्रतिस्पर्धी पंजाब संघाने अवघ्या एका गुणाच्या फरकाने बाजी मारत सुवर्णपदकावर नाव कोरले.

डेहराडून येथील मुख्य क्रिकेट स्टेडियममध्ये महाराष्ट्र विरुद्ध पंजाब हा अंतिम सामना अतिशय रंगतदार झाला. हवेच्या वेगात सुवर्णपदकासाठी दोन्ही संघातील तुल्यबळ धनुर्धारी भिडले होते. धनुर्धारींनी मारलेला बाणाचा प्रत्येक वेध आणि त्यास मिळणारा प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद यामुळे सुवर्णपदकाची लढत डोळ्याची पारणे फेडणारी ठरली. अदिती स्वामी (सातारा), मधुरा धामणगावकर आणि प्रितिका प्रदीप (पिंपरी चिंचवड) आणि पुर्वशा शेंडे (अमरावती) या महिला संघाने सुवर्ण पदकासाठी सर्वस्व पणाला लावले. मात्र, दोन वेळा मिळालेले ८ गुण महाराष्ट्राला महागात पडले अन् त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

रोईंगमध्ये महाराष्ट्राच्या मृण्मयीने केलं रौप्य पदक नावावर! ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील गुरूवारी पदकावर नेम साधणार

त्याआधी, महाराष्ट्राच्या या महिला संघाने उपांत्यपूर्व सामन्यात उत्तराखंड संघावर २३३-२१४ गुणांनी, तर उपांत्य सामन्यात तेलंगणा संघावर २२९-२२८ गुणांनी मात करत अंतिम फेरी गाठली होती. अंतिम सामना पंजाब संघाने २२९-२२८ गुण फरकाने म्हणजेच एका गुणाने बाजी मारत सुवर्णपदक पटकावले. कंपाउंड महिला संघाचे संघ मार्गदर्शक म्हणून प्रवीण सावंत यांनी यावेळी काम पाहिले. सुवर्णपदकासाठी खेळत असलेल्या महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे उपाध्यक्ष तथा पथक प्रमुख संजय शेटे, संघ व्यवस्थापक प्रवीण गडदे, संघ मार्गदर्शक प्रवीण सावंत, अमर जाधव, समीर मस्के, कुणाल तावरे आदींसह खेळाडूंची उपस्थिती होती.

आदिती गोस्वामीची प्रतिक्रिया…

‘खरं तर आम्ही जोरदार लढत दिली. अवघ्या एका गुणाने हरलो म्हणजे आज नशीब आमच्या बाजूने नव्हते असेच म्हणावे लागेल. पंजाबच्या महिलांनीही चांगला खेळ केला. त्यामुळे त्यादेखील सुवर्ण पदकाच्या हक्कदार होत्या.’
– आदिती गोस्वामी, महाराष्ट्र

सायकलिंगमध्ये महाराष्ट्राचा दुहेरी धमाका

महाराष्ट्राने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सायकलिंगमधील पदकांची मालिका कायम राखताना आज महिला गटात एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले. महिलांच्या चार किलोमीटर अंतराच्या सांघिक कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राला कांस्यपदक मिळाले. या संघात वैष्णवी गाभणे संस्कृती खेसे, सिया ललवाणी आणि पूजा दानोळी यांचा समावेश होता. महाराष्ट्राने ही शर्यत पाच मिनिटे ३२.६४३ सेकंदात पार केली. हरियाणा (पाच मिनिटे २६.९२० सेकंद) आणि ओडिशा (पाच मिनिटे ३०.४२३ सेकंद) यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. महाराष्ट्राच्या श्वेता गुंजाळ हिने पाच फेऱ्यांचा समावेश असलेल्या ‘केरीन’ सायकलिंग या क्रीडा प्रकारात रौप्यपदक पटकाविले‌.

Web Title: 38th national sports championship maharashtra womens team wins silver in archery double bang in cycling

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2025 | 09:41 AM

Topics:  

  • Sports

संबंधित बातम्या

IND vs WI 1st Test Pitch Report: अहमदाबादच्या खेळपट्टीवर गोलंदाज की फलंदाज कोणाचे असणार वर्चस्व? वाचा पिच रिपोर्ट
1

IND vs WI 1st Test Pitch Report: अहमदाबादच्या खेळपट्टीवर गोलंदाज की फलंदाज कोणाचे असणार वर्चस्व? वाचा पिच रिपोर्ट

IND W vs SL W: भारतीय महिला संघाची वर्ल्ड कपमध्ये ‘ब्लॉकबस्टर ओपनिंग’; श्रीलंकेचा ५९ धावांनी धुव्वा उडवला
2

IND W vs SL W: भारतीय महिला संघाची वर्ल्ड कपमध्ये ‘ब्लॉकबस्टर ओपनिंग’; श्रीलंकेचा ५९ धावांनी धुव्वा उडवला

Women’s क्रिकेट वि.Men’s क्रिकेट:- महिला क्रिकेटचा बदलत्या प्रवाहावर एक नजर
3

Women’s क्रिकेट वि.Men’s क्रिकेट:- महिला क्रिकेटचा बदलत्या प्रवाहावर एक नजर

India W vs Sri Lanka W : भारतीय संघाच्या तुलनेत श्रीलंकेच्या महिला क्रिकेटपटू किती कमवतात? वाचा सविस्तर
4

India W vs Sri Lanka W : भारतीय संघाच्या तुलनेत श्रीलंकेच्या महिला क्रिकेटपटू किती कमवतात? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.