Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

५८ वी पुरुष-महिला राज्य अंजिक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा; या संघात रंगणार उपांत्य फेरी

महिला गटात उपांत्यपूर्व सामन्यात चुरशीच्या सामन्यामध्ये रत्नागिरीने सांगलीचा ३ गुणांनी (१०-७) पराभव करत उपांत्य फेरी गाठली. मध्यंतराला रत्नागिरीकडे २ गुणांची आघाडी होती. ती आघाडी सांगली संघाला मोडता आली नाही.

  • By Vivek Bhor
Updated On: Nov 08, 2022 | 01:34 PM
५८ वी पुरुष-महिला राज्य अंजिक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा; या संघात रंगणार उपांत्य फेरी
Follow Us
Close
Follow Us:

हिंगोली : तिसर्‍या दिवशीच्या झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात (Quarter Finals) मुंबई उपनगर, रत्नागिरी, उस्मानाबाद, ठाणे, सांगली, पुणे संघांनी विजय मिळवत उपांत्य फेरी (Semi Finals) गाठण्यात यश मिळवले. पुरुषांमध्ये ठाणे वि पुणे व मुं. उपनगर वि सांगली तर महिलांमध्ये पुणे वि. रत्नागिरी व उस्मानाबाद वि. ठाणे उपांत्य फेरीत लढत होणार आहे.

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या (Maharashtra Kho-Kho Association) मान्यतेने हिंगोली जिल्हा खो-खो असोसिएशनच्या (Hingoli District Kho-Kho Association) मार्गदर्शनाखाली हिंगोली तालुका खो-खो असोसिएशन आयोजित ५८ वी पुरुष व महिला राज्य अंजिक्यपद व निवडचाचणी खो-खो स्पर्धा रामलिला मैदानात सुरू आहे(The 58th Men’s and Women’s State Qualifier and Selection Trial Kho-Kho Tournament organized by Hingoli Taluka Kho-Kho Association is underway at Ramlila Maidan).

महिला गटात उपांत्यपूर्व सामन्यात चुरशीच्या सामन्यामध्ये रत्नागिरीने सांगलीचा ३ गुणांनी (१०-७) पराभव करत उपांत्य फेरी गाठली. मध्यंतराला रत्नागिरीकडे २ गुणांची आघाडी होती. ती आघाडी सांगली संघाला मोडता आली नाही. विजयी संघातर्फे अपेक्षा सुतार (२.१०, २.२० मि. संरक्षण आणि ४ गुण), आरती कांबळे (२.२०, २.१० मि. संरक्षण व २ गुण), ऐश्‍वर्या सावंत (२.५० मि. संरक्षण), श्रेया सनगरे (२.१० मि. संरक्षण व २ गुण) तर पल्लवी सनगले (१.४०, नाबाद १.२० मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ केला. सांगलीतर्फे प्रतिक्षा बिराजदार (२.१०, १.५० मि. संरक्षण व १ गुण), साक्षी पाटील (२.१० मि. संरक्षण व ३ गुण) यांनी पराभव टाळण्यासाठी प्रयत्न केला.

महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात उस्मानाबादने मुंबईचा एक डाव १२ गुण (१७-५) पराभव केला. उस्मानाबादतर्फे अश्‍विनी शिंदे (३ मि. संरक्षण व ३ गुण), संपदा मोरे (३ मि. संरक्षण व ४ गुण) यांनी तर मुंबईतर्फे मानसी आंबोकरने (१ मि. संरक्षण) चांगला खेळ केला.

महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात ठाणेने सोलापूरवर १० गुणांनी (२१-११) मात केली. ठाणेतर्फे रुपाली बडे (३.१०, २.१० मि. संरक्षण), गितांजली नरसाळे (१.४० मि. संरक्षण), पुजा फरगडे (५ गुण) यांनी चांगला खेळ केला.

महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात पुण्याने नाशिकचा १ डाव ५ गुणांनी (११-६) धुव्वा उडवल. पुण्यातर्फे प्रियांका इंगळेने (३.२० मि. संरक्षण व ६ गुण), स्नेहल जाधव (३ मि. संरक्षण) यांनी चमकदार कामगिरी केली.

पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात ठाण्याने मुंबईचा १५-१४ असा १ गुण आणि ८ मिनिटे राखून विजय मिळवला. गजानन शेंगाळ (१.१०, १.३० मि. संरक्षण व ३ गुण), संकेत कदम (१.३०, १.२० मि. संरक्षण व २ गुण), लक्ष्मण गवस (१.५०, १ मि. संरक्षण व १ गुण) यांची चमकदार कामगिरी करत विजयात मोलाची कामगिरी केली. मुंबईतर्फे विश्‍वजित कांबळे (१.३० मि. संरक्षण व १ गुण), वेदांत देसाई (४ गुण) यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले.

पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबई उपनगरने नाशिकचा १४-९ असा १ डाव ५ गुणांनी पराभव केला. विजयी संघातर्फे अनिकेत चंदवणकर (३, १.५० मि. संरक्षण), अक्षय भांगरे (३ मि. संरक्षण व २ गुण) यांनी चांगला खेळ केला.

पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात सांगलीने सोलापूर १५-१३ असा दोन गुण आणि आठ मिनिटे राखून पराभव केल. विजय संघातर्फे सुरज लांडे (२, १.४० मि. संरक्षण व २ गुण), अक्षय मासल (१.१०, १.३० मि. संरक्षण व ३ गुण ) यांनी तर सोलापूरतर्फे अक्षय इंगळे (१.१० मि. संरक्षण) चांगला खेळ केला.

पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात पुण्याने उस्मानाबादचा १२-१० असा २ गुण आणि ७ मि. राखून पराभव केला. पुणे तर्फे आदित्य गणपूळे (२,२ मि. संरक्षण व १ गुण ), प्रतिक वायकरने (१.१०, २, मि. संरक्षण व २ गुण ) चांगला खेळ करत विजय मिळवून दिला. उस्मानाबादतर्फे विजय वसावेने (१.१४, १.१० व १ गुण) चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले.

Web Title: 58th men women state qualifying and selection trial kho kho tournament the semi final will be played nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2022 | 01:34 PM

Topics:  

  • Kho Kho Tournament

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.