Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजितदादा पवार क्रीडा नगरीत ‘डायनॅमिक’ खो-खोचा थरार शिगेला पोहोचला, मुंबई पोलिसांचा विजय

दादरच्या अजितदादा पवार क्रीडा नगरीत ‘डायनॅमिक’ व्यावसायिक खो-खो स्पर्धेचा जंगी जल्लोष सुरू आहे. पुरुष व महिला गटातील उपांत्य फेरीत पश्चिम रेल्वेने दमदार विजय मिळवला असून अंतिम फेरीत विजेतेपदासाठी महासंग्राम सज्ज आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 18, 2026 | 05:37 PM
kho kho

kho kho

Follow Us
Follow Us:
  • ‘डायनॅमिक’ व्यावसायिक खो-खो स्पर्धेचा जंगी जल्लोष
  • पुरुष उपांत्य फेरीत पश्चिम रेल्वेची विजयी झेप
  • महिला साखळीत पश्चिम रेल्वेचा एकतर्फी विजय
Kho Kho Sports News: दादरच्या अजितदादा पवार क्रीडा नगरीत सध्या ‘डायनॅमिक’ व्यावसायिक खो-खो स्पर्धेचा जंगी जल्लोष सुरू आहे. प्रत्येक सामना धरारत, जिद्दीचा आणि विजेच्या वेगाचा अविस्मरणीय संग्राम ठरत आहे. कै. उमेश शेणॉय स्मृती चषक स्पर्धेत पुरुष गटात पश्चिम रेल्वे व महाराष्ट्र पोष्ट यांनी प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली. तर महिला गटात पश्चिम रेल्वे व मुंबई पोलिस यांनी दमदार विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केलं आहे.

ट्रॉफीवर पाय ठेवत मिशेल मार्शने ऑस्ट्रेलियाचं नशीब केलं उद्ध्वस्त? इथून सुरु झाला कांगारुंचा डाऊनफॉल…

पुरुष उपांत्य फेरीत पश्चिम रेल्वेची विजयी झेप

बृहन्मुंबई महानगरपालिकेने नाणेफेक जिंकून आक्रमण स्वीकारलं. मात्र त्याचा फायदा घेण्यात संघ अपयशी ठरला. पश्चिम रेल्वेने २४-१७ असा ४.३० मि. राखून ७ गुणांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. विजयी पश्चिम रेल्वेच्या माधव दिपक (१.३० व १.५० मि. संरक्षण), राहूल मंडल (१.५० मि. संरक्षण व ६ गुण), आदित्य गणपुले (१.२० मि. संरक्षण व ४ गुण), मजहर जमादार (२ मि. संरक्षण व २० गुण), वृषभ वाघ (१.५० मि. संरक्षण व ४ गुण) यानी निर्णायक कामगिरी करत विजय साकारला. पराभूत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सूरज खाके (१.३० मि. संरक्षण व ४ गुण), पियूश घोलम (१.३० मि. संरक्षण व ४ गुण), प्रसाद भाटकर (१ मि. संरक्षण) यांनी जोरदार लढत दिली.

महिला साखळीत पश्चिम रेल्वेचा मुंबई पोलिसांवर एकतर्फी विजय

सामन्यात पश्चिम रेल्वेने नाणेफेक जिंकून संरक्षण स्वीकारलं. २९-९ असा एक डाव व २० गुणांनी मुंबई पोलिसांचा धुव्वा उडवला.
विजयी पश्चिम रेल्वेच्या संध्या सुरवासे (४.२० मि. संरक्षण), मोकाशी (नाबाद २.४० मि. संरक्षण), अर्चना माझी (२.३० मि. संरक्षण), मगाई माझी (२.५० मि. संरक्षण व ६ गुण), दिव्या गायकवाड (नाबाद १ मि. संरक्षण व ६ गुण), किशोरी कल्याणी कक (६ गुण) यांनी सामन्यावर संपूर्ण वर्चस्व राखले.
पराभूत मुंबई पोलिसांच्या दिक्षा सोनसुरकर (१.५० मि. संरक्षण व २ गुण), सुर्वणा सुरवसे (२ मि. संरक्षण), पायल पवार (१ मि. संरक्षण), सपना आंबवले (२ गुण) यांनी लढत दिली, मात्र विजय दूरच राहिला.

अंतिम फेरीत विजेतेपदासाठी महासंग्राम सज्ज!

स्पर्धेतील सर्व सामने आता निर्णायक टप्प्यात पोहोचले आहेत. पुरुष अंतिम फेरीत पश्चिम रेल्वे व महाराष्ट्र पोष्ट यांच्यात विजेतेपदासाठी महासंग्राम रंगणार आहे. पश्चिम रेल्वेने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असून अंतिम विजेतेपदासाठी त्यांचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला आहे. अजितदादा पवार क्रीडा नगरीत आता अंतिम फेरीच्या महासंग्रामाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून खो-खोप्रेमीसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.

Pakistan च्या पंतप्रधानांना नेमका कोणी केला फोन? India सोबत T20 वर्ल्डकप मॅच खेळायला झटक्यात झाले तयार

Web Title: The thrill of dynamic kho kho reached its peak in ajitdada pawar sports city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • Kho Kho Tournament
  • Mumbai Police
  • Western Railway

संबंधित बातम्या

Manoj Jarange : जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या सर्व अटी मान्य, आता मुंबईत उपोषणाला परवानगी मिळणार?
1

Manoj Jarange : जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या सर्व अटी मान्य, आता मुंबईत उपोषणाला परवानगी मिळणार?

Manoj Jarange PC:  मी एकटाच मुंबईला जाणार, फडणवीसांच्या तोडीस तोड डाव टाकणार: जरांगे पाटलांचा मोठा निर्णय
2

Manoj Jarange PC: मी एकटाच मुंबईला जाणार, फडणवीसांच्या तोडीस तोड डाव टाकणार: जरांगे पाटलांचा मोठा निर्णय

Maratha Reservation आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; ‘तुमच्यासमोर गुडघे टेकणार नाही,’ परवानगी नाकारताच संतापले जरांगे पाटील
3

Maratha Reservation आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; ‘तुमच्यासमोर गुडघे टेकणार नाही,’ परवानगी नाकारताच संतापले जरांगे पाटील

Maratha Reservation : मुंबईत जरांगेंचा प्लॅन फसला? आझाद मैदानावरील उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली
4

Maratha Reservation : मुंबईत जरांगेंचा प्लॅन फसला? आझाद मैदानावरील उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.