मुंबई : वेस्टइंडिज सीरिजपूर्वी (West Indies) टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. ६ फेब्रुवारीला ही वेस्टइंडिज विरोधातील वनडे सिरीज (One Day Series) आणि त्यानंर टी-२० सीरिज (T-20 Series) खेळली जाणार आहे. त्यापूर्वी टीम इंडियाचे ३ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात शिखर धवन, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यरचा समावेश आहे.
सद्यस्थितीत पूर्ण टीम विलिगीकरणात आहे. बीसीसीआयची मेडिकल टीम सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. बीसीसीआय लवकरच पर्यायी क्रिकेटर्सच्या नावांची घोषणा करण्याची शक्यता आहे. सध्या टीम इंडिया अहमदाबादमध्ये असून, पहिली वन डे ६ फेब्रुवारीला नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.
बीसीसीआयने नुकतेच तामिळनाडूचा ऑलराऊंडर शाहरुख खान, लेग स्पीनर साई किशोर यांना वेस्टइंडिजच्या मॅचसाठी स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आले आहे. सध्या हे दोन खेळाडू मुख्य टीमचा भाग नसतील. पण आता त्यांचा समावेश टीममध्ये होऊ शकतो.