A blow to the Indian team! After Virat-Rohit, this player is a hit in cricket; He was part of the world-winning team..
Piyush Chawla retirement from all forms of cricket : भारतीय क्रिकेट संघाला एकामागून एक धक्के बसत आहेत. आधी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टेस्ट क्रिकेटनधून निवृत्ती जाहीर केलीय आहे. तर आता भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्याने आपली निवृत्ती जाहीर केली. पियुष हा २०११ च्या वन डे वर्ल्ड कप आणि २००७ च्या वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघाचा महत्वाचा भाग होता. त्याने भारताकडून ३ कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने ७ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच २५ वनडे सामन्यांत ३२ व ७ टी-२० सामन्यांत ४ विकेट्स मिळवल्या आहेत.
आपल्या निवृत्तीच्या घोषणेत पियुष चावलाने लिहिले की, “दोन दशकांहून अधिक काळ मैदानावर राहिल्यानंतर, या सुंदर खेळाला निरोप देण्याची वेळ आली आहे. सर्वोच्च स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यापासून ते २००७ च्या टी-२० विश्वचषक आणि २०११ च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होण्यापर्यंत, या अविश्वसनीय प्रवासातील प्रत्येक क्षण हा एका आशीर्वादापेक्षा कमी नव्हता. या आठवणी माझ्या हृदयात कायम कोरल्या जातील.”
आयपीएलबाबत पियुष चावलाने लिहिले की, “माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या आयपीएल फ्रँचायझींचे – पंजाब किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सचे मनापासून आभार. इंडियन प्रीमियर लीग माझ्या कारकिर्दीतील खरोखरच एक खास अध्याय आहे आणि त्यात खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला मी जपले आहे.”
पियुष चावलाने पुढे लिहिले की, ” मी माझे प्रशिक्षक – श्री. के.के. गौतम आणि दिवंगत श्री. पंकज सारस्वत यांचे – मी मनापासून आभार मानतो – ज्यांनी मला क्रिकेटपटू बनवले आणि मी बनलेल्या क्रिकेटपटूमध्ये वाढवले.”
पियुष चावला पुढे लिहितो की, “माझ्या कुटुंबाला, माझ्यासाठी माझ्या शक्तीचा शाश्वत आधार: सर्व चढ-उतारांमध्ये तुमचा अढळ पाठिंबा माझा पाया राहिला आहे. माझ्या दिवंगत वडिलांचा विशेष उल्लेख, ज्यांच्या माझ्यावरील विश्वासाने मी चाललेल्या मार्गावर प्रकाश टाकला. त्याच्याशिवाय हा प्रवास कधीच शक्य झाला नसता.
पियुष चावला पुढे म्हटले आहे की, क्रिकेटपटू म्हणून स्वतःला विकसित करण्यासाठी आणि व्यक्त करण्यासाठी मला व्यासपीठ आणि संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी बीसीसीआय, यूपीसीए (उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन) आणि जीसीए (गुजरात क्रिकेट असोसिएशन) यांचेही आभार मानतो.
“आजचा दिवस माझ्यासाठी खूप भावनिक आहे कारण मी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटमधून अधिकृतपणे निवृत्ती जाहीर करत आहे. जरी मी क्रीजपासून दूर गेलो तरी क्रिकेट नेहमीच माझ्या आत राहील. आता मी या सुंदर खेळाचा आत्मा आणि धडे घेऊन एका नवीन प्रवासाला सुरुवात करण्यास उत्सुक आहे.” असे पियुष चावलाने लिहिले आहे.
पियुष चावलाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १३७ सामन्यांत ४४६ विकेट्स घेतल्या आहेत. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये १६४ सामने व वेंटी-२० क्रिकेटमधील २९७ सामन्यांत त्याने अनुक्रमे २५४ व ३१९ विकेट्स मिळवल्या आहेत.