कोलंबो : श्रीलंकेत सध्या देशांतर्गत क्रिकेट लीग स्पर्धा सुरु आहे. लंका प्रीमिअर लीगमध्ये (Lanka Premier League 2022) बुधवारी गॉल ग्लॅडिएटर्स आणि कॅन्डी फॅलकॉन्स (Galle Gladiators vs Kany Falcons) यांच्यात क्रिकेटचा सामना पारपडला. या सामन्यात एका खेळाडूला झेल पकडताना चेंडू तोंडावर लागल्यामुळे त्याचे चार दात पडले.
श्रीलंकेतील या क्रिकेट सामन्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान,कार्लोस ब्रेथवेटच्या गोलंदाजीवर ग्लॅडिएटर्सचा फलंदाज नुवानीडू फर्नांडोनं मोठा फटका मारला.चेंडू हवेत खूपच उंच गेलेला चेंडू चमिका करुणारत्ने (Chamika Karunaratne) झेल घेण्यासाठी चेंडूच्या खाली आला.
Chamika hospitalized while attempting catch for Kandy Falcons#LPL2022 #LPL #ChamikaKarunaratne #Cricket pic.twitter.com/yrkT2bbhoG
— Ada Derana Sports (@AdaDeranaSports) December 7, 2022
दरम्यान, चेंडू त्याच्या तोंडावर आदळला. पण तरीही चमिका करुणारत्नेनं झेल पकडला. परंतु जेव्हा तो क्षण कॅमेऱ्यात कैद झाला, तेव्हा त्याच्या तोंडातून रक्त निघत असल्याचं पाहायला मिळालं.त्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आले. महत्वाचं म्हणजे, झेल पकडताना त्याचे चार दात पडल्याची माहिती समोर आलीय.