फोटो सौजन्य - BCCI
भारताचा युवा संघ सध्या झिम्बाम्ब्वेविरुद्ध सामना खेळत आहे. भारत विरुद्ध झिम्बाम्ब्वे यांच्यामध्ये पहिला सामना झाला यामध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर पुन्हा यांच्यामध्ये दुसरा सामना रंगला आहे. या सामन्यामध्ये भारताचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये शुभमन गिळले चेंडूं खेळून लगेच बाद झाला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने घातक फलंदाजी करून सामना भारताकडे वळवला आणि त्याने शतक ठोकले. झिम्बाम्ब्वेविरुद्ध शतक ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.
अभिषेक शर्माने त्यांचे पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठोकले आहे. त्याने ४७ चेंडूंमध्ये १०० धावा करून भारताला एका मजबूत स्थितीमध्ये उभे केले आहे. यामध्ये ८ षटकारांचा आणि ७ चौकारांचा समावेश आहे. मागील सामन्यांमध्ये तो एकही धाव न करता बाद झाला होता. त्याने या सामन्यामध्ये त्याची भरपाई केली आहे.
What. A. Knock! 🔝
A maiden 💯 in international cricket for Abhishek Sharma! 🙌 🙌
Well played! 👏 👏
Follow the Match ▶️ https://t.co/yO8XjNpOro#TeamIndia | #ZIMvIND | @IamAbhiSharma4 pic.twitter.com/bBpbxs9gjz
— BCCI (@BCCI) July 7, 2024
अभिषेकने त्याचे शतक पूर्ण केल्यानंतर लगेचच पुढच्या चेंडूला डायन मायर्सने त्याचा विकेट घेतला आणि खेळ संपवला. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्स कर्णधार ऋतुराज गायकवाडने सुद्धा संघासाठी महत्वाची खेळी खेळली आहे. त्याने त्याचे अर्धशतक पूर्ण करून भारताच्या संघाला मजबूत स्थितीमध्ये उभे केले आहे.
कालच्या सामन्यामध्ये ज्याप्रकारे झिम्बाम्ब्वेच्या गोलंदाजांनी खेळ दाखवला त्यानंतर आज एकही गोलंदाजाला भारतीय फलंदाजांनी सोडले नाही. आजचा सामना कोणत्याही स्थितीमध्ये जिंकण्याच्या इराद्याने भारताचा संघ मैदानामध्ये उतरला आहे.
ऋतुराज गायकवाड याने ४७ चेंडूंमध्ये ७७ धावा करून झिंबाब्वे समोर २३४ धावांचे लक्ष्य उभे केले आहे. यामध्ये २२ चेंदुंमध्ये ४८ धावा करून महत्त्वाची खेळी खेळली आहे.