
AFG Vs ENG: कोण कोणावर पडणार भारी? इंग्लंड-अफगणिस्तानसाठी आज करो या मरो स्थिती; मिळणार शेवटची संधी
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. हळू-हळू ही स्पर्धा शेवटच्या टप्प्याकडे येत आहे. दरम्यान आज इंग्लंड आणि अफगणिस्तान यांच्यात अत्यंत महत्वाचा सामना होत आहे. दोघांसाठी आज करो या मरो अशी स्थिती असणार आहे. नुकत्याच झालेल्या नाणेफेकीत अफगणिस्तानने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बी ग्रुपमधील हा महत्वाचा सामना आहे. पाकिस्तानमधील लाहोर स्टेडियमवर हा सामना सुरू आहे.
Major #ChampionsTrophy semi-final implications as Afghanistan take on England in Lahore 🏏 How to watch ➡️ https://t.co/S0poKnxpTX pic.twitter.com/MlSzQmxlYX — ICC (@ICC) February 26, 2025
दोघांसाठी सामना आवश्यक
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील इंग्लंड आणि अफगणिस्तान यांच्यासाठी आजचा सामना हा अत्यंत महत्वाचा आहे. दोघांसाठी आज करो या मरो अशी स्थिती असणार आहे. दोन्ही संघाची सुरुवात या स्पर्धेत पराभवाने झाली आहे. स्पर्धेत आव्हान टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही संघांना आज विजय आवश्यक आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात चुरस पाहायला मिळणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण अफ्रिका सामना पावसामुळे रद्द
चॅम्पियन्स ट्रॉफीतील सातवा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात रावळपिंडी येथे खेळवला जाणार होता. परंतु, खराब हवामान आणि सततच्या पावसामुळे सामना रद्द घोषित करण्यात आला आहे. हवामान इतके खराब होते की दोन्ही संघांचे कर्णधार टॉससाठीही बाहेर आले नाहीत. या ‘मोठ्या लढाई’मध्ये खूप धावा अपेक्षित होत्या, परंतु, दोन्ही संघांना हवामानाचा फटका सहन करावा लागला. या बरोबरीमुळे, आता दोन्ही संघांना गट ‘ब’मध्ये प्रत्येकी एक गुण देण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सामना खूप महत्त्वाचा
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना उपांत्य फेरीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा होता. या सामन्यात जिंकणारा संघ उपांत्य फेरीत जवळजवळ स्थान निश्चित करू शकला असता. पण, या सामन्याचा ड्रॉ इंग्लंड आणि अफगाणिस्तानसाठी आनंदाची बातमी म्हणता येईल कारण या दोघांसाठीही उपांत्य फेरीत पोहोचण्याचे दरवाजे उघडले आहेत.
ग्रुप बी मध्ये सेमीफायनलची स्पर्धा रंजक
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया आता गट ब मध्ये प्रत्येकी तीन गुणांसह अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियाला अजूनही अफगाणिस्तानविरुद्ध एक सामना खेळायचा आहे, तो जिंकून कांगारू संघ थेट उपांत्य फेरीत प्रवेश करणार आहे. जर अफगाण संघ इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान सामना हरला तर तो स्पर्धेतून बाहेर पडेल.