Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बडे मियाँ नंतर आता छोटे मियाँने केला चमत्कार, सरफराजच्या भावाने झळकावले विश्वचषकात दुसरे शतक

मुशीर अंडर-19 विश्वचषकात दोन शतके झळकावणारा शिखर धवननंतरचा दुसरा भारतीय ठरला. याआधी मुशीरने आयर्लंडविरुद्ध शतक झळकावले होते.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 30, 2024 | 06:19 PM
बडे मियाँ नंतर आता छोटे मियाँने केला चमत्कार, सरफराजच्या भावाने झळकावले विश्वचषकात दुसरे शतक
Follow Us
Close
Follow Us:

मुशीर खान अंडर-19 विश्वचषकात सतत चमत्कार करताना दिसत आहे. त्याने स्पर्धेतील दुसरे शतक झळकावले. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात मुशीरने आपले दुसरे शतक झळकावले आहे. या शतकासह, मुशीर अंडर-19 विश्वचषकात दोन शतके झळकावणारा शिखर धवननंतरचा दुसरा भारतीय ठरला. याआधी मुशीरने आयर्लंडविरुद्ध शतक झळकावले होते.

या शतकापूर्वी मुशीरने अमेरिकेविरुद्ध खेळलेल्या डावात अर्धशतक झळकावले होते. अमेरिकेविरुद्ध मुशीरने 76 चेंडूंत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने ७३ धावांची खेळी केली. त्याआधी आयर्लंडविरुद्ध मुशीरने 106 चेंडूंत 9 चौकार आणि 4 षटकारांसह 118 धावा केल्या होत्या.

न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर मुशीरने किवी गोलंदाजांवर मात केली. या शतकासह मुशीर या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

मुंबईकडून खेळणाऱ्या मुशीरने आतापर्यंत केवळ तीन प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. डिसेंबर 2022 मध्ये त्याने प्रथम श्रेणीत पदार्पण केले. त्याने 3 सामन्यांच्या 5 डावात 96 धावा केल्या. याशिवाय गोलंदाजीत त्याने 2 बळी घेतले.

मोठा भाऊ सरफराज खान भारताचा भाग
एकीकडे लहान भाऊ अंडर-19 विश्वचषकात धुमाकूळ घालत आहे, तर दुसरीकडे रणजी स्टार आणि मुशीरचा मोठा भाऊ सफाराज खानचा कसोटीसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. खरं तर, या दिवसांत इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात सफराजचा बदली म्हणून समावेश करण्यात आला होता.

Web Title: After bade mian now chote mian has done a miracle sarfarazs brother has scored his second century in the world cup international cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2024 | 06:19 PM

Topics:  

  • international cricket
  • Sarfaraz Khan
  • world cup

संबंधित बातम्या

इंग्लंड दौऱ्यात नाकाराले! आता बुची बाबू स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात झळकवले शतक; ‘या’ खेळाडूचा BCCIला इशारा
1

इंग्लंड दौऱ्यात नाकाराले! आता बुची बाबू स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात झळकवले शतक; ‘या’ खेळाडूचा BCCIला इशारा

Sarfaraz khan transformation : सरफराज खानने वेधले निवडकर्त्यांचे लक्ष! पुढील मालिकेत होणार कमबॅक?
2

Sarfaraz khan transformation : सरफराज खानने वेधले निवडकर्त्यांचे लक्ष! पुढील मालिकेत होणार कमबॅक?

Chess World Cup: ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार बुद्धीबळ विश्वचषक स्पर्धा, 23 वर्षांनी भारताला मिळणार आयोजनाचा मान
3

Chess World Cup: ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार बुद्धीबळ विश्वचषक स्पर्धा, 23 वर्षांनी भारताला मिळणार आयोजनाचा मान

अजून किती परिक्षा घेणार? संघामध्ये सर्वात्तम कामगिरी करुनही BCCI चं दुर्लक्ष, वाचा इंट्रा स्कॉड सामन्यातील खेळाडूंची कामगिरी
4

अजून किती परिक्षा घेणार? संघामध्ये सर्वात्तम कामगिरी करुनही BCCI चं दुर्लक्ष, वाचा इंट्रा स्कॉड सामन्यातील खेळाडूंची कामगिरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.