फोटो सौजन्य - सोशल मिडिया
इंग्लडविरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये करुन नायर याचे 7 वर्षानंतर भारतीय संघामध्ये पुनरागमन झाले होते, पण त्याने त्या मालिकेमध्ये फार काही चांगली कामगिरी केली नाही. सध्या सुरु असलेल्या मालिकेमधून करुन नायर याला वगळण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी करुण नायरची निवड झाली. मात्र, तो पुरेशी चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळाली नाही. मात्र, आता त्याची कर्नाटक क्रिकेट संघात निवड झाली आहे. त्याची आगामी रणजी ट्रॉफीसाठी निवड झाली आहे. मयंक अग्रवालकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
आगामी रणजी ट्रॉफी हंगामासाठी मयंक अग्रवालची कर्नाटक संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तो बराच काळ टीम इंडियापासून दूर आहे आणि सतत देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेत आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी अपवादात्मक कामगिरी करणाऱ्या करुण नायरकडूनही कर्नाटकला मोठ्या अपेक्षा असतील.
नायरने १२० प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४८.७३ च्या सरासरीने ८६७५ धावा केल्या आहेत. त्याने २४ शतके आणि ३७ अर्धशतके झळकावली आहेत. कर्नाटकचे स्टार खेळाडू श्रेयस गोपाल, वैशंक विजयकुमार आणि विद्वात कवरप्पा यांनीही संघात स्थान मिळवले आहे, तर प्रसिद्ध कृष्णा आणि केएल राहुल यांना भारतीय संघामुळे वगळण्यात आले आहे. अभिनव मनोहरचाही संघात समावेश करण्यात आला आहे, तर कृष्णन श्रीजीत हा संघाचा पहिला पसंतीचा यष्टीरक्षक आहे.
Ranji Trophy squad talking points: > Maiden callup for Shikhar Shetty & Kruthik Krishna
> Karun is back with KCT while DDP & Prasidh miss out due to national duty
> Venkatesh makes a come back after long injury break
> Hardik Raj, Yashovardhan, Sujay and Vidyadhar misses out https://t.co/quNAqzWSKF — Karnataka Sports Fans (@karnataka_sport) October 6, 2025
मयंक अग्रवाल (कर्णधार), करुण नायर, आर. स्मरण, के.एल. श्रीजित (यष्टीरक्षक), श्रेयस गोपाल, विशाक विजयकुमार, विद्वथ कवेरप्पा, अभिलाष शेट्टी, एम. व्यंकटेश, निक्किन जोस, अभिनव मनोहर, कृतिक कृष्णा (यष्टीरक्षक), के.व्ही. अनिश, मोहसीन खान, शिखर शेट्टी.