कोलकाता : हैदराबाद संघाला याची पूर्ण जाणीव आहे की, त्यांची फलंदाजी कमकुवत आहे आणि गोलंदाजीत ते दिग्गज संघांना जेरीस आणू शकतात. असे असतानादेखील भारतीय संघातील स्टार गोलंदाज उमरान मलिक याला टीममध्ये जागा दिली नाही. त्याच्याऐवजी हैदराबादने कार्तिक त्यागीला संधी दिली, ज्याने २ ओव्हरमध्ये ३० धावा दिल्या. तर अन्य गोलंदाजांची कामगिरी सरासरीची होती.
उमरान मलिकची दर्जेदार कामगिरी
उमरान मलिकने गेल्या ३ सामन्यात एकही विकेट घेतली नसली तरी या लढतीमधील एक ओव्हर वगळता त्याची कामगिरी जबरदस्त झाली आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध जेथे मार्को जेनसनने ३ ओव्हरमध्ये ३७ धावा दिल्या होत्या, तेथे मलिकने ३ ओव्हरमध्ये १८ धावा दिल्या होत्या. त्या सामन्यात फक्त मयंक मार्कंडे याला २ विकेट मिळाल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मलिकने २ ओव्हरमध्ये फक्त १४ धावा दिल्या. तर मार्को जेनसनने २ ओव्हरमध्ये २७ धावा दिल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेच्या जेनसनला दिली संधी
दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आणि हैदराबादचा कर्णधार एडेन मार्करामने केकेआरविरुद्ध स्वत:च्या देशाचा खेळाडू जेनसनला संधी दिली आणि मलिकला बाहेर केले. यावरून आता सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया येत आहेत.
उमरान मलिक फलंदाजीतही उत्तम
उमरान मलिक ज्या अखेरच्या लढतीत खेळला होता तीदेखील दिल्लीविरुद्ध होती. तेव्हा त्याला फक्त एक ओव्हर मिळाली ज्यात त्याने २२ धावा दिल्या. याच लढतीत भुवनेश्वर कुमारला ४ ओव्हरमध्ये ४५ , अकील हुसैनला ४ ओव्हरमध्ये ४० धावा पडल्या होत्या. मलिकला एकच ओव्हर मिळाली होती. या लढतीमध्ये अन्य गोलंदाजांची धुलाई झाली होती. या मागचे कारण दव हेदेखील होते. तरीदेखील त्याच्या पुढील लढतीत मलिकला संघाबाहेर करण्यात आले.