मुंबई : कतार मध्ये सुरु असलेला फिफा विश्वचषक २०२२ रविवारी अर्जेंटिनाच्या विजयानंतर संपन्न झाला. अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स यांच्या लढतीत मेस्सीच्या अर्जेंटिना संघाने विजयी गोल करत सामना जिंकला. तब्बल ३६ वर्षांनी अर्जेंटीनाला फुटबॉलचे विश्वविजेतेपद मिळवण्यात यश मिळालं. लिओनेल मेस्सीचं आपल्या संघाला विश्वचषक जिंकून देण्याचं स्वप्न अखेर सत्यात उतरलं. विश्वचषक जिंकल्यानं मेस्सीने मीडियाशी बोलताना आपल्या निवृत्तीबाबत मोठं विधान केलं.
यंदाच्या फुटबॉल विश्वचषकानंतर जगप्रसिद्ध खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) हा आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे यंदाचा फिफा विश्वचषक २०२२ हा मेस्सीची शेवटची स्पर्धा असणार असे देखील बोलले जात होते. अर्जेंटिना संघाने सुरुवातीपासूनच स्पर्धेत चांगली कामगिरी करून एक एक टप्पा पार करत अंतिम फेरी गाठली. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात पेनल्टी शूट आऊटवर त्यांनी फ्रान्सवर 4-2 अशी मात करून विश्वविजेतेपद पटकवलं. या विजयानंतर मेस्सीने आपल्या निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली. मेस्सीने त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. मेस्सीने तो अर्जेंटिनातून निवृत्त होणार नाही असे सांगितले. मेस्सीने TyC स्पोर्ट्सला सांगितले की, ”तो अर्जेंटिनासाठी आणखी काही काळ खेळत राहण्याचा मानस आहे.” , मी अर्जेंटिना राष्ट्रीय संघातून निवृत्त होणार नाही. मला चॅम्पियन म्हणून खेळणे सुरू ठेवायचं आहे, आहे.