KCL 2025: W,W,W.., Hat-trick and 5 wickets in debut match! 'This' player ruined Samson's team
Ajinas K takes hat-trick in Kerala Cricket League 2025 : केरळ क्रिकेट लीग २०२५ मध्ये अनेक थरारक सामने बघायला मिळत आहे. या लीगमधील ११ व्या सामन्यात थ्रिसूर टायटन्स आणि कोची ब्लू टायगर्स यांच्यात अटीतटीचा सामना पार पडला. थ्रिसूर टायटन्स संघाने शेवटच्या चेंडूवर ५ विकेट्सने विजय प्राप्त केला. या सामन्यात थ्रिसूर टायटन्सच्या विजयाचा हीरो अजिनास के ठरला. विशेष म्हणजे अजिनास केचा हा पदार्पणाचा सामना होता. त्याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात त्याच्या संघाला जोरदार विजय मिळवून दिला आहे. कोची ब्लू टायगर्सविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात अजिनास केने हंगामातील पहिली हॅटट्रिक तर घेतलीच सोबत त्याने ५ विकेट्स घेऊन धुमाकूळ देखील घातला आहे.
हेही वाचा : Asia cup 2025 : ‘तो टीम इंडियात परतणार नाही…’, श्रेयस अय्यरबद्दल प्रसिद्ध ज्योतिषाने केली मोठी भविष्यवाणी..
या सामन्यात कोची ब्लू टायगर्सने प्रथम फलंदाजी करत दमदार सुरुवात केली, संघाकडून संजू सॅमसनने स्फोटक फलंदाजी करत ८९ धावांची खेळी खेळली. तथापि, अजिनासने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात शानदार गोलंदाजी करून सामन्याचे चित्र बदलवून टाकले. त्याने त्याच्या स्पेलमध्ये कोचीच्या फलंदाजांना धांगळेच अडचणीतआणले. त्याने १८ व्या षटकात हॅटट्रिक पूर्ण केली. अजिनसने सलग तीन चेंडूवर तीन फलंदाज माघारी पाठवले. ज्यात संजू सॅमसन, जेरिन पीएस आणि मोहम्मद आशिक सारखे फलंदाज यांचा समावेश होता. या हॅटट्रिकपूर्वी त्याने आणखी दोन बळी मिळवले होते. त्याच्या या घातक गोलंदाजीने कोचीला १८८ धावांवर रोखण्यात यश आले.
अजिनसने त्याच्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये फक्त ३० धावा मोजत ५ बळी घेतले. जे या मजबूत फलंदाजीसमोर खूपच कमी मानले पाहिजे. या सामन्यात संपूर्ण ४ षटके टाकणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो सर्वात फायदेशीर गोलंदाज ठरला आहे.
अजिनसच्या या शानदार गोलंदाजीच्या बळावर थ्रिसूर टायटन्सला मजबूत स्थितिमध्ये आणून ठेवले. त्यानंतर, कोचीने दिलेल्या १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्रिशूर संघाने हे आव्हान स्वीकारले आणि विजय देखील मिळवला आहे. त्रिशूर टायटन्सने हे लक्ष्य केवळ ५ विकेट गामावत गाठले. सिजोमन जोसेफ आणि अर्जुन ए.के. यांनी शेवटच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी केल्यामुळे त्रिशूर टायटन्स संघ सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर विजय मिळवण्यात यशस्वी ठरला.