श्रेयस अय्यर(फोटो-सोशल मीडिया)
Asia cup 2025 : भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने मागील दीड वर्षात आयसीसी स्पर्धांमध्ये तसेच आयपीएलच्या 18 व्या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. तरी देखील त्याला आशिया कप २०२५ साठी संघातून वगळण्यात आले आहे. याबाबत क्रिकेट विश्वातून अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. अशातच प्रसिद्ध ज्योतिषी ग्रीन स्टोन लोबो यांनी श्रेयस अय्यरबद्दल एक मोठी भविष्यवाणी देखील केली आहे. त्यांनी सांगितले की, श्रेयस अय्यर केवळ मोठ्या ताकदीने पुनरागमन करणार नाही, तर तो भविष्यात मोठ्या स्पर्धांमध्ये देखील भारताचे जेतेपद जिंकतानाही पाहू शकणार आहे.
ग्रीन स्टोन लोबो म्हणाले की, ” श्रेयस अय्यरकडे पुन्हा एकदा कानाडोळा करण्यात आला आहे. पण त्याची ग्रह कुंडली खूप चांगली असून त्याचा जन्म १९९४ मध्ये झाला होता आणि काही ग्रह खूप मजबूत दिसून येत आहेत. त्याचा कुंडली इतका शक्तिशाली आहे की त्याच्यात एका फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करण्याची क्षमता देखील आहे.”
लोबो पुढे म्हणाले की, “जर त्याला कर्णधारपद देण्यात आले तर तो भारतासाठी विश्वविजेतेपद देखील जिंकून देऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये जर त्याची कुंडली अशी असेल तर त्याला का वगळण्यात येत आहे? कदाचित सध्या जे काही त्याच्यासोबत घडत आहे ते अय्यरसाठी खूप फायदेशीर असणार आहे. आपण या आशिया कपला टी-२० विश्वचषकासाठी ड्रेस रिहर्सल म्हणून देखील पाहू शकतो.’
ग्रीन स्टोन लोबो असे देखील म्हणाले की, “टीम इंडियामध्ये त्याचे पुनरागमन होणे निश्चित आहे. अय्यरच्या आधी निवडण्यात आलेले काही खेळाडू कदाचित चांगले प्रदर्शन करू शकणार नाहीत. हे त्यांच्यासाठी खूप दुर्दैवी असणार आहे, कारण अय्यरचा कुंडली खूप चांगली आहे. त्याच्याकडे कायमचे दुर्लक्ष करता येऊ शकत नाही. ”
लोबो पुढे म्हणाले की, “एक किंवा काही खेळाडू अय्यरसाठी मार्ग मोकळा करणार आहेत.असे काहीतरी घडू शकणार आहे, जे भारताच्या हिताचे नसेल, परंतु श्रेयस अय्यर पुन्हा एकदा निवडकर्त्यांना विश्वचषकासाठी संघात त्याचे स्थान निश्चित करण्यास भाग पाडणार आहे आणि जेव्हा जेव्हा मोठी गरज असेल तेव्हा तो संघासाठी उपलब्ध असणार आहे.”