संजू सॅमसन(फोटो-सोशल मीडिया)
Kerala Cricket League 2025 : आशिया कप 2025 स्पर्धा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर होऊन एक आठवडा उलटला आहे. तरी अद्याप आशिया कपसाठी अंतिम ११ मध्ये कोण असणार? याबाबत मात्र अजून प्रश्नचिन्ह आहेत. अशातच भारतीय संघाचा स्टार विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनने पुन्हा एकदा आपण लयीत आला आहे. केरळ क्रिकेट लीग स्पर्धेत कोच्चि ब्लू टायगर्स संघाकडून खेळताना संजू सॅमसनने थ्रिसूर टायटन्स संघाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला आहे. त्याने वादळी खेळी खेळून सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. यामुळे आता आशिया कपसाठी अंतिम 11 साठी आपली दावेदारी पक्की केली आहे.
केरळ क्रिकेट लीग स्पर्धेत संजू सॅमसनने थ्रिसूर टायटन्स संघाविरुद्ध संजू सॅमसनने 46 चेंडूत 89 धावांची स्फोटक खेळी खेळली आहे. या खेळीत त्याने 9 षटकार आणि 4 चौकारांची आतिषबाजी केली आहे. या दरम्यान त्याने एका चेंडूवर तब्बल 13 धावा काढल्या आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कस शक्य झालं असावं? या धावा एक नो बॉल आणि फ्रीट हिटमुळे आल्या आहेत. गोलंदाजाने पहिला चेंडू नो टाकला, संजूने या चेंडूवर षटकार लगावला. त्यानंतर फ्री हीटवर देखील त्याने षटकार खेचला. त्यामुळे एकाच चेंडूवर 13 धावा काढता आल्या. सिजोमन जोसेफला या षटकात संजुने चांगलाच धुतला. संजू सॅमसनला या खेळीमुळे आशिया कप स्पर्धेतील अंतिम ११ मध्ये स्थान मिळण्याची शक्यता बळावली आहे.
वृत्तानुसार, भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि आशिया कप टी 20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव संजू सॅमसन ऐवजी शुबमन गिलला सलामीला पाठवणार असल्याची माहीती आहे. याबाबत सूर्यकुमार यादवने देखील पत्रकार परिषदेत खुलासा दिला आहे. त्यामुळे संजू सॅमसनला अंतिम ११ च्या बाहेर बसावं लागणार असल्याचे मानले जात आहे. पण संजू सॅमसनच्या आताच्या कांगिरीकडे पाहून हे दिसत असल्याचे दिसत नाही. उलट जितेश शर्मा आणि शुभमन गिलची जागा धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. आता सलामीला शुभमन गिलला संधी मिळते की संजू सॅमसनला? हे पाहणे रंजक ठरणार आहे.
केरळ क्रिकेट लीगमध्ये मागील सामन्यात देखील संजू सॅमसनने 51 चेंडूत 121 धावांची स्फोटक खेळी खेळली होती. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 7 षटकार लगावले होते. त्यानंतर पुढच्याच सामन्यात संजू सॅमसनने 46 चेंडूत 89 धावांची खेळी साकारली आहे. संजू सॅमसन हा केरळ क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने या स्पर्धेत 74 च्या सरासरीने 223 धावा फटकावल्या आहेत.
हेही वाचा : Buchi Babu Competition : सरफराज एक्सप्रेस सुसाट! बीसीसीआयला दिला शतकी इशारा..