
Ashes series 2025: Embarrassing record of Australia-England teams! First time in cricket history, they suffered humiliation
Australia and England set an embarrassing record : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अॅशेस मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून अॅशेस मालिकेचा पहिला सामना पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळला जात आहे. तथापि, या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात एक नकोसा विक्रम रचला गेला आहे.
अॅशेस कसोटीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच, दोन्ही संघांकडून सामन्याच्या पहिल्या डावात शून्य सलामीची भागीदारी रचण्यात आली आहे. १४३ कसोटींच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आली आहे जेव्हा दोन्ही संघांचे सलामीचे फलंदाज पहिल्याच षटकात भोपळा न फोडता माघारी परतले.
अॅशेस मालिकेच्या पहिल्या सामन्यामध्ये इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो परूनपणे चुकीचा ठरला. कारण स्टार्कच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे इंग्लंड १७२ धावांवर गारद झाला. तसेच इंग्लंडच्या डावाची सुरुवात देखील खराब झाली, पहिल्याच षटकात जॅक क्रॉलीला माघारी जावे लागले. तथापि, हॅरी ब्रूकच्या अर्धशतकामुळे इंग्लंडला १७२ धावांपर्यंत मजल मारता आली.
जेक वेदरल्ड दुसऱ्या चेंडूवर जोफ्रा आर्चरकडून बाद झाला आणि तो धाव न करता माघारी परतला. तेव्हा ऑस्ट्रेलियाचा डाव इंग्लंडप्रमाणेच डबघाईला आलेला दिसून आला. दोन्ही संघांच्या सुरुवातीच्या फटक्यांनी सामन्याला रोमांचक सुरुवात दिली होती. ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट देखील धाव न घेताच पडली. दोन्ही संघांचे सलामीचे फलंदाज पहिल्याच षटकात बाद झाले. हे करककेत इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे.
इंग्लंडने या स्पर्धेत एका खास ध्येयासह प्रवेश केला आहे. इंग्लंडला शेवटच्या वेळी अॅशेस मालिका २०१५ मध्ये जिंकता आली होती. ऑस्ट्रेलियाने गेल्या दहा वर्षांपासून मालिकेत वर्चस्व राखले आहे. ज्यामध्ये २०१७-१८ मध्ये ०-४ असा दणदणीत पराभव आणि २०२१-२२ मध्ये ०-४ असा एकतर्फी निकाल लागला होता. २०१९ मध्ये अॅशेस मालिका २-२ अशी बरोबरीत सुरतण्यात यश आले होते. परंतु ऑस्ट्रेलियाने जेतेपद आपल्याकडे राखले. आता, इंग्लंड हे दीर्घ वर्चस्व मोडण्याचा प्रयत्न असणार आहे.
हेही वाचा : Ind vs SA 2nd Test : दुसऱ्या कसोटीतून गिल बाहेर! प्रिन्सच्या जागा घ्यायला ‘या’ दोन खेळाडूंचे नाव चर्चेत
ऐतिहासिकदृष्ट्या, ऑस्ट्रेलियाने ३४ वेळा अॅशेस जिंकून आपला दबदबा राखला आहे, तर इंग्लंडने ३३ वेळा जिंकली आहे. पाच मालिका अनिर्णित राहिल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर इंग्लंडवर २०-१५ अशी आघाडी मिळवली आहे.