'India-Pakistan match, a joke', Pakistan team blushes with shame before Asia Cup! Former compatriot player mocks
IND VS PAK: आशिया कप २०२५ साठी पाकिस्तानने त्यांच्या संघाची घोषणा केली. त्यानंतर भारताने देखील आपला संघ जाहीर केला. १० सप्टेंबर रोजी भारत आपल्या मोहीमेला सुरवात करेल. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान १४ सप्टेंबर रोजी आशिया कप स्पर्धेत आमनेसामने येतील.पाकिस्तानमधील प्रत्येकजण हा १४ सप्टेंबर या दिवसाची वाट बघत आहे. त्याच वेळी, भारतातील अनेक लोक या सामन्याला विरोध करत अस्लयचे दिसत आहे. यामागील कारण म्हणजे अलिकडेच झालेला पहलगाम दहशतवादी हल्ला, त्यामुळे भारतीय चाहत्यांचा संतप हॉट आहे.
हेही वाचा : AUS vs SA : ऑस्ट्रेलियाच्या एडम झॅम्पाला ‘ती’ कृती पडली महागात! ICC कडून मोठी कारवाई
या दरम्यान, पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी या सामन्याबद्दल एक मोठे विधान केले आहे. १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याला बासित अलीने ‘विनोद’ म्हटले आहे. खरं तर, त्याने त्यांच्याच देशाच्या टीम पाकिस्तानसाठी विनोद हा शब्द वापरला असून यावेळी त्याने संघावर तसेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर हल्ला देखील चढवला आहे.
बासित अली अनेकदा पाकिस्तान संघ आणि त्यांच्या क्रिकेट बोर्डावर टीका करत त्यांना आरसा दाखवत आला आहे. आता त्यांने त्यांच्या ‘गेम प्लॅन’ या यूट्यूब चॅनलमध्ये म्हटले आहे की, “१४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान सामना होणार आहे, तेव्हा आणखी एक विनोद होईल.”
याशिवाय त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डवर देखील टीका केली आहे. त्याने म्हटले की, पीसीबीने खेळाडूंना दिलेला वार्षिक करार हा एक विनोद आहे. यावेळी माजी पाकिस्तानी यष्टीरक्षक कामरान अकमल देखील त्यांच्यासोबत उपस्थित असल्याचे दिसून आले.
आशिया कप २०२५ मध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यावर आपले मत व्यक्त करताना बासित अली प्रार्थना करतात की भारत आणि पाकिस्तान आशिया कपमध्ये एकमेकांविरुद्ध खेळण्यास नकार देतील. जसे की वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लीजेंड्स २०२५ मध्ये घडले होते.
हेही वाचा : PAK vs IND : Asia cup 2025 मध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना होणारच! BCCI ने केले जोरदार युक्तिवाद; वाचा सविस्तर
बासित म्हणाला की, होते की जर संघाने खेळण्यास नकर दिला तर ते पाकिस्तान संघासाठी चांगले होणार आहे. कारण जर सामना झाला तर टीम इंडियाचे खेळाडू पाकिस्तानचा वाईट पद्धतीने पराभव करतील. असे बासित म्हणाला आहे.