एडम झॅम्पा(फोटो-सोशल मीडिया)
AUS vs SA : दक्षिण आफ्रिका संघ सद्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिकेला आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळवली गेली असून यामध्ये ऑस्ट्रेलियाने ही मालिका 2-1 अशी जिंकली. त्यानंतर या दोन संघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना 19 ऑगस्टला खेळवण्यात आला होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा98 धावांनी पराभव करून मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. या सामन्यात ऑस्ट्रेलिया फलंदाज आणि गोलंदाज या दोन्ही आघाडीवर अपयशी ठरली. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला अजून एकझटका बसला आहे. आयसीसीने ऑस्ट्रेलियाच्या एका एडम झम्पावर कारवाई केली आहे.
हेही वाचा : PAK vs IND : Asia cup 2025 मध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना होणारच! BCCI ने केले जोरदार युक्तिवाद; वाचा सविस्तर
आयसीसीकडून ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर एडम झॅम्पावर आचार संहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, झॅम्पाकडून आयसीसी आचार संहितेच्या अनुच्छेद 2.3 चं उल्लंघन करण्यात आले आहे. या अनुच्छेदामध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अपशब्द वापरल्यास कारवाईची तरतूद असून झॅम्पाने नियमांचं उल्लंघन केल्याने त्याला 1 डिमेरिट पॉइंट दिला गेला आहे.
सामन्या दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 37 वी ओव्हर टाकत असताना मिसफिल्डिंग झाल्याने एडम झॅम्पा चांगलाच संतापला. झॅम्पाची मिसफिल्डिंगमुळे चिडचिड झाली होती. त्यामुळे वैतागलेल्या झॅम्पाने वाईट शद्ब उच्चारले. झॅम्पा जे काही बोलला ते स्टंप माईकमध्ये संपूर्ण संभाषण रेकॉर्ड झालं आहे. मात्र झॅम्पाकडून त्याची चूक कबूल करण्यात आली. त्यामुळे त्याला कोणत्याही अधिकृत कारवाईला सामोरे जाण्याची गरज पडली नाही.
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेत दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी केली. दक्षिण आफ्रिकेने 50 ओव्हरमध्ये 296 धावा उभ्या केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी एडन मारक्रम याने सर्वाधिक 82 धावा फटकावल्या. तर रायन रिकेल्टेन याने 33 धावा काढल्या. कर्णधार टेम्बा बावुमा याने 65 धावांची खेळी केली. तर मॅथ्यू ब्रीट्जके याने 57 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियासाठी ट्रेव्हीस हेड याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला पूर्ण 50 ओव्हर देखील खेळता आल्या नाहीत. ऑस्ट्रेलियाचा डाव 40.5 ओव्हरमध्ये 198 धावांवर गडगडला. परिणामी दक्षिण आफ्रिकेने ९८ धावांनी विजय मिळवला.