पीसीबी आणि बीसीसीआय(फोटो-सोशल मीडिया)
PAK vs IND : ९ सप्टेंबर पासून आशिया कप २०२५ ला सुरवात होणार आहे. भारतीय संघाची घोषणा देखील करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करणार आहे. १० सप्टेंबरला यूएईविरुद्धच्या सामन्याआपसून भारतीय संघ आपल्या मोहिमेला सुरवात करत आहे. तर १४ सप्टेंबर रोजी आशिया कप २०२५ मध्ये भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार आहे. त्यावरून आता चांगलेच वातावरण तापले आहे. हा सामना रद्द करण्यात यावा अशी मागणी होताना दिसत आहे. क्रिकेट चाहते असोत किंवा माजी क्रिकेटपटू असोत किंवा राजकीय व्यक्ती हे सगळे पाकिस्तानसोबतच्या सामन्याबाबत विरोधी सुर आवळत आहेत. यामागील कारण म्हणजे पहलगाम हल्ल्यानंतर देशात पाकिस्तानविरुद्धचा असलेला संताप आहे.
हेही वाचा : अजिंक्य रहाणेने घेतली माघार, मुंबईचे कर्णधारपद सोडले! सोशल मीडियावर दिली माहिती
१४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत भारत सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत भूमिका घेण्यात आलेली नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एका खाजगी माध्यम संस्थेला पाकिस्तानविरुद्ध सामना खेळण्याबाबतचे कारण सांगण्यात आले आहे. या दरम्यान, बोर्डाच्या अधिकाऱ्याने काही कारणांवर चर्चा देखील करण्यात आली आहे. ज्यामुळे बीसीसीआयला आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना खेळवायचाच आहे असे दिसून येत आहे.
पाकिस्तानसोबत सामना खेळण्यात यावा याबाजूने अधिकाऱ्याने दोन युक्तिवाद मांडले आहेत. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, जरी भारतीय संघ स्पर्धा खेळताना पाकिस्तानवर बहिष्कार टाकला, तर असे केल्यास पाकिस्तानला दोन मोफत गुण देण्यात येतील. यामुळे पाकिस्तान सहजपणे अंतिम फेरीत जाण्याची शक्यता आहे.
अधिकाऱ्याने पुढे म्हटले आहे की, आतापर्यंत भारताने आशियाई क्रिकेट परिषदेवर नेहमीच आपले वर्चस्व गाजवले आहे. जर भारताने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला तर स्पर्धा अपयशी ठरण्याची शक्यता आहे. ज्यामुळे स्पर्धेतील उत्पन्न कमी होण्याची शक्यता बळावते. जर असे झाले तर एसीसीमध्ये भारताचा दर्जा ढासळू शकतो. त्याच वेळी, पाकिस्तान इतर देशांना सामील करून भारताविरुद्ध नकारात्मक मोहीम उघडण्याची जास्त शक्यता आहे.
हेही वाचा : Asia Cup 2025 : हाॅकी टीम इंडिया आशिया कपसाठी सज्ज! हरमनप्रीत सिंहकडे असणार कमान, वाचा संपूर्ण वेळापत्रक
अधिकाऱ्याने पुढ सांगितले की, पाकिस्तानसोबत सामना न खेळल्याने प्रसारक नाराज होण्याची शक्यता आहे. बोर्डाला हे काही नको आहे. आशिया कपचे प्रसारक हक्क पुढील चार वर्षांसाठी २०२४ मध्ये आधीच विकण्यात आले आहे. त्यांची किंमत १७० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच १५०० कोटी रुपये इतकी आहे. ही किंमत फक्त भारत-पाकिस्तान सामन्यामुळेच मिळाली आहे. इतर सामन्यांमध्ये ही रक्कम अर्धी आहे. जर भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध सामना खेळू शकला नाही तर हे स्लॉट या किमतीत विकले जाणार नाहीत. आशा वेळी प्रसारकांना निश्चितच मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. या कारणामुळे बीसीसीआयवरील त्याची विश्वासार्हता कमी होईल.