
Asia Cup 2025: 'Tension between Farhan, teams..' Irfan Pathan lashes out at Pakistani player over gun celebration; Watch video
हेही वाचा : IND VS PAK : ‘त्याला IPL मध्येही पंचगिरी…’, फखर झमानच्या बाद होण्यावर शाहिद आफ्रिदीने ओकली गरळ
सुपर ४ च्या सामन्यात भारताविरुद्ध बॉलिंग दरम्यान शाहीन शाह आफ्रिदी आणि हरिस रौफ यांनी भारतीय फलंदाजांशी शाब्दिक शिवीगाळ केल्याचे दिसून आले. शिवाय, भारतीय चाहत्यांसमोर क्षेत्ररक्षण करत असताना हरिस रौफने पडलेल्या लढाऊ विमानाकडे इशारा देखील केला. दरम्यान, साहिबजादा फरहानने अर्धशतक झळकावल्यानंतर ‘बंदुकीच्या सेलिब्रेशन’ केल्याने वादाला तोंड फुटले. खेळाडूंच्या त्यांच्या असभ्य वर्तनाबद्दल सर्वजण आपली प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, माजी भारतीय स्टार गोलंदाज इरफान पठाणने देखील आता टीका केली आहे.
The behaviour of Pak players on the field was very poor. My msg is clear. Full video on my YouTube channel. pic.twitter.com/Dm9YmTXqRG — Irfan Pathan (@IrfanPathan) September 22, 2025
भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर नियमितपणे क्रिकेटवर चर्चा करताना त्याने त्याने २१ सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्याची चर्चा देखील केली. तो म्हणाला की, “मी त्या सेलिब्रेशनबद्दल थोडे काही बोलू इच्छितो. साहिबजादा फरहान, तुम्हाला माहिती आहे की दोन्ही संघांमध्ये सध्या तणाव आहे. मला वाटले की हरिस रौफ एक चांगला माणूस होता. मी त्याला ऑस्ट्रेलियामध्ये भेटलो होतो.”
इरफान पठाण पुढे म्हणाला की, “त्याने केलेले हावभाव हे खूपच अनावश्यक होते. हे हावभाव त्याच्या स्वभावाबद्दल आणि संगोपनाबद्दल बरेच काही सांगून जाते. मैदानावर क्रिकेट खेळा. मग तुम्ही आम्हाला याबद्दल बोलू नये अशी अपेक्षा देखील करता आणि ते खूप चुकीचे आहे. मला अजिबात आश्चर्य वाटले नाही. तो असे काही करू शकतो. तुम्ही टीव्हीवर जे पाहिले ते खूप वाईट होते, म्हणून पडद्यामागे नेमके काय चालले आहे हे जाणून तुम्हाला धक्काच बसेल.” असे देखील पठाण बोलला.
हेही वाचा : युवराज सिंग ईडी चौकशीसाठी पोहोचला, इतर अनेक क्रिकेटपटूंवर देखील असणार नजर
तसेच पठाण पुढे म्हणाला की, “आम्ही तुम्हाला कुठंला त्रास देणार नाही; आम्ही क्रिकेट खेळत राहू. आम्ही कधीही सुरवात करत नाही. पण जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही प्रतिसाद देऊ शकत नाही तर ते चुकीचे आहे. आम्ही फक्त आमच्या बॅटनेच नाही तर आमच्या तोंडाने देखील प्रतिसाद देऊ. काही माजी खेळाडूंना हे अद्याप पचवता आलेली नाही. मी त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०-११ वेळा आउट केले आहे. तो मैदानावर वा मैदानाबाहेर मला सांभाळू शकलेला नाही.”