फखर झमानच्या बाद होण्यावर वाद(फोटो-सोशल मीडिया)
Asia cup 2025 : आशिया कप २०२५ (Asia cup 2025)मधील सुपर ४ सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आमनेसामने आले होते. सुपर फोर २१ सप्टेंबर रोजी झालेल्या या या सामन्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारताने पाकिस्तान संघाचा ६ विकेट्सने पराभव केला. आता, पाकिस्तानकडून या सामन्यात पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत. यामध्ये आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारताविरुद्धच्या सुपर फोर सामन्यात फखर झमानचे बाद होणे वादग्रस्त असल्याचे म्हटले आहे. त्याने आशिया कप २०२५ मध्ये पंचांच्या दर्जांबाबत देखील आता वाद सुरू केला आहे.
तिसऱ्या ओव्हरमध्ये फखर झमानने हार्दिक पंड्याच्या ऑफ-कटरला धार लावल्यानंतर चेंडूला टिपण्यासाठी विकेटकीपर संजू सॅमसनने पुढे डाईव्ह केली. त्यानंतर प्रकरण तिसऱ्या पंचांपर्यंत जाऊन पोहोचले, ज्यांनी फलंदाजाला बाद असल्याचे घोषित केले.
निर्णयावर फलंदाज फखर झमान नाराज असल्याचे दिसून आले. त्यांचा असा विश्वास होता की चेंडू विकेटकीपरच्या ग्लोव्हजपर्यंत पोहोचण्यापूर्वी जमिनीला स्पर्श करून गेला आहे. याबाबत आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने सामा टीव्हीवर पंचांवर टीका करताना म्हटले आहे की, “त्याला आयपीएलमध्येही पंचगिरी करावी लागते.”
पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज मोहम्मद युसूफने देखील आफ्रिदीला समर्थन देत फखर झमानच्या बाद होण्यावर दु:ख व्यक्त केले आहे. युसूफ म्हणाला, “फखर झमान आमचा महत्त्वाचा खेळाडू होता, त्याने एका जागतिक दर्जाच्या गोलंदाजाविरुद्ध (जसप्रीत बुमराह) काही चौकार मारून चांगली सुरुवात देखील केली.”
याबरोबरच पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा यांनीही तिसऱ्या पंचाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत, तो म्हणाला, “मला वाटले की चेंडू उसळला. पंच चुका करू शकतात आणि ते समजण्यासारखे देखील आहे. मला वाटले की चेंडू उसळला, पण मी चुकीचा असू शकतो, जर फखर झमान खेळत राहिला असता तर आमचा संघ १९० च्या आसपास पोहोचू शकलो असतो.”
हेही वाचा : IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या महिला एकदिवसीय सामन्यात स्लो ओव्हररेटसाठी भारताला दंड
२१ सप्टेंबर रोजी खेळवण्यात आलेल्या दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर-४ सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ५ गडी गमावून १७१ धावा उभ्या केल्या होत्या. पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने सर्वाधिक ५८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल भारताने १८.५ षटकांत ६ गडी राखून सामना आपल्या नावे केला. भारताकडून अभिषेक शर्माने ३९ चेंडूत ७४ धावा केल्या, तर शुभमन गिलने ४७ धावा केल्या.