Asia Cup 2025: Vice-captain Shubman Gill's 'friend' will counterattack India; 'He' is a special weapon in UAE's fight
IND vs UAE : आशिया कप २०२५ स्पर्धेला ९ सप्टेंबर रोजी सुरुवात झाली. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने हाँगकाँग संघाचा ९४ धावांनी पराभव केला. आता आज म्हणजेच १० सप्टेंबर रोजी सूर्यकुमारच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ यजमान यूएई संघासोबत दोन हात करणार आहे. जर आपण यूएई संघाबाबत बोलायचं झाल तर या संघातील बहुतेक खेळाडू हे भारतीय वंशाचेच आहेत.
आशिया कप संघांमध्ये भारतीय वंशाचे खेळाडू असणे ही काही असामान्य गोष्ट राहिली नाही. यूएई संघात भारताविरुद्ध भारतीय वंशाचा सिमरनजीत सिंग हा गोलंदाज आहे. सिमरनजीत आपल्या संघासाठी मुख्य स्पिनरची भूमिका बजावत आहे. सिमरनजीत हा मूळचा पंजाबचा असून तो लहानपणी शुभमन गिलला नेटमध्ये गोलंदाजी करत असे.
हेही वाचा : Asia cup 2025 : IND आणि UAE येणार सामने! आज कोणाची असेल चलती? फलंदाज की गोलंदाज? जाणून घ्या Pitch report
आशिया कप २०२५ मध्ये आज भारत आणि यूएई यांच्यातील सामन्यापूर्वी, लुधियानाच्या सिमरनजीतने शुभमन गिलबाबत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. गिसिमरनजीतसोबतचे काही खुलसे त्याने केले आहेत. सिंग त्याच्या भूतकाळाची आठवण करून देताना तो म्हणाला की, “मी शुभमनला त्याच्या लहानपणापासून ओळखतो, पण तो मला आठवन ठेवतो की नाही हे मला माहित नाही, हे सर्व २०११-१२ मधील असावे.”
सिमरनजीत पुढे म्हणाला की, ” शुभमन गिल ११-१२ वर्षांचाअसताना आम्ही सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत मोहालीच्या पीसीए अकादमीमध्ये सराव करत असायचो. शुभमन गिल सकाळी ११ वाजता त्याच्या वडिलांसोबत अकादमीत येत असे. मी माझ्या नेट सेशननंतर त्याला बरेच अतिरिक्त चेंडू टाकत असे. मला माहित नाही की तो आता मला ओळखेल की नाही, परंतु, त्या काळामध्ये मी त्याला खूप गोलंदाजी केली आहे.”
यूएई संघातील सिमरनजीत सिंग हा खूप चांगला गोलंदाज असल्याचे म्हटले जाते. सध्या तो यूएई संघाच्या गोलंदाजीमध्ये एक महत्त्वाचा खेळाडू आहे. सध्या लालचंद राजपूत यूएई संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहेत. लालचंद राजपूत यांच्या मते, सिमरनजीत सिंग हा एक प्रतिभावान गोलंदाज आहे. सिमरनजीत सिंगबद्दल बोलताना लालचंद राजपूत म्हणाले की, “टी-२० क्रिकेटमध्ये प्रत्येक डावखुरा फिरकी गोलंदाज हा चेंडूला सातत्यपूर्ण उड्डाण देण्याचे धाडस दाखवत नाही. सिमरनला मात्र उडून विकेट कसे काढायचे हे चांगले माहिती आहे.”