
Asia Cup 2025: Wasim Akram was shocked after seeing Shubman Gill's six! Reaction went viral; Watch the video
आशिया कपमधील दुसऱ्या सामन्यात भारत आणि यूएई सामनेसामने होते. सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर यूएई संघ प्रथम फलंदाजी करण्यास उतरला. भारतीय गोलंदाजीसमोर यूएई संघाने गुढघे टकेले आणि संघ ५७ धावांवर सर्वबाद झाला आहे. कुलदीप यादवने ७ धावा देत ४ विकेट घेतल्या तर शिवम दुबेने ४ धावा देत ३ विकेट घेतल्या. प्रतिउत्तरात भारताने २७ चेंडूतच हा सामना जिंकला आणि आपल्या मोहिमेची विजयी सुरवात केली.
हेही वाचा : IND vs UAE : कुलदीप यादवने घेतली UAE ची फिरकी; दिग्गज आर अश्विनला टाकले ‘या’ विक्रमात मागे..
या सामन्यात पुनरागमन करणाऱ्या शुभमन गिलने फक्त ९ चेंडूत नाबाद २० धावा केल्या, ज्यामध्ये दोन चौकार आणि एक गगनचुंबी षटकार आला. यूएईविरुद्ध सलामीला जाताना, अभिषेक शर्मासह गिलने पहिल्या विकेटसाठी ४८ धावा उभ्या केल्या. डावाच्या दुसऱ्या षटकात यूएईचा वेगवान गोलंदाज मोहम्मद रोहिदने शेवटचा चेंडू टाकला तेव्हा गिल पुढे सरकला आणि त्याने लेग साईडकडे एक जोरदार फ्लिक मारला. चेंडू थेट जाऊन स्टँडमध्ये पडला. हा षटकार पाहून कमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित असलेला माजी पाकिस्तान कर्णधार वसीम अक्रम हा चक्रावून गेल्याचे दिसून आले. त्याने शुभमन गिलचे कौतुक केले आणि म्हटले की “हा शॉट पहा, अविश्वसनीय… थेट स्टँडमध्ये, फक्त एक फ्लिक.” यावेळी अक्रमचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.
pic.twitter.com/7MMoCHKIWT — . (@mediaa2344) September 10, 2025
प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने उत्तम खेळ दाखवला दाखवला. या सामन्यात यूएईचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत. फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि अष्टपैलू शिवम दुबे यांनी टिच्चून गोलदाजी केली आणि या दोघांनी मिळून यूएईच्या ७ विकेट्स काढल्या. पॉवरप्लेमध्ये दोन विकेट गमावल्यानंतर यूएई संघाने ४१ धावा उभ्या केल्या होत्या. परंतु त्यानंतर भारतीय गोलंदाजांकडून १५ धावांत ८ विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवने फक्त २.१ षटकांत ७ धावा देत ४ बळी घेतले, तर शिवम दुबेने २ षटकांत फक्त ४ धावा देऊन ३ फलंदाजांना माघारी पाठवले. या व्यतिरिक्त, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनीही प्रत्येकी एक बळी घेतला.