Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी टीमने लावला विजयाचा चौकार, जपानला नमवून सेमीफायनलमध्ये भरारी

Asian Games 2026: भारताच्या महिला हॉकी संघाने यजमान जपानवर दणदणीत विजय मिळवून उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे. भारतीय संघ आता पदकापासून फक्त एक विजय दूर आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 25, 2026 | 09:56 AM
भारतीय महिला हॉकी संघाची कमाल (फोटो सौजन्य - X.com)

भारतीय महिला हॉकी संघाची कमाल (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Follow Us:
  • भारतीय महिला हॉकी संघाची कमाल 
  • जपानला नमवून संघ पोहचला उपांत्य फेरीत 
  • आता फक्त एक विजय दूर
Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाने जपानला ३-१ ने पराभूत करून २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आपला सलग चौथा विजय नोंदवला. या विजयामुळे भारतीय संघ ‘पूल बी’ मध्ये अव्वल स्थानी पोहोचला असून उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित झाले आहे. भारताने यापूर्वी आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांना मोठ्या फरकाने पराभूत केले होते आणि गोलचा वर्षाव केला होता. या सामन्यात भारतासाठी लालरेम्सियामी, इशिका आणि नवनीत यांनी गोल केले, तर जपानसाठी शिहो कोबायाकावाने एकमेव गोल केला. उपांत्य फेरीपूर्वी भारताचा सामना सिंगापूरशी होईल, जो सामना भारत सहज जिंकू शकतो.

भारताने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. पहिल्या हाफमध्ये २-० अशी आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघाने आपली आघाडी अधिक मजबूत केली. दुसऱ्या हाफमध्ये जपानने एक गोल करून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला असला तरी, भारतानेही दुसऱ्या हाफमध्ये दोन गोल करून दोन गोलची आघाडी घेतली. भारतीय संघाची सध्याची लय पाहता, यावेळी सुवर्णपदक अपेक्षित आहे.

Asian Games: अवघ्या ०.०८ सेकंदांचा थरार; वियतनामला धूळ चारत भारतीय चौकडीने पटकावले ‘रौप्य’

४ सामन्यांमध्ये ५९ गोल

𝗦𝗘𝗠𝗜-𝗙𝗜𝗡𝗔𝗟𝗦, 𝗛𝗘𝗥𝗘 𝗪𝗘 𝗖𝗢𝗠𝗘! 🇮🇳🔥 Four games. Four statement wins. And now the Indian Women’s Team have punched their ticket to the Asian Games 2026 semi-finals! 🏑💥 🇮🇳 19-0 🇺🇿 Uzbekistan
🇮🇳 17-1 🇮🇩 Indonesia
🇮🇳 20-1 🇹🇭 Thailand
🇮🇳 3-1 🇯🇵 Japan#HockeyIndia… pic.twitter.com/ghV1WhtoVK
— Hockey India (@TheHockeyIndia) September 25, 2026

भारतीय महिला संघ या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत आहे. भारतीय संघाने ४ सामन्यांमध्ये ५९ गोल केले आहेत. जपान वगळता प्रत्येक संघाविरुद्ध भारताने किमान १७ गोल केले आहेत. भारताने आपला पहिला सामना उझबेकिस्तानविरुद्ध १९-० ने जिंकला. यानंतर, भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात इंडोनेशियाला १७-१ ने पराभूत केले. तिसऱ्या सामन्यात भारताने थायलंडविरुद्ध २०-१ च्या फरकाने विजय मिळवला.

भारत सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार

या स्पर्धेत भारतीय संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार आहे. भारत १९८२ पासून या स्पर्धेत सुवर्णपदकाच्या प्रतीक्षेत आहे. भारतीय महिला हॉकी संघाने शेवटचे सुवर्णपदक १९८२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकले होते. दरम्यान, हांगझू येथे झालेल्या मागील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. दरम्यान पुरुष हॉकी संघदेखील जिंकण्याच्या तयारीत आहे. भारतीय क्रिडापटूंनी यावेळी आशियाई क्रिडा स्पर्धेत कमालीची कामगिरी करत जगभरात आपले नाव कमावले आहे. आता चाहत्यांचे सर्व लक्ष सुवर्णपदकाकडे लागून राहिले आहे. 

Asian Games: हिमाचलच्या लेकीचा जपानमध्ये डंका! सीमाने १०,००० मीटर शर्यतीत जिंकले ‘Bronze’ मेडल

Web Title: Asian games 2026 indian women hockey team 4 consecutive wins beats japan entered semi finals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 09:50 AM

Topics:  

  • asian games
  • asian games 2026
  • Hockey Team India

संबंधित बातम्या

Asian Games: अवघ्या ०.०८ सेकंदांचा थरार; वियतनामला धूळ चारत भारतीय चौकडीने पटकावले ‘रौप्य’
1

Asian Games: अवघ्या ०.०८ सेकंदांचा थरार; वियतनामला धूळ चारत भारतीय चौकडीने पटकावले ‘रौप्य’

Asian Games: हिमाचलच्या लेकीचा जपानमध्ये डंका! सीमाने १०,००० मीटर शर्यतीत जिंकले ‘Bronze’ मेडल
2

Asian Games: हिमाचलच्या लेकीचा जपानमध्ये डंका! सीमाने १०,००० मीटर शर्यतीत जिंकले ‘Bronze’ मेडल

Asian Games 2026 मध्ये पुरुष क्रिकेटला सुरुवात; भारताला कडवी झुंज, पण अफगाणिस्तानसमोर फुस्स, जपानचा घरच्या मैदानावर दारुण पराभव
3

Asian Games 2026 मध्ये पुरुष क्रिकेटला सुरुवात; भारताला कडवी झुंज, पण अफगाणिस्तानसमोर फुस्स, जपानचा घरच्या मैदानावर दारुण पराभव

Asian Games: लोळवलं अन् झोपवलं! चिनी तैपेईला कबड्डीत भारताने नमवलं; ३७-२१ ने मिळवला शानदार विजय
4

Asian Games: लोळवलं अन् झोपवलं! चिनी तैपेईला कबड्डीत भारताने नमवलं; ३७-२१ ने मिळवला शानदार विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.