Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026: ४८ सेकंदांनी गोल्ड हुकलं, पण ४४ वर्षांचा दुष्काळ संपला! सावन बारवालचा ऐतिहासिक मेडल रन; भारताला मॅरेथॉनमध्ये पदक

Sawan Barwal wins silver medal in Asian Games marathon: भारतीय धावपटू आणि लष्करी जवान सावन बरवालने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मॅरेथॉनमध्ये रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 26, 2026 | 03:52 PM
Sawan Barwal wins silver medal in Asian Games

Sawan Barwal wins silver medal in Asian Games

Follow Us
Follow Us:
  • ४८ सेकंदांनी गोल्ड हुकलं
  • सावनने ४४ वर्षांचा मेडल दुष्काळ संपवला
  • मॅरेथॉनमध्ये भारताला सिल्व्हर
Sawan Barwal wins marathon silver: जपानमधील ऐची नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतासाठी २६ सप्टेंबर हा दिवस ऐतिहासिक ठरला. भारतीय लष्कराचा जवान सावन बरवालने मॅरेथॉनमध्ये रौप्य पदक जिंकले. पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये रौप्य पदक जिंकण्यासोबतच सावनने एक नवीन राष्ट्रीय विक्रमही प्रस्थापित केला. याशिवाय, आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या मॅरेथॉन प्रकारात भारताला ४४ वर्षांनंतर मिळालेले हे पहिले पदक आहे. २८ वर्षीय खेळाडू बरवालने ४२.१९५ किलोमीटरची मॅरेथॉन २ तास ११ मिनिटे ३७ सेकंदात पूर्ण करून रौप्य पदक पटकावले. जपानच्या इचिताका यामाशिताने जवळपास एका मिनिटाच्या फरकाने सुवर्ण पदक जिंकण्यात यश मिळवले.यापूर्वी भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत मॅरेथॉनमध्ये १९८२ साली पदक जिंकले होते.

Asian Games 2026 मध्ये क्रिकेट फिव्हर ऑन! क्वार्टरफायनलमध्ये भारत-अफगाणिस्तानची टक्कर; कधी, कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन?

अवघ्या ४८ सेकंदांनी हुकले सुवर्ण

सावन बरवालने पुरुषांच्या मॅरेथॉन स्पर्धेच्या अंतिम फेरीत उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने सुरुवातीला आघाडी घेतली आणि अर्ध्या अंतरापर्यंत तो दुसऱ्या स्थानावर घसरला. त्यानंतर त्याने २१ किलोमीटरवर पुन्हा आघाडी घेतली, पण अखेरीस तो मागे पडू लागला. बरवालने शेवटच्या काही किलोमीटरमध्ये दमदार कमबॅक करत अनेक खेळाडूंना मागे टाकले आणि २:११:३७ वेळेत शर्यत पूर्ण केली. यासह त्याने रौप्य पदक पटकावले. जपानच्या इचिताका यामाशिता सावनपेक्षा ४८ सेकंद आधी पोहोचला. त्याने २:१०:४९ वेळेत शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक जिंकले. चीनच्या पेयू फेंगने २:१२:१३ वेळेत शर्यत पूर्ण करून कांस्यपदक पटकावले.

A personal best on the biggest stage 🇮🇳🥈 Sawan Barwal clocks 2:11:37 to win silver medal in the men’s marathon at #AichiNagoya2026. 🤌 pic.twitter.com/RF3gkslYKd — Olympic Khel ™ (@OlympicKhel) September 26, 2026

४४ वर्षांची प्रतीक्षा संपली

भारताची ४४ वर्षांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. यापूर्वी, १९८२ मध्ये दिल्लीत झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत होसूर कुक्कप्पा सितारनने भारतासाठी मॅरेथॉनमध्ये कांस्य पदक जिंकले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेत मॅरेथॉन पदक जिंकणारा बरवाल हा चौथा भारतीय ठरला आहे. यापूर्वी, १९५१ मध्ये दिल्लीत झालेल्या पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत छोटा सिंगने सुवर्णपदक आणि सुरत सिंग माथूरने कांस्यपदक जिंकले होते. ५००० मीटर, १०००० मीटर आणि हाफ मॅरेथॉन धावल्यानंतर बरवालने यावर्षी मॅरेथॉनमध्ये पदार्पण केले. एप्रिलमध्ये, बरवालने रॉटरडॅम येथील एनएन मॅरेथॉनमध्ये शिवनाथ सिंग यांचा ४८ वर्षे जुना २:११:५८ वेळेचा राष्ट्रीय विक्रम मोडला होता.

कोण आहे सावन बरवाल ?

सावन बरवाल हा २८ वर्षीय लांब पल्ल्याचा धावपटू आहे. तो हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील जोगिंदर नगरचा रहिवासी आहे. तो भारतीय सैन्यात हवालदार आहे. पूर्ण मॅरेथॉनमध्ये येण्यापूर्वी, बरवालने शॉर्ट ट्रॅक स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. एप्रिल २०२६ मध्ये, त्याने पदार्पणातच रॉटरडॅम मॅरेथॉन २:११:५८ वेळेत पूर्ण करून विक्रम मोडले. त्याने आपल्या पहिल्याच मॅरेथॉन स्पर्धेत शिवनाथ सिंग यांचा ४८ वर्षे जुना विक्रम मोडला. २०२४ मध्ये, त्याने ५००० मीटरचे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले आणि २०२५ च्या राष्ट्रीय खेळांमध्ये ५००० मीटर व १०००० मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले. परंतु, त्याने आता आशियाई खेळांमध्ये आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठे यश मिळवले आहे.

Asian Games: शेवटच्या क्षणापर्यंत झुंज अन् मेडल पक्कं! Gulveer Singh ने 10,000m मध्ये पटकावलं रौप्य; भारताच्या पदकतालिकेत आणखी भर

Web Title: Asian games 2026 sawan barwal silver medal marathon after 44 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • asian games 2026
  • Indian Athlete
  • Marathon

संबंधित बातम्या

आता भारत थांबणार नाही! Asian Games मध्ये खेळाडूंचा जलवा; 3 ‘सुवर्ण’ अन्…, 27 पदकांची कमाई
1

आता भारत थांबणार नाही! Asian Games मध्ये खेळाडूंचा जलवा; 3 ‘सुवर्ण’ अन्…, 27 पदकांची कमाई

Asian Games 2026 मध्ये क्रिकेट फिव्हर ऑन! क्वार्टरफायनलमध्ये भारत-अफगाणिस्तानची टक्कर; कधी, कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन?
2

Asian Games 2026 मध्ये क्रिकेट फिव्हर ऑन! क्वार्टरफायनलमध्ये भारत-अफगाणिस्तानची टक्कर; कधी, कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन?

Asian Games : हा तर, चक्क वेडेपणा, एशियन गेम्समधील ‘या’ गोष्टींवर वैतागला एच. एस. प्रणॉय
3

Asian Games : हा तर, चक्क वेडेपणा, एशियन गेम्समधील ‘या’ गोष्टींवर वैतागला एच. एस. प्रणॉय

भारताच्या वाघिणींची जपानमध्ये डरकाळी! ५० मीटर रायफल प्रकारात भारताला ‘Silver’ मेडल
4

भारताच्या वाघिणींची जपानमध्ये डरकाळी! ५० मीटर रायफल प्रकारात भारताला ‘Silver’ मेडल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.