Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026: कमाल! नीरू ढांडाने Trap Shooting मध्ये मिळवले सुवर्णपदक, 75 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले

Asian Games 2026: भारतीय नेमबाज नीरू ढांडाने एशियन गेम्स २०२६ मध्ये इतिहास रचला आहे. नीरूने महिला ट्रॅप व्यक्तिगत स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत बाजी मारली असून ७५ वर्षात पहिल्यांदाच घडले आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 29, 2026 | 12:26 PM
भारताच्या मुलीची कमाल, मिळवले सुवर्णपदक; घडवला इतिहास (फोटो सौजन्य - X.com)

भारताच्या मुलीची कमाल, मिळवले सुवर्णपदक; घडवला इतिहास (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Follow Us:
  • नीरू ढांडाची नेमबाजीत ऐतिहासिक कामगिरी 
  • ७५ वर्षात पहिल्यांदाच भारतीय महिलेची कामगिरी 
  • जिंकले सुवर्णपदक 
Asian Games 2026: याला म्हणतात अचूक निशाणा! भारताची मुलगी नीरू ढांडाने कमालीची कामगिरी करत आशियाई क्रिडा स्पर्धा २०२६ मध्ये इतिहास रचला आहे. नीरूचे नाव स्वर्णाक्षरात लिहिले गेले आहे. नीरूने महिलांच्या वैयक्तिक ट्रॅप शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. 

२०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे भारताचे पाचवे सुवर्णपदक होते. तिच्या उल्लेखनीय कामगिरीने जपानमध्ये भारताला अभिमान मिळवून दिला. गोल्डन गर्ल नीरूचा जन्म २५ मे २००० रोजी झाला असून ती हरियाणातील जिंद येथील रहिवासी आहे. ती दिल्लीतील डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजमध्ये प्रशिक्षण घेते आहे आणि तिने कमालीची कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

Asian Games 2026: भारत आणि श्रीलंका येणार आमनेसामने, 1 ऑक्टोबरला होणार उपांत्य फेरीत टक्कर

खराब वातावरणातही लक्ष केले केंद्रित 

नीरूचे या कामगिरीसाठी सगळ्याच स्तरावर विशेष कौतुक होत आहे आणि याला कारणही तसंच आहे. अत्यंत खराब वातावरणातही तिने आपलं ध्येय आणि धैर्य सोडलं नाही. अंतिम सामन्यात नीरूने ६ सिरीजमध्ये एकूण २८ निशाणे तिने लावले आणि हे सुवर्णपदक आपल्या नावे केले. पावसाच्या व्यत्ययानंतरही तिने आपली एकाग्रता कायम ठेवली आणि ही कामगिरी करत सर्वांच्या तोंडी आपलं नाव येईल याची उत्तमरित्या दखल घेतली आहे. 

नीरूला हे सुवर्णपदक अचानक मिळाले नसून गेले कित्येक वर्ष यासाठी ती चांगला खेळ करत आहे आणि अनेक वर्ष केलेल्या श्रमाचं तिला अखेर फळ मिळालं असल्याचं दिसून येत आहे. २०२५ मध्ये तिने आशियाई नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. 

सातत्याने घडवत आहे इतिहास 

यानंतर, २०२६ मध्ये, नीरूने इटलीतील लोनाटो येथे झालेल्या आयएसएसएफ शॉटगन विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. ISSF विश्वचषक स्पर्धेत वैयक्तिक ट्रॅप सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली. नीरूने आशियाई क्रीडा स्पर्धेतही आपला प्रभावी फॉर्म कायम ठेवला. पात्रता फेरीत, तिने ५० पैकी ४८ लक्ष्ये भेदली आणि संयुक्तपणे प्रथम स्थान पटकावले. यावरून अंतिम फेरीपूर्वीच तिच्या आत्मविश्वासाची आणि फॉर्मची झलक मिळाली.

Asian Games 2026 : भाला फेकीत भारताचा ‘डबल धमाका’, यशवीरला रौप्य, तर रोहितला कांस्य पदक

संघीय स्पर्धेत पदक जिंकले

नीरूने यापूर्वीही आशियाई क्रीडा स्पर्धेत सांघिक प्रकारात भारतासाठी पदक जिंकले होते. नीरू धांडा, आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांच्या भारतीय संघाने महिलांच्या ट्रॅप सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकले. त्यांनी एकत्रितपणे ३२८ गुण मिळवले आणि चीननंतर दुसरे स्थान पटकावले. २५ मे २००० रोजी जन्मलेली नीरू धांडा हरियाणातील जिंद येथील असून, ती दिल्लीतील डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजमध्ये प्रशिक्षण घेते. तिच्या क्रीडा कारकिर्दीत शासकीय पाठिंबा देखील महत्त्वपूर्ण ठरला आहे. त्यांना उपकरणे, दारुगोळा, निवास आणि भोजन, तसेच किरकोळ खर्चासाठी भत्ता मिळाला. त्यांना भारताच्या क्रीडा अभियान ‘टॉप्स’ (TOPS) अंतर्गत ₹100,000 आणि ‘एसीटीसी’ (ACTC) अंतर्गत ₹25.09 लाखांहून अधिक आर्थिक मदतही मिळाली.

Web Title: Asian games 2026 trap shooter neeru created history after 75 years achieved gold medal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 12:26 PM

Topics:  

  • asian games
  • asian games 2026
  • Shooting

संबंधित बातम्या

Asian Games 2026: भारत आणि श्रीलंका येणार आमनेसामने, 1 ऑक्टोबरला होणार उपांत्य फेरीत टक्कर
1

Asian Games 2026: भारत आणि श्रीलंका येणार आमनेसामने, 1 ऑक्टोबरला होणार उपांत्य फेरीत टक्कर

Asian Games 2026 : भाला फेकीत भारताचा ‘डबल धमाका’, यशवीरला रौप्य, तर रोहितला कांस्य पदक
2

Asian Games 2026 : भाला फेकीत भारताचा ‘डबल धमाका’, यशवीरला रौप्य, तर रोहितला कांस्य पदक

Asian Games 2026 : 400 मीटर हर्डल्समध्ये विथ्या रामराजने रचला इतिसाह, पीटी उषांचा विक्रम मागे सारत कांस्य पदकाची कमाई
3

Asian Games 2026 : 400 मीटर हर्डल्समध्ये विथ्या रामराजने रचला इतिसाह, पीटी उषांचा विक्रम मागे सारत कांस्य पदकाची कमाई

Asian Games 2026: ‘गोल्ड’चं स्वप्न भंगलं, मात्र पिंकी थांबली नाही! कुराशमध्ये भारताला मिळाले ‘Bronze’
4

Asian Games 2026: ‘गोल्ड’चं स्वप्न भंगलं, मात्र पिंकी थांबली नाही! कुराशमध्ये भारताला मिळाले ‘Bronze’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.