ईशा सिंगने जिंकले रौप्यपदक (फोटो- ट्विटर)
Asian Games 2026: सेमीफायनलमध्ये भिडणार IND – PAK? अंतिम सामन्यापर्यंत शेड्युल जाणून घ्या
आशियाई खेळामधील या प्रकारात ईशाने आपले पदक कायम राखले असून, हे तिचे सलग दुसरे रौप्य पदक ठरले आहे. गोल्ड मेडलसाठी अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा आणि थरारक ठरला. ईशा सिंग आणि चीनच्या नेमबाजात विजेतेपदासाठी जोरदार चुरस दिसून आली. संपूर्ण सामन्यात दोन्ही नेमबाजांनी एकमेकांना कडवी टक्कर दिली. निर्धारित फेऱ्यांनंतर दोन्ही खेळाडू ३८-३८ पॉईंट्समध्ये बरोबरीत राहिल्या.
SILVER FOR ESHA SINGH!🥳 The talented shooter clinches silver in the Women’s 25m Pistol individual event at #AsianGames2026. Well done, Esha! 👏 #Cheer4Bharat https://t.co/BlWoJD9QQn — Doordarshan Sports (@ddsportschannel) September 28, 2026
ईशा गोल्ड मेडलपासून दूर राहिली असली तरीही, ईशा सिंगने दाखवलेले धैर्य आणि उत्कृष्ट क्रीडाकौशल्य यामुळे संपूर्ण देशात तिचे कौतुक होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सलग दुसऱ्यांदा रौप्य पदक जिंकून ईशाने भारतीय नेमबाजीतील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे तिच्या कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती मनू भाकर, आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेती ईशा सिंग आणि अनेक पदके पटकावणारी अनुभवी नेमबाज राही सरनोबत यांचा समावेश असलेला भारतीय संघ या स्पर्धेत पदकाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र, प्रिसिजन आणि रॅपिड फेरीमध्ये भारतीय महिला संघाने चांगला स्कोअर केला. भारतीय संघ पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. त्यामुळे भारतीय संघाची पदक जिंकण्याची संधी हुकली आहे.
ईशा सिंग हीच वैयक्तिक अंतिम फेरीसाठी यश मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. अंतिम फेरीत तिची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही आणि तिला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. ईशाव्यतिरिक्त इतर कोणत्याही भारतीय नेमबाजाला अंतिम फेरीत प्रवेश करता आला नाही. ईशा सिंगने रौप्यपदक जिंकले आहे. त्यामुळे भारताच्या खात्यात आणखी एक पदक वाढले आहे.






